Syllabus From Class First To Class Twelve Reduced

शिक्षण विभागाचा मोठा निर्णय ! 

इ. १ ली ते १२ वी च्या अभ्यासक्रमात २५ टक्के कपात

इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंत
  पाठ्यक्रम कमी होणार  मा.शिक्षणमंत्री

शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी वर्ग 1ली ते इयत्ता 12 वी  पाठ्यक्रम २५ % कमी करणे बाबत

2021 -2022 या शैक्षणिक वर्षासाठी 25 % कमी केलेला अभ्यासक्रम...



प्रस्तावना:

मार्च २०२० पासून कोविड १९ या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव संपूर्ण जगामध्ये झालेला आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार मार्च २०२० पासून राज्यामध्ये सर्व शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आलेले आहेत. दरवर्षी साधारणतः जून मध्ये सर्व राज्यामध्ये शैक्षणिक वर्ष सुरु होत असते. तथापि सन २०२१-२२ मध्ये नेहमीप्रमाणे शाळा सुरु करता आलेल्या नाहीत. वेळेवर शाळा सुरु करता न आल्यामुळे विहीत वेळेत पाठ्यक्रम पूर्ण करणेबाबत समस्या निर्माण होऊ शकते. त्याअनुषंगाने राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांचा इयत्ता १ ली ते १२ वी चा पाठ्यक्रम सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाकरिता कमी करणेबाबतची बाब शासनाच्या विचाराधीन होती. 

शासन निर्णय:

कोविड १९ या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव सद्य परिस्थितीतही कमी झालेला दिसून येत नाही. या अनुषंगाने सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाकरिता इयत्ता १ ली ते इयत्ता १२ वी चा २५ % पाठ्यक्रम कमी करण्यात आला होता. सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाकरिता सुद्धा सन २०२०-२१ प्रमाणे २५% पाठ्यक्रम कमी करण्यास याद्वारे शासन मान्यता देण्यात येत आहे.

 सदर कमी केलेल्या पाठ्यक्रमाची यादी

संचालक, राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद, महाराष्ट्र, पुणे यांनी त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी तसेच याबाबत शाळांना, विद्यार्थ्यांना तसेच पालकांना अवगत होण्यासाठी आवश्यक प्रसिध्दी द्यावी.

अभ्यासक्रम कमी डाऊनलोड करा


इयत्ताडाउनलोड
1. इ 1 ली ते 8 वी.              Download
2.इयत्ता 9 ते 10Download
3.इयत्ता 9,10 गणितDownload
4.इयत्ता 11, 12Download
5.इयत्ता 12 वीDownload
6.इयत्ता 1 ते 8  Download
7    

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad