MPSC Exam Student Jobs

 MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी - ‘या’ पद भरतीमध्ये होणार वाढ

 तुम्हाला माहिती असेल, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून दिनांक 11 मे 2022 रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती.मात्र, ही जाहिरात केवळ 161 पदभरतीची होती 

दरम्यान आता MPSC कडून गट ‘अ’ आणि गट ‘ब’ संवर्गातील 340 पदे वाढवण्यात आली आहेत. उपजिल्हाधिकारी, पोलिस उपअधीक्षक या पदांच्या संख्येत ही वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता एकूण 501 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे


वाढलेल्या जागा - गट ‘अ’

● उपजिल्हाधिकारी –  33

● पोलिस उपअधीक्षक –  41

● सहायक राज्यकर आयुक्त -  47

● उपमुख्य कार्यकारी अधिकारी –  14

● उपनिबंधक,सहकारी संस्था –  2

● शिक्षणाधिकारी –  20

● प्रकल्प अधिकारी  –  6

● तहसीलदार –  25

गट ‘ब’ - 

● सहायक गटविकास अधिकारी – 80

● उपअधीक्षक, भूमी अभिलेख – 3

● सहायक निबंधक, सहकारी संस्था – 2

● उपशिक्षणाधिकारी – 25

● सहायक प्रकल्प अधिकारी – 42

MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी - हि माहिती खूप महत्वाची आहे - आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad