CET Exam STD Eleventh Admission Application Forms

CET  इ .११ वी ची प्रवेश प्रक्रिया  

परीक्षेची नोंदणीस सुरुवात

इ. ११ वी प्रवेशासाठीच्या शासनाकडून घेण्यात येणाऱ्या  CET परीक्षेबाबतची महत्वाची माहिती!

शैक्षणिक वर्ष सन २०२१-२२ साठी इयत्ता ११ वीची प्रवेश प्रक्रिया राबविताना सामाईक प्रवेश परीक्षा CET घेण्यात येणार आहे.

सामाईक प्रवेश परीक्षा CET 

सन २०२१ - २२ च्या इयत्ता ११ वी प्रवेशासंदर्भात सामाईक प्रवेश परीक्षेचे आयोजन मंडळामार्फत 

शनिवार दिनांक २१ ऑगस्ट, २०२१ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी १.०० या कालावधीत करण्यात येणार आहे.

 सदर परीक्षा ही राज्य मंडळाशी संलग्न असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयातील सन २०२१ - २२ मधील इ. ११ वी प्रवेशासाठी असून ती विद्यार्थ्यासाठी पूर्णत: ऐच्छिक स्वरुपाची आहे.

 सदर परीक्षा ही ऑफलाईन स्वरुपाची असून ती राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमावर आधारीत असेल.

 प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची (Multiple Choice Objective type Questions) व O.M.R. आधारीत असेल.

वेबसाईट सुरू

 सदर परीक्षेसाठी राज्य मंडळ अथवा अन्य मंडळाच्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेमध्ये उत्तीर्ण / प्रविष्ट झालेल्या इच्छूक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या खालील लिंक वर क्लिक करा

 CET परीक्षा फॉर्म नोंदणी

मार्गदर्शन व्हिडीओ Zoom करा

State Board Maharashtra

 Other Board

या संकेतस्थळावरुन आवेदनपत्र सादर करणे आवश्यक आहे. 

आवेदनपत्र भरण्याची सुविधा मंडळामार्फत

 दिनांक २०/०७/२०२१ रोजी सकाळी ११.३० पासून दिनांक २६/०७/२०२१ अखेर उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

 सदर आवेदनपत्र भरण्यासंदर्भात तसेच सामाईक प्रवेश परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांसाठी तपशीलवार सूचना सदर प्रकटनासोबत तसेच मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. तरी, याची विद्यार्थी, पालक व सर्व संबंधित घटकांनी नोंद घ्यावी.

दिनांक 20 जुलै २०२१ पासून CET परीक्षेची आवेदनपत्रे भरण्याकरिता सुरवात होईल

इयत्ता ११ वीची प्रवेश प्रक्रिया राबविताना सामाईक प्रवेश परीक्षा (CET Exam) दिलेल्या विद्यार्थ्यांना सामाईक प्रवेश परीक्षेतील गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्राधान्य देण्यात येईल. म्हणजेच इ. ११ वीच्या प्रवेश प्रक्रियेच्या करिता पहिल्या टप्यामध्ये सामाईक प्रवेश परीक्षा (CET Exam) दिलेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्रथम प्राधान्याने प्रवेश देण्यात येईल.

सामाईक प्रवेश परीक्षा (CET Exam) दिलेल्या विद्यार्थ्याच्या प्रवेशानंतर, कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये रिक्त राहिलेल्या उर्वरित जागा ज्या विद्यार्थ्यांनी सामाईक प्रवेश परीक्षा (CET Exam) दिलेली नाही अशा विद्यार्थ्यांसाठी खुल्या असतील व त्या जागांवर सामाईक प्रवेश परीक्षा (CET Exam) न दिलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता १० वीच्या मुल्यमापन पध्दतीनुसार मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येतील.

वेबसाईट वर विद्यार्थ्यांना Online पद्धतीने भरता येतील.

ही परीक्षा Offline पद्धतीने होणार आहे.

विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र कुठे असेल हे नंतर सांगण्यात येतील.

आपली नोंदणी करताना पोर्टल वर क्लिक केल्यावर विद्यार्थ्यांना आपला बोर्डाचा बैठक क्रमांक भरावा लागेल.

नंतर परीक्षा द्यायची की नाही असे दोन पर्याय दिले जातील.

त्यातील योग्य पर्याय निवडून फॉर्म भरावयाचा आहे.

 इ. ११ वी प्रवेशासाठी असलेल्या CET परीक्षेचे स्वरुप

  • CET परीक्षेसाठी १०० गुणांची एकच प्रश्नपत्रिका / पेपर असेल.
  • परीक्षेचा कालावधी दोन तास राहील.
  • इंग्रजी, गणित, विज्ञान व समाजिक शास्त्र या विषयावर प्रत्येकी 25 प्रश्न विचारले जातील.
  • परीक्षा ऑफलाईन घेण्यात येईल.
  • प्रश्न पत्रिकेचे स्वरुप हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाचे (Multiple Choice Objective Type Questions) असेल.
  • परीक्षा O.M.R. आधारीत असेल.

 विद्यार्थी अपडेट

💁‍♂️ कशी असणार अकरावी प्रवेशाची CET परीक्षा ? - जाणून घ्या खूप महत्वाचे अपडेट

📢 तुम्हाला माहिती असेल, राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी - दहावीचा निकाल लागल्यानंतर अकरावीच्या प्रवेशासाठी CET म्हणजेच प्रवेश परीक्षा घेण्यात येईल अशी घोषणा केली होती

⏲️ त्यानुसार  दिनांक 20 जुलैपासून यासाठीची नोंदणी प्रक्रिया सुरू होत आहे - तर ही परीक्षा ऑगस्टमध्ये होणार असल्याने ही परीक्षा नक्की कशी असणार? याबबाबत विद्यार्थ्यांना बरेच प्रश्न पडत आहेत

💁‍♂️ कशी असणार CET परीक्षा 

🔰 शिक्षणमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार - ही परीक्षा पूर्णपणे दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असणार, या परीक्षेच्या मार्क्सवरच विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश मिळणार आहे

🔰 तसेच ही परीक्षा एकूण 100 मार्कांची असणार - यात इंग्रजी, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या विषयांवर प्रत्येकी 25 मार्कांचे प्रश्न विचारले जाणार आहेत

🔰 त्यानुसार प्रवेश परीक्षेसाठी 100 गुणांची एकच प्रश्नपत्रिका असणार आहे - हि परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेतली जाणार असून या परीक्षेचा कालावधी दोन तासांचा असणार आहे 

🔰 त्याचबरोबर विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर जाऊन ही परीक्षा द्यावी लागणार आहे - तर परीक्षेसाठी परीक्षा केंद्रांची यादी राज्य मंडळ किंवा परीक्षा परिषदेमार्फत जाहीर करण्यात येणार आहे

🔰 याशिवाय ज्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेचे शुल्क भरले त्यांच्याकडून CET साठी शुल्क आकारण्यात येणार नाही - तसेच जे विद्यार्थी ही प्रवेश परीक्षा देऊ इच्छित नाही

विद्यार्थी करिता सूचना


सविस्तर मार्गदर्शन

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.