Evaluation Guidelines For Class Nine And Eleventh

वर्ग ९ वी व ११ वी च्या मूल्यमापन

 मार्गदर्शन सूचना

सन 2020 -  2021

संदर्भ:- संचालक,राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र राज्य यांचे पत्र

क्र.जा.क्र.राशैराप्रपम /मुल्यमापन/२ वी ११ वी /२०२१दि.६ एप्रिल,२०२१

प्रस्तावना

कोव्हीड -१९ या विषाणूच्या संसर्गामुळे आणि वाढत्या प्रादुर्भावामुळे कोरोनास जागतिक महामारी म्हणून घोषित केले असल्याने तसेच राज्यातील असाधारण आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता देशात आणि राज्यामध्ये शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये इ.९ वी ते १२ वी च्या शाळा राज्यात उशिराने म्हणजे दि.२३ नोव्हेंबर २०२० पासून सुरु करण्यात आल्या होत्या, तरीही प्रत्येक जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भावाच्या स्थितीनुसार स्थानिक प्राधिका-यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे राज्यात सर्वत्र एकसारख्या शाळा, उच्च माध्यमिक विद्यालये सुरु राहिलेली नाहीत,

 या वस्तुस्थितीवर वरिष्ठ स्तरावर संयुक्त बैठक दि.६ एप्रिल,२०२१ रोजी पार पडली.सदर बैठकीमध्ये इ.९ वी व इ.११ वीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत सांगोपांग चर्चा करण्यात आली. त्यानुषंगाने कोरोनाच्या अपवादात्मक परिस्थितीचा विचार करता विद्यार्थ्यांची परीक्षा घेणे शक्य नसल्यामुळे राज्य मंडळाशी संलग्न असलेल्या राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमाच्या, सर्व शाळांमधील इयत्ता ९ थी व इयता ११ वी ध्या सर्व विद्यार्थ्यांना पुढील वर्गात वर्गोन्नती देण्याची बाब शासनाच्या विधाराधीन होती.

Evaluation Guidelines For Class Nine And Eleventh

शासन निर्णय:

कोरोनाच्या अपवादात्मक परिस्थितीचा विचार करता राज्य मंडळाशी संलग्न असलेल्या राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमाच्या, सर्व शाळांमधील इयत्ता ९ वी व इयत्ता ११ वी च्या सर्व विद्यार्थ्यांना पुढील वर्गात वर्गोन्नती देण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

२ कोरोनाच्या अपवादात्मक परिस्थितीचा विचार करून माध्यमिक शाळा संहितेमध्ये नमूद केल्याप्रमाणे प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापकांनी आपल्या स्तरावर विषय शिक्षकांच्या समिती गठन करून इ. ९ वी व इ.११ वी मधील विद्यार्थ्यांचे शाळेने आयोजित केलेल्या चाचण्यांमधील, प्रात्यक्षिकांमधील, अंतर्गत मूल्यमापनातील अथवा विद्यार्थ्यांना विषयनिहाय चाचण्या/ ट्युटोरिअल घरी सोडविण्यास देऊन अथवा कोणत्याही सोयीच्या मूल्यमापन तंत्राचा वापर करून त्याआधारे विद्यार्थ्यांना गुणांकन देण्याचा निर्णय शाळास्तरावर/ कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर / उच्च माध्यमिक विद्यालय स्तरावर घेण्यात यावा.

मात्र असे करत असताना इयत्ता ९ वी व इयत्ता ११ वी च्या सर्व विद्यार्थ्यांना वर्गोन्नती देण्याचे बंधन शाळांवर राहील.

३. इयत्ता ९ वी व इयत्ता ११ वी च्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर वेगळ्या सत्र नोंदी न करता सदर समितीने विचारात घेतलेल्या मूल्यमापन साधनामधील विषयनिहाय प्राप्त गुणांचा उल्लेख करून प्रचलित

पद्धतीने गुणपत्रक तयार करावे.


 उप सचिव, महाराष्ट्र शासन

शासन परिपत्रक

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad