Teacher Inter District Transfer Action

आंतर जिल्हा ऑनलाईन बदली प्रक्रियेत चुकीच्या माहिती 
सादर करणारे शिक्षकांवर कारवाई होणार

आंतर जिल्हा ऑनलाईन बदली प्रक्रियेत चुकीच्या माहिती / कागदपत्रांच्या आधारे अर्ज सादर केलेल्या / बदली करून घेतलेल्या शिक्षकांवरील कारवाईबाबत......

जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांसाठी संदर्भीय दि.०७.०४.२०२१ च्या शासन निर्णयान्वये सुधारित धोरण विहित करण्यात आले आहे. सदर धोरणानुसार सन २०२२ मधील जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन प्रणालीद्वारे करण्याची कार्यवाही सुरु आहे. सदर धोरणातील तरतूदीनुसार आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत (बदलीस पात्र असलेल्या / विशेष संवर्ग भाग-१ मधील / विशेष संवर्ग भाग-२ मधील शिक्षकांची यादी, निव्वळ रिक्त पदांची यादी, संभाव्य रिक्त पदांची यादी, जिल्ह्यातील अवघड क्षेत्र घोषित करणे, इत्यादी) वेळोवेळी शासन स्तरावरुन निर्देश देण्यात आलेले आहेत. जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांसाठी ठरविण्यात आलेले धोरण व त्यानुषंगाने वेळेवेळी देण्यात आलेल्या सूचना स्वयंस्पष्ट असून सदर धोरणातील तरतूदीप्रमाणे ऑनलाईन प्रणालीमार्फत अर्ज सादर करण्यासंदर्भात शिक्षकांना वेळेवेळी मार्गदर्शन करण्यात आले आहे.

शासन परिपत्रक डाऊनलोड करा

शासन परिपत्रक

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad