Diwali Holiday To School Declared

0 श्री डि जे राठोड

शिक्षकांसाठी आनंदाची बातमी! कमी झालेल्या दिवाळीच्या सुट्ट्यांबाबत शिक्षण विभागाचा महत्त्वाचा निर्णय

राज्यातील इयत्ता १ ली ते १२ वी च्या शाळांना विविध धार्मिक सण / उत्सवांकरीता सुट्ट्या घोषित करण्यात येत असतात.

राज्यातील शहरी व ग्रामीण भागातील 

शाळा दिनांक ०४/१०/२०२१ पासून ऑफलाईन स्वरूपात सुरू झाल्या आहेत. 

 २. सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षामध्ये दिवाळी सणाच्या अनुषंगाने राज्यातील शाळांना दिनांक २८ ऑक्टोबर २०२१ ते दिनांक १० नोव्हेंबर २०२१ या कालावधीत सुट्टी घोषित करण्यात येत आहे. या कालावधीत शाळांमार्फत घेण्यात येणारे ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने सुरू असलेले अध्यापनाचे कामकाज बंद राहील. 

विद्यार्थ्यांना दिवाळीच्या एकूण 14 दिवस सुट्ट्या मिळणार आहेत - असे शिक्षण मंडळाने सांगितले 

तसेच, दिनांक ११/११/२०२१ पासून नियमित शाळा सुरू करण्याचे निर्देश आहेत.

 दिनांक १२/११/२०२१ रोजी राज्यात राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (NAS) परीक्षा आयोजित करण्यात आलेली आहे. उपरोक्त संदर्भिय परिपत्रकामुळे दिवाळीच्या सुट्ट्या कमी झाल्या असतील तर दरवर्षी शासकीय नियमाप्रमाणे अनुज्ञेय असणाऱ्या सुट्ट्या राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (NAS) परीक्षा झाल्यानंतर किंवा नाताळच्या काळात किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये स्थानिक स्तरावर निर्णय घेवून समायोजित कराव्यात. सदरील पत्र हे सर्व संबंधित शाळांना लागू राहील.

शासन परिपत्रक

       दिवाळी अभ्यास

 ३. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

About Us

डिजिटल BRC Smart E - Learning, Test Online, Educational, General Knowledge , Scholarship Tips Include in My Website. Education Contain and Much more in My Website