SSC Maharashtra Board Exam Cancel

 वर्ग दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय

SSC Maharashtra Board Exam

वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांकरिता मोठी बातमी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य सरकारने वर्ग दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

तसेच मात्र, वर्ग बारावीच्या परीक्षा होणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

ते म्हणाले, कोरोनामुळे महाराष्ट्र राज्यात पूर्ण वर्षभर शाळा भरलेल्या नाहीत. अनेक राज्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वर्ग दहावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. 

विद्यार्थ्यांचे आरोग्य दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे  विद्यार्थ्यांची आरोग्य प्रथम प्राधान्य देण्यात येत आहे

त्यामुळे माननीय वर्षा गायकवाड महाराष्ट्र राज्य शिक्षणमंत्री यांनी महाराष्ट्रातही वर्ग दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला.

मूल्यमापन

वर्ग दहावी विद्यार्थ्याकरिता मूल्यमापन मार्गदर्शन सूचना देण्यात येईल

वर्ग दहावी च्या परीक्षेचे गुणांमध्ये समानीकरण यावे यासाठी इतर मंडळाप्रमाणे अंतर्गत मूल्यमापनाच्या  आधारावर गुण देण्यात येणार आहेत. तसंच श्रेणी सुधार हव्या असणाऱ्या विद्यार्थ्यांना संधी केव्हा व कशी द्यायची  

यासंदर्भात लवकरच मार्गदर्शन सूचना जाहीर करण्यात येईल

बारावीच्या परीक्षा होणार

 मात्र, वर्ग बारावीच्या परीक्षा होणार असून, त्याची तारीख काही दिवसात जाहीर केली जाईल.

बारावीची परीक्षा होणार आहे आणि त्यासंदर्भात लवकरच परीक्षेची तारीख जाहीर करण्यात येईल

Post a Comment

आपली प्रतिक्रिया व सूचना

Previous Post Next Post