इ. 5 व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा 2025
करिता ऑनलाईन आवेदन अर्ज
भरण्यास मुदतवाढ ! Msce Pune
शासनमान्य शाळांमधून सन 2024 - 2025 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 5 वी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा व शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षेमध्ये प्रविष्ठ होण्यासाठी तसेच इयत्ता 8 वी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेस प्रविष्ठ होण्यासाठी अधिसूचनेत नमूद केलेल्या अटी पूर्ण करणाऱ्या व या परीक्षेस प्रविष्ठ होण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन आवेदनपत्र परिषदेच् संकेतस्थळावर दिनांक17/10/2024 रोजी पासून उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 8 वी) दिनांक 09 फेब्रुवारी, 2025 करीता शाळा नोंदणी व विद्यार्थी आवेदनपत्र भरण्यासाठी संकेतस्थळावर दिनांक 17/10/2024 रोजीपासून दिनांक 15/12/2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
उपरोक्त विषयानुसार आपणास सविनय सादर करण्यात येते की, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृती परीक्षा (इ. 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) दिनांक 09 फेब्रुवारी, 2025 रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेची अधिसूचना परिषदेच्या www.mscepune.in व https://puppssmsce.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
➤ खालील लिंक वर क्लिक करा
शाळेची नोंदणी झाल्यानंतर शाळेची Login करा
➤ खालील लिंक वर क्लिक करा
• शाळेची नोंदणी फॉर्म
• वर्ग 5 वी विद्यार्थी आवेदन फार्म
• वर्ग 8 वी विद्यार्थी आवेदन फार्म
• वर्ग 5 वी व 8 वी विद्यार्थी आवेदन फार्म
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) रविवार दि. 09 फेब्रुवारी, 2025
ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याबाबतचे वेळापत्रक
सदर अधिसूचना या पत्रासोबत जोडण्यात येत आहे. कृपया सदर अधिसूचनेस राज्यातील प्रमुख वर्तमानपत्रातून, आकाशवाणीवरून व दूरध्वनी केंद्रावरून योग्य ती प्रसिध्दी विनामूल्य देण्यात यावी अशी विनंती आहे.
What's Up Group Join
आपली प्रतिक्रिया व सूचना