मुख्यमंत्री माझी शाळा,
सुंदर शाळा अभियान नोंदणी लिंक सुरू
राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमधील शिक्षक, पालक, विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांच्यात शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी व त्यायोगे स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे आदर्श शाळा योजनेंतर्गत 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' हे अभियान राबविण्याचे प्रस्तावित आहे.
मुख्यमंत्री "माझी शाळा, सुंदर शाळा" अभियान नोंदणी साठी आवश्यक फोटो
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा यांतर्गत भरावयाच्या माहितीसाठी खालील फोटोंची आवश्यकता आहे
1) आधार वैधता, सरल प्रणाली उपयोग, माहिती अद्ययावतीकरण, युडायस प्रणाली वरील नोंदी,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी छायाचित्र सहभाग-
2) महावाचन चळवळ, मागील वर्षी या अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या शपथ/गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मधील सहभाग अनुपालन-
3) शासकीय कार्यक्रमातील सहभाग (उदा. मेरा देश मेरी माटी, ग्रंथालयांचा उपयोग, पाठयपुस्तक,विद्यार्थी मूल्यमापन चाचणी, आयोजन, स्त्री-पुरुष समानता, मतदान प्रचार प्रसार, विविध महत्वपूर्ण विषयांच्या शपथ कार्यक्रम, गणवेश वाटप, तंबाखुमुक्त भारत, कुष्ठरोग निर्मुलन, आनंददायी शनिवार, व्यवहारज्ञान, कृषीघटक इ.) यासह विविध शासकीय शिष्यवृत्ती,सवलती, योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी केलेले प्रयत्न, मतदान प्रचार प्रसार,निवडणूक साक्षरता मंच व स्काऊट गाईड उपक्रम इ.-
4) समिती विविध स्तर (शिक्षक पालक संघ, माता पालक संघ, शिक्षक शाळा सुधारणा, शाळा व्यवस्थापन समिती, शाळा व्यवस्थापन विकास समिती शाळा विकास आराखडा, तक्रार निवारण यंत्रणा, अन्य महत्वाच्या समिती कामकाज, CSR करिता केलेले प्रयत्न, दिव्यांग विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे धोरण)-
5) विद्यांजली पोर्टल
वरील सर्व फोटो PDF 2MB पेक्षा कमी असावेत शिवाय 1000 अक्षरात विवरण असावे
खालील लिंक वर क्लिक करा
School Portal Link
मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा-२
१) स्कूल पोर्टल लॉगिन केल्यानंतर सर्वप्रथम मागील वर्षाची माहिती चेक करून घ्या.
२) ज्या माहती मधे बदल करावयाचा असेल त्याच चेकबॉक्स ला सिलेक्ट करा.
३) बदल करावयाचे चेक बॉक्स सिलेक्ट झाल्यानंतर सबमिट बटणाला क्लिक करा.
४) मुख्य पेज ओपन होईल.
५) उजव्या कोपऱ्यातील मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा बटणाला क्लिक करा
६) माहिती चा फॉर्म ओपन होईल पहिली टॅब चा फोटोचा PDF व माहिती भरा म्हणजे शाळेचे रजिस्टेशन झाले.
शाब्दिक वर्णन
मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा-२ अभियान | शाळा मूल्यांकन वेळापत्रक
• अ) शाळा स्तरावरुन माहिती अंतिम करण्याचा शनिवार दिनांक १०/०८/२०२४ ते शुक्रवार दिनांक ३०/०८/२०२४
• ब) केंद्र स्तर : दि. १०/०८/२०२४ शनिवार (माहिती अंतिम झाली त्यांच्याकरीता) ते दि.०२/०९/२०२४ सोमवार सायं. ०५.०० वाजेपर्यंत
• क) तालुका : दि. १५/०८/२०२४ गुरुवार (केंद्र पातळीवरुन अंतिम झालेली) ते दि. ०४/०९/२०२४ बुधवार सायं. ०५.०० वाजेपर्यंत
• ड) जिल्हा : दि. २०/०८/२०२४ मंगळवार (तालुका पातळीवरुन अंतिम झालेल्या शाळांचे मूल्यांकन) ते दि. ०७/०९/२०२४
• शनिवार सायं. ०५.०० वा. पर्यत
• इ) मनपा : दि. २०/०८/२०२४ मंगळवार (युआरसी पातळीवरुन अंतिम झालेल्यांचे मूल्यांकन) ते दि. ०७/०९/२०२४ शनिवार सायं. ०५.०० वाजेपर्यत
• ई) विभाग : दि. २५/०८/२०२४ रविवार ते दि.१०/०९/२०२४ मंगळवार सायं. ०५.०० वाजेपर्यत
• उ) राज्य: दि.३०/०८/२०२४ शुक्रवार ते दि.१३/०९/२०२४ शुक्रवार सायं. ०५.०० वाजेपर्यत
खालील मार्गदर्शन व्हिडिओ आवश्यक पहा
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा मुद्देसूद 1000 शब्दात टाईप करायची नमुना माहिती...
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा मुद्देसूद 1000 शब्दात टाईप करायची नमुना माहिती...
मुख्यमंत्री माझी शाळा मुद्देसूद 1000 शब्दात टाईप करायची माहिती....
अ(१) विद्यार्थीमार्फत वर्ग सजावट व शाळा सजावट हा उपक्रम अंतर्गत आपल्या शाळेत विद्यार्थी आणि शिक्षक यांनी अवश्य क असलेले वस्तू पासून विविध शैक्षणिक साहित्य तयार करण्यात आले त्या मधुन निवडक शैक्षणिक साहित्य विद्यार्थी व शिक्षक यांनी वर्ग सजावट केली सध्या इमारत दुरुस्ती काम चालू असल्यामुळे शाळा सजावट केली नाही तरी वर्ग सजावट केलेली फोटो आपल्या माहिती करीता सादर करीत आहे या अगोदर वर्ग आणि शाळा रंग रंगोटी करण्यात आले होते.
अ(२) आपल्या शाळेच्या आवारात पर्यावरण संरक्षणास हातभर लावण्यासाठी शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले आहे या मध्ये विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आले माळी व विद्यार्थी कर्मचारी वर्ग या वृक्षाची देखभाल करण्यासाठी सतत प्रयत्न करतात व पर्यावरण जनजागृती साठी शाळेत वृक्षारोपण उपक्रम मान्यवर विद्यार्थी पालक यांना आमंत्रित करण्यात येत आहे शाळेत करण्यात आलेली वृक्षारोपण फोटो आपल्या माहिती करीता सादर करीत आहे.
अ(३) आपल्या शाळा ही इमारत मध्ये भरत आहे आणि इमारतीला पक्का भिंत आहे सध्या इमारत दुरुस्ती चालू आहे या अगोदर संरक्षक भिंती रंगरंगोटी करण्यात आले होते याबाबतची फोटो आपल्या माहिती करीता सादर करीत आहे भिंती वर शासनानेचे योजना दर्शन भागात लिहिले आहे.
अ(४) आपल्या शाळेत भिंती वर चित्र इतर माहिती उभारणी करण्यात आली आहे सध्या इमारत दुरुस्ती काम चालू आहे काही चित्रे सुविचार दरस्तीत खराब झाले आहे भिंती वरील माहिती या बाबती फोटो आपल्या माहिती करीता सादर करण्यात येत आहे.
अ(२) (१) आपल्या शाळेत विद्यार्थी मंत्री मंडळ स्थापन करण्यात आली या मध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिक्षणमंत्री स्वच्छता मंत्री असे विविध खाते बाबत विद्यार्थ्यांना त्यांच्या कामाची माहिती दिली शाळेच्या दैनंदिन कामे सरळीत पार पडण्यासाठी हा उपक्रम घेण्यात आली शाळेच्या मुख्याध्यापकांनी मंत्री मंडळची कामकाज निरिक्षण व मार्गदर्शन करतात आपल्या माहिती करीता शाळेच्या मंत्रिमंडळ फोटो सदर करीत आहे.
अ(२)(२) सध्या आपल्या शाळेचे इमारत दुरुस्ती काम चालू असल्यामुळे प्रधानमंत्री पोषण शक्ती पारसबाग निर्मिती करण्यात आली नाही आपल्या माहिती करीता सादर.
अ(२)(३) आपल्या शाळेत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण हा उपक्रम राबविण्यात येत आहे सदर उपक्रम मध्ये सोमवार ते शनिवार पर्यांत मेनू प्रमाणे विद्यार्थ्यांना महिला मंडळ व्दारे पोषण आहार पुरविणे जाते सदर साक्ष मेनू प्रमाणे आहे की नाही या बाबत शिक्षक स्वता चव घेऊन विद्यार्थ्यांना मदतनीस व्दारे वाटप करण्यात येते हा उपक्रम राबविण्यात आले सदर उपक्रमाचे फोटो आपल्या माहिती करीता सादर करण्यात येत आहे.
अ(२)(४) आपल्या शाळेत मेरी माटी मेरा देश हा उपक्रम राबविण्यात आले या उपक्रमात शाळेतील प्रत्येक वर्गातील विद्यार्थी व शिक्षकांनी माती हातात घेऊन लिंकभरले विद्यार्थ्यांना मातीचा महत्त्व बाबत मार्गदर्शन केले हा उपक्रम राबवताना विद्यार्थी पालक शिक्षक उस्ताहान सहभाग घेतले सदर उपक्रमाचे फोटो आपल्या माहिती करीता सादर करण्यात येत आहे.
अ(२)(५) आपल्या शाळेत पैशाची योग्य विनियोग व व्यवस्थान होण्यासाठी विद्यार्थ्यांना बांका बाबत माहिती दिली चेकबुक पासबुक डी डी एटी एम जमा खर्च या विषयावर चर्चा करण्यात आले प्रत्येक विद्यार्थी प्रतक्ष सर्व बाबी निरिक्षण स्वता केली पैशाची महत्त्व व्यक्त केले आपल्या माहिती करीता सदर उपक्रम सहभाग विद्यार्थी फोटो आपल्या माहिती करीता सादर करण्यात येत आहे.
अ(२)(६) आपल्या शाळेत नवभारत साक्षरता अभियान हा उपक्रम राबविण्यात आले यामध्ये शिक्षक परीसरात गऋहभट देउन साक्षर निरक्षर नमुना भरून मुख्याध्यापकना दिली मुख्याध्यापक शाळेच्या माहिती सी आर सी प्रमुख कडे जमा केले आशा प्रकारे नवभारत साक्षरता उपक्रम राबविण्यात आले या बाबत कार्यशाळेतला सहभाग घेतला उपक्रम फोटो आपल्या माहिती करीता सादर करण्यात येत आहे.
अ(३)(१) आपल्या शाळेतील विद्यार्थीचे उपस्थिती प्रमाण चांगले आहे उपस्थिती वाढविण्यासाठी शनिवार गोष्टी गायन हा उपक्रम राबविण्यात येत आहे विद्यार्थी हा उपक्रम मध्ये स्वता सहभागी होतात आणि मुखामार हा उपक्रम सुद्धा घेण्यात येते शाळेच्या उपस्थित बाबत मासिक पत्रिकेचे फोटो आपल्या माहिती करीता सादर करण्यात येत आहे.
अ(३)(२) आपल्या शाळेत वाचन दिन साजरा करण्यात येत आहे तसेच विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी म्हणून विद्यार्थ्यांना ग्रंथालय वाचन करण्यासाठी दिली जाते व नोंद ठेवण्यात आले आहे या उपक्रमात शाळेतील सर्व इयत्ता मधील विद्यार्थी सहभागी होतात शाळेत वाचन दिनाचे फोटो आपल्या माहिती करीता सादर करण्यात येत आहे.
अ(३)(३) आपल्या शाळेत विद्यार्थी साठी विविध शैक्षणिक स्पर्धा घेण्यात आली या मध्ये वकृत्व स्पर्धा मध्ये सहभागी होऊन आपल्या विद्यार्थ्यांनी प्रमाणपत्र व ट्राफी मिळाली तसेच शाळेत निबंध स्पर्धा विभाग स्तरावर सहभागी झाले विद्यार्थी सन्मानीय महापौर चित्रकला स्पर्धेत सहभाग होउन प्रमाणपत्र मिळालेले आहे या बाबत फोटो आपल्या माहिती करीता सादर करण्यात येत आहे.
अ(३)(४) आपल्या शाळेत स्काऊट गाईड उपक्रम राबविण्यात येत आहे या मध्ये सर्व विद्यार्थी सहभागी होतात दिलेले उपक्रम पूर्ण करतात स्वतंत्र दिन वेळी सहभागी होतात असे प्रकारे आपल्या शाळेत स्काऊट गाईड उपक्रम राबविण्यात येत आहे सदर उपक्रमाचे फोटो आपल्या माहिती करीता सादर करण्यात येत आहे.
ब विभाग
ब (१)(१) आपल्या शाळेत विद्यार्थी व शिक्षक यांच्या आरोग्य तपासणी वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्फत करण्यात आले शाळेतील सर्व इयत्ता मधील विद्यार्थ्यांना वैद्यकीय तपासणी करून मार्गदर्शन करण्यात आले विद्यार्थी आजारी बाबत पालकना सुचेना दिली वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली अहवाल यांची अहवाल फोटो आपल्या माहिती करीता सादर करण्यात येत आहे.
ब (१)(२) आपल्या शाळेत विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या आरोग्य योजनेची लाभ होण्यासाठी शाळेत प्रथमोपचार पेटी उपलब्ध आहे अवश्य पडताना त्याचा उपयोग केला जातो त्या मध्ये अवश्यक साहित्य उपलब्ध आहे प्रथमोपचार पेटी उपलब्ध बाबत फोटो आपल्या माहिती करीता सादर करण्यात येत आहे.
ब (१)(३) आपल्या शाळेत बदलत्या जीवनशैलीमुळे लहान वयात होऊ लागलेल्या लठ्ठपणा मधुमेह डोळ्याचे आजार या वर मार्गदर्शन करण्यात आले या आजार कारण त्या वरील उपाय लक्षात याबाबतची व्हिडिओ दाखविले चर्चा करण्यात आली डोळ्याचे महत्त्व या वर निबंध स्पर्धा घेण्यात आली या मध्ये शाळेतील सर्व विद्यार्थी सहभागी झाले आपल्या माहिती करीता सादर करण्यात येत आहे.
ब (१)(४) आपल्या शाळेत किशोर वयातील विद्यार्थी साठी मासिक पाळी व्यवस्थान या बाबत समुपदेशन सत्राचे आयोजन करण्यात आले या मध्ये शाळेतील सर्व विद्यार्थी सहभागी झाले महिला शिक्षिका या बाबत मार्गदर्शन केले विद्यार्थी सोबत मुक्त चर्चा करण्यात आली या परिस्थितीत काय करावे काय करू नये या बाबत मार्गदर्शन करण्यात आले या उपक्रमात सहभागी होऊन चर्चा केली या बाबत फोटो आपल्या माहिती करीता सदर करण्यात येत आहे.
ब (१)(५) आपल्या शाळेत स्वच्छता अभियान अंतर्गत स्वच्छ हाथ घुण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले व सर्व विद्यार्थी कडून करुन घेण्यात आले हाथ स्वच्छ घुण्याचे फायदा या बाबत मार्गदर्शन केले विद्यार्थी कडून नाटक करून घेतले स्वच्छता महत्त्व या वर निबंध स्पर्धा घेण्यात आली या मध्ये शाळेतील सर्व विद्यार्थी सहभागी झाले या उपक्रम बाबत फोटो आपल्या माहिती करीता सादर करण्यात येत आहे.
ब (२)(१) आपल्या शाळेत विद्यार्थी मध्ये शालेय जीवनापासूनच आर्थिक साक्षरता रूजविण्यसाठी पैशाची गुंतवणूक बँकेच्या व्यवहार कर्ज आर्थिक व्यवहार यु पी आय या बाबत मार्गदर्शन करण्यात आले या उपक्रमात शाळेतील सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते या उपक्रमात बँक मॅनेजर काम बाबत माहिती दिली पासबुक चेकबुक एक टी एम या बाबत मार्गदर्शन केले व प्रात्यक्षिक करून दाखविले व विद्यार्थी कडून करुन घेण्यात आले प्रत्येक विद्यार्थी सहभागी झाले प्रत्येक विद्यार्थी पैशा मोजून एकूण रक्कम सांगितले अशी प्रकारे आपल्या शाळेत उपक्रम राबविण्यात आले या बाबत फोटो आपल्या माहिती करीता सादर करण्यात येत आहे.
ब (२)(२) आपल्या शाळेत विद्यार्थी स्वयं रोजगार व्यवसाय व्यापार उद्योग अशा क्षेत्रात भविष्यात करीयर घडविण्यासाठी विशिस्ष कौशल्यावर शिक्षणाचे महत्त्व या वर मार्गदर्शन करण्यात आले विद्यार्थ्यांना व्हिडिओ दाखविले व या वर चर्चा करण्यात आली आपल्या माहिती करीता सादर करण्यात येत आहे.
ब (३)(१) आपल्या शाळेत भौतिक सुविधा उपलब्ध आहे या मध्ये डिजिटल टीव्ही प्रएजक्टर संगणक प्रिंटर फलक आहे विद्यार्थी अध्ययनात उपयोग साठी भाष पेटी गणित पेटी इंग्रजी पेटी विज्ञान पेटी खेळाचे साहित्य उपलब्ध आहे याचा नियमित वापर करण्यात येत आहे विद्यार्थी हा उपक्रमात सहभागी होऊन आपल्या माहिती सांगतात आपल्या शाळा इमारत मध्ये भरत आहे भौतिक सुविधा उपलब्ध आहे या बाबत फोटो आपल्या माहिती करीता सादर करण्यात येत आहे.
ब (३)(२) आपल्या शाळेत प्रत्येक महिन्याला शाळा व्यवस्थापन समिती सभा घेण्यात येते या मध्ये शाळेतील विद्यार्थी विषय व प्रशासन विषयावर चर्चा करण्यात येत आहे याचा नियमित नोंद ठेवण्यात आली आहे आपल्या माहिती करीता सादर उपक्रम फोटो सादर करण्यात येत आहे.
ब (४)(१) आपल्या शाळेत तंबाखू मुक्त शाळा असे घोषित करण्यात आले आहे तसेच शाळेपासून किमान 200 मीटर अंतरावर तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विक्रीसाठी बंदी आहे या बाबत फलक लेखन शाळेचे गेट समोर भिंतीवर लेखन करण्यात आले आहे आपल्या शाळेत स्वच्छता अभियान अंतर्गत तंबाखू गुटखा सेवनामुळे होणारे परिणाम बाबत चर्चा करण्यात येत आहे सदर उपक्रमाचे फोटो आपल्या माहिती करीता सादर करण्यात येत आहे.
ब (४)(२) आपल्या शाळा प्यास्टीक मुक्त शाळा असे घोषित करण्यात आले आपल्या शाळेत परिसरात प्यास्टीक वापर करु नये या बाबत मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करण्यात आले स्वच्छता अभियान अंतर्गत प्रभातफेरी वेळी प्यास्टीक मुक्त या वर घोषणा करण्यात आली या उपक्रमात सहभागी शाळेतील सर्व विद्यार्थी व शिक्षक होते सदर उपक्रम राबविण्यात आले या बाबत फोटो आपल्या माहिती करीता सादर करण्यात येत आहे.
ब (४)(३) आपल्या शाळेत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत शिल्लक अन्नावर योग्य प्रक्रिया करून विल्हेवाट लावली जात आहे विद्यार्थी हा उपक्रमात सहभागी होऊन आपल्या माहिती सांगतात व दिलेल्या सूचनांचे पालन करतात सदर उपक्रम राबविण्यात आले या बाबत फोटो आपल्या माहिती करीता सादर करण्यात येत आहे.
ब (४)(१) आपल्या शाळेत स्वच्छता अभियान हा उपक्रम राबविण्यात आले या मध्ये शाळेतील सर्व विद्यार्थी सहभागी होऊन हाथ धुण्यासाठी साबण डएटआल वापर करून हाथ दुणयचे प्रात्यक्षिक करून दाखविले इतर विद्यार्थी निरीक्षण करून कृती केली तसेच स्वच्छता आधारित निबंध स्पर्धा घेण्यात आली चित्रकला स्पर्धा घेण्यात आली अशी प्रकारे स्वच्छता उपक्रम राबविण्यात आले या बाबत फोटो आपल्या माहिती करीता सादर करीत आहे.
ब (५)(१) आपल्या शाळेत विद्यार्थीना आपल्या देशातील कोणत्याही एक राज्या निवडण त्या राज्याचेसंस्कृतिक वारसा देश उभारणीसाठी राज्याचे योगदान या उपक्रमात ओडिसा राज्याचे माहिती दिली या मध्ये ओडिसा राज्याचे वेशभूषा सण भाषा आहार या बाबत चर्चा करण्यात आली विद्यार्थी ऐकून प्रश्न विचारून शंका निरसन करून घेतली ओडिसा राज्याचे ओळख वर प्रश्न मंजुष स्पर्धा घेण्यात आली उपक्रम फोटो आपल्या माहिती करीता सादर करण्यात येत आहेत.
ब (६)(१) आपल्या शाळेत विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात आली या मध्ये धावणं फुटबॉल लंगडी रस्सीखेच रस्सईउडइ हीस स्पर्धा घेण्यात आली या मध्ये सर्व विद्यार्थी सहभागी झाले चांगली विद्यार्थी निवड करुन कौतुक करण्यात आले विद्यार्थ्यांना खेळाचे नियम सांगितले विविध स्पर्धा सहभागी घेण्यात मार्गदर्शन केले खेळाचे महत्त्व .या वर चित्रकला स्पर्धा घेण्यात आली सदर उपक्रम राबविण्यात आला आहे या बाबत फोटो आपल्या माहिती करीता सादर करण्यात येत आहे.
ब (५)(१) आपल्या शाळेत विद्यार्थी केंद्रीत उपक्रम राबविण्यात आले येत आहे व शाळा व्यवस्थापन समिती सभा घेण्यात येत आहे त्यांची नोंद ठेवण्यात आले आहे शाळेत अवश्य पडताना माजी विद्यार्थी व पालक स्थानिक लोक यांच्या सहभाग घेण्यात येत आहे शाळेत प्रत्येक वर्गातील विद्यार्थी सहभागी प्रत्येक उपक्रम मध्ये घेण्यात येत आहे पट वाढ करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती मदत घेण्यात येत आहे अश प्रकारे आपल्या शाळेत विद्यार्थी पालक स्थानिक पातळीवर लोकांचे सहभाग घेण्यात येत आहे आपल्या माहिती करीता सदर माहिती सादर करण्यात येत आहे
माझी शाळा 1 नंबर शाळा..
ReplyDeleteआपली प्रतिक्रिया व सूचना