National Scholarship Portal Nodal Officer Profile Update

0 श्री डि जे राठोड

NSP पोर्टलवर नोडल ऑफिसर व 

 मुख्याध्यापक यांची प्रोफाइल 

अपडेट आवश्यक

अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती बाबत

सर्व शाळांनी शाळेचे प्रोफाइल अपडेट करावयाचे आहे शाळेचे प्रोफाईल अपडेट केले शिवाय NSP पोर्टल वर ती कोणत्याही विद्यार्थ्यांचा अर्ज पडताळणी करता येणार नाही याची नोंद घ्यावी..(नवीन व नूतनीकरण विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्यापूर्वी सर्व शाळांनी आपले प्रोफाइल अपडेट करावे)

ज्या शाळेत अल्पसंख्यांक विद्यार्थी आहे तसेच ज्या शाळेत अल्पसंख्यांक विद्यार्थी नाही सर्व शाळेने आपली प्रोफाइल अपडेट करणे आवश्यक आहे


शाळेचे प्रोफाईल Update करण्यासाठी NSP portal open करून institute login page open करा.

खालील लिंक वर क्लिक करा

        NSP Portal

  • लॉगिन type institute nodal निवडा.
  • शैक्षणिक वर्ष 2021-22 निवडा.
  • Login ID व पासवर्ड टाका.
  • Captcha code टाकून लॉगीन करा.
  • Administration मेनू open करून Update profile वरती click करा.

Institute details मध्ये शाळेची माहिती पुढील प्रमाणे भरा.

शाळेचे नाव as per nsp/ as per dise या पैकी जे बरोबर असेल ते निवडा. तुम्ही जे न निवडाल त्यावरीलच जिल्हा निवडला जाईल.(as per nsp किंवा as per dise)(काही शाळांचा जिल्हा चुकीचा दाखवत असेल त्यांनी याद्वारे दुरुस्त करून घ्या.

शाळेचा प्रकार निवडा (शासकीय/खाजगी/अनुदानित..... इ.)

बोर्ड व राज्य निवडा.

शाळेचा पत्ता अचूक भरा.

नोडल ऑफिसर 

Contact person details मध्ये शाळेच्या नोडल ऑफिसर यांची माहिती भरा.

यामध्ये आधार कार्ड वरती जी माहिती आहे तीच माहिती पुढील प्रमाणे भरा.

  • आधार नंबर, 
  • आधार कार्ड वरील नाव,
  •  जन्म तारीख,
  •  लिंग,
  •  मोबाईल नंबर, email , पद ई

नोडल ऑफिसर हे शाळेचे मुखाध्यापक किंवा मुख्याध्यापकांनी नेमलेले शाळेचे कर्मचारी असावेत

नोडल ऑफिसर यांची माहिती आधार वरील माहितीशी मॅच झलेल्यानतर otp येईल त्यानंतरच तुम्ही प्रोफाईल update करू शकाल त्यामुळे सर्व माहिती अचूक भरा.

मुख्याध्यापक यांची माहिती भरा

Head of institute मध्ये शाळेच्या मुख्याध्यापक यांची माहिती भरा.

खालील लिंक वर क्लिक करा

        NSP Portal

मुख्याध्यापक यांचे आधार कार्ड वरील नाव, 

मोबाईल क्रमांक, 

Email, पद इत्यादी.

सर्व माहिती अचूक भरले नंतर final submit या बटणावर क्लिक करा.

आदेशान्वये

शिक्षणाधिकारी(मा.प्रा.)

अल्पसंख्याक प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती
शाळेला येणाऱ्या अडचणी

1.विद्यार्थी अर्ज भरताना शाळेचे नाव न दिसणे

- शाळेची kyc न झाल्यामुळे

https://nsp.gov.in/instEKYCRegistrationIndex


2. शाळा लॉगिन पासवर्ड विसरले असेल

- नोडल ऑफिसर यांच्या कडे मुख्याध्यापक यांचे आधार व आधारशी लिंक मोबाईल नंबर माहिती देऊन पासवर्ड रिसेट करणे

3. शाळा लॉगिन ला व्हेरिफिकेशन विद्यार्थ्यांची यादी न दिसणे

- शाळा लॉगिन केल्यानंतर ऍडमिनिस्ट्रेशन टॅब मध्ये अपडेट प्रोफाइल करून विद्यार्थ्यांची संख्या व कोर्स वर्ग याची माहिती अद्यावत करणे

4. रिनिवल विद्यार्थ्यांचा अर्ज न भरता येणे- 

मागील वर्षात शाळेने सदर विद्यार्थ्याचा अर्ज जानेवारी महिन्यात व्हेरिफाय केला आहे का हे पाहणे शाळा लॉगिन ला मागील वर्षात लॉगिन करून ते पहावे मागील वर्षात जानेवारी महिन्यात री व्हेरिफिकेशन न झाल्यास यावर्षी रिनिवल अर्ज भरता येत नाही

6. अल्पसंख्याक नवीन अर्ज भरतांना दुसऱ्या शिष्यवृत्ती मध्ये समावेश असल्याचा मॅसेज दाखवणे

- संबंधित विद्यार्थी हा NMMS शिष्यवृत्ती आधी अर्ज भरला होता का याची पडताळणी करणे 

7. National scholarship पोर्टल मार्फत एका विद्यार्थ्याला एकच शिष्यवृत्ती मिळते संबंधित विद्यार्थी अल्पसंख्यांक प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती व NMMS शिष्यवृत्ती पात्र असेल तर यापैकी एकच निवडू शकतो. शाळेने विद्यार्थी NMMS मध्ये पात्र असेल तर त्याचा NMMS अंतर्गतच अर्ज भरावा

जिल्हा नोडल ऑफिसर

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

About Us

डिजिटल BRC Smart E - Learning, Test Online, Educational, General Knowledge , Scholarship Tips Include in My Website. Education Contain and Much more in My Website