Zilla Parishad Teachers To Become Kendra Pramukh Promotion

जिल्हा परिषद शिक्षकांना केंद्रप्रमुख

होण्याची सुवर्णसंधी जाणुन घ्या 

      Zilla Parishad Teachers To Become Cluster Head 

  केंद्र प्रमुख भरती 2023 :- केंद्रप्रमुख परीक्षा डिसेंबर 2023 मध्ये होणार; जाणून घ्या परीक्षेसाठीची आवश्यक शैक्षणिक अर्हता, अभ्यासक्रम, परीक्षेचे स्वरूप व महत्वपूर्ण संदर्भ पुस्तके

           महाराष्ट्र  शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून महाराष्ट्रातील विविध जिल्हा परिषदेत  2384 केंद्रप्रमुख पदे भरली जाणार आहेत,त्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी "केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा" या परीक्षेचे ऑनलाइन पद्धतीने आयोजन डिसेंबर 2023 मध्ये  करण्यात आले आहे.

अर्ज भरण्याचा कालावधी

        केंद्रप्रमुख परीक्षेसाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज दिनांक ०१/१२/२०२३ ते ०८/१२/२०२३ या कालावधीत आवेदनपत्र व परीक्षा शुल्क स्वीकारले जाणार आहेत. परीक्षेबाबतची सविस्तर माहिती  www.mscepune.in संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

     IBPS कंपनीकडून नवीन अभ्यासक्रमानुसार परीक्षा ऑनलाइन होणार असल्याने शिक्षकांना केंद्रप्रमुख होण्यासाठी आपली गुणवत्ता सिध्द करावी लागणार आहे. 

नवीन अर्हता

     शासन निर्णय दिनांक 27 सप्टेंबर 2023 नुसार विभागीय केंद्रप्रमुख परीक्षेसाठी सुधारित नवीन अर्हता

कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी.ए./बी.कॉम/बी.एस्सी. ही पदवी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे आणि ज्यांनी जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) किंवा प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) या पदावर किमान ६ वर्ष अखंडीत सेवा पूर्ण करणे आवश्यक आहे.

        आता सुधारित अर्हतेनुसार 50 वर्षे पेक्षा अधिक वय असलेले तसेच ज्यांना पदवीला 50 टक्के पेक्षा कमी गुण असणारे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकही अर्ज करू शकणार आहेत.

केंद्रप्रमुख वेतनश्रेणी : 9300 - 34800 ग्रेड पे वेतन - 4400

           केंद्र प्रमुख विभागीय मर्यादित परीक्षेच्या नवीन 200 गुणांच्या अभ्यासक्रमाची तयारी

     केंद्रप्रमुख पदासाठी 200 गुणांची नवीन अभ्यासक्रमानुसार परीक्षा असून दोन्ही पेपरचे एकूण 200 वस्तुनिष्ठ प्रश्न 200 गुणांसाठी असणार आहेत.

    केंद्रप्रमुख पेपर एक 100 प्रश्न 100 गुण आणि पेपर दोन 100 प्रश्न 100 गुण असणार आहे.

         पेपर क्रमांक एकमध्ये  बुद्धिमत्ता व अभियोग्यता घटकावर 100 वस्तुनिष्ठ प्रश्न 100 गुणांसाठी विचारले जाणार आहेत.    

 पेपर क्रमांक एक - बुद्धिमत्ता व अभियोग्यता

        बुद्धिमत्ता व अभियोग्यता घटकांतर्गत गणितीय चाचणी, तार्किक क्षमता, वेग व अचूकता, इंग्रजी व मराठी भाषिक क्षमता, अवकाशीय क्षमता, शिक्षक अभियोग्यता- कल, आवड, व्यक्तिमत्व, समायोजन हे घटक समाविष्ट आहेत आणि बुद्धिमत्ता चाचणीत आकलन, समसंबंध, क्रमश्रेणी, कुट प्रश्न, सांकेतिक भाषा, लयबद्ध मांडणी या घटकांचा समावेश आहे.या घटकांच्या संपुर्ण तयारीसाठी पुढील पुस्तके अत्यंत उपयुक्त ठरतील.

केंद्र प्रमुख पेपर एक-महत्वपूर्ण अभ्यास संदर्भ

1. केंद्र प्रमुख परीक्षा बुद्धिमत्ता व अभियोग्यता घटक पेपर पहिला संपूर्ण मार्गदर्शक - डॉ शशिकांत अन्नदाते, के सागर पब्लिकेशन्स  

2. केंद्रप्रमुख पेपर पहिला बुद्धिमत्ता व अभियोग्यता घटक पेपर एक संपूर्ण तयारी - के सागर 

3.संपूर्ण शिक्षक अभियोग्यता, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र - डॉ.शशिकांत अन्नदाते (नववी आवृत्ती)

4. शिक्षक अभियोग्यता विशेष तयारी - स्वाती शेटे (दुसरी आवृत्ती)

5.शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी 7 सराव प्रश्नपत्रिका - डॉ.शशिकांत अन्नदाते

   

  पेपर - 2 शालेय शिक्षणातील नियम , अधिनियम , शैक्षणिक नव विचार प्रवाह 

1.भारतीय राज्यघटना शिक्षण विषयक तरतुदी , कायदे , नियम इत्यादी - 10 गुण

2. शिक्षण क्षेत्रातील घडामोडी , शैक्षणिक संस्था , कार्य व माहिती इत्यादी - 10 गुण

3.माहिती तंत्रज्ञान / संगणक वापर व शैक्षणिक सहसंबंध - 15 गुण

4.अभ्यासक्रम व मुल्यमापन , अध्ययन अध्यापन पद्धती , शैक्षणिक विचावंत व विचार इत्यादी - 15 गुण

5. माहितीचे विश्लेषण , मुल्यमापन , शैक्षणिक सहसंबंध इत्यादी - 20 गुण

6. विषयज्ञान , सामान्यज्ञान , इंग्रजी विषयज्ञान इत्यादी -15 गुण

7.संप्रेषण कौशल्य  - 15 गुण

              एकूण - 100 गुण

 केंद्र प्रमुख पेपर दोन महत्वपूर्ण अभ्यास संदर्भ

1.केंद्रप्रमुख परीक्षा शालेय शिक्षणातील नियम, अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह-पेपर दोन संपूर्ण मार्गदर्शक- डॉ.शशिकांत अन्नदाते, के'सागर पब्लिकेशन्स (तिसरी आवृत्ती)

         सदर पुस्तकातून पेपर दोन मध्ये समाविष्ट सर्व घटक, उपघटक व प्रमुख मुद्यांची परीक्षभिमुख तयारी करता येईल.

2.केंद्रप्रमुख पेपर दुसरा नवीन अभ्यासक्रमानुसार शिक्षणशास्त्र घटकनिहाय वस्तुनिष्ठ प्रश्न - डॉ.एस.कमल व स्वाती शेटे *(वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या सरावासाठी अत्यंत उपयुक्त संदर्भ)

3.शैक्षणिक व प्रायोगिक मानसशास्त्र-डॉ.ह.ना.जगताप (पाचवी आवृत्ती)

4.शिक्षणातील आधुनिक विचारप्रवाह- डॉ.ह.ना.जगताप

5. शालेय आशयज्ञान करिता शालेय 5 वी ते 12 वी पर्यंतची पुस्तके अभ्यासावीत.

          Best of Luck

(कृपया आपल्या ओळखीच्या सर्व जिल्हा परिषद शिक्षकांना प्रस्तुत लेख share करावा ही विनंती.)

What's Up Group Join 

What's Up Group Join 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad