संकलित मूल्यमापन चाचणी-1 (PAT-2) 2026-27 आयोजनाबाबत! परिपत्रक निर्गमित
सन २०२६ - २७ या शैक्षणिक वर्षात नियतकालिक मूल्यांकन चाचणी मधील संकलित मूल्यमापन चाचणी -१ (PAT - २) च्या आयोजनाबाबत...
१. राज्यातील शिक्षणपध्दतीचे अध्यापन, अध्ययन व परिणाम यांचे बळकटीकरण (Strengthening Teaching-Learning And Results for States) केंद्रपुरस्कृत प्रकल्प मान्यता देण्याबाबत शासन निर्णय, दिनांक ११ फेब्रुवारी २०२१.
२. केंद्रीय प्रकल्प मंडळाच्या बैठकीचे (PAB) चे इतिवृत्त दि. १६/०६/२०२६
उपरोक्त संदर्भ क्र.१ व २ अन्वये सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी खालील नियतकालिक मूल्यांकन चाचण्याचे (PAT) आयोजन करण्याकरिता मंजुरी देण्यात आलेली आहे. त्यानुसार सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात संकलित मूल्यमापन चाचणी १ व संकलित मूल्यमापन चाचणी-२ अशा दोन नियतकालिक चाचण्यांचे नियोजन करण्यात येणार आहे. नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत संकलित चाचणी -१ माहे नोव्हेंबर २०२६ च्या शेवटच्या आठवड्यात आयोजित करण्यात येत आहे.
सदर चाचणी अंतर्गत प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या विषयांच्या इयत्ता दुसरी ते आठवीतील विद्यार्थ्यांची चाचणी होणार आहे.
प्रत्येक विद्यार्थ्याने इयत्तानिहाय अपेक्षित अध्ययन संपादणूक प्राप्त केली आहे किंवा नाही याची पडताळणी होऊन अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ होण्यास या चाचणीमुळे शिक्षकांना मदत होईल. चाचण्यांचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांनी अध्ययन निष्पत्ती किती प्रमाणात प्राप्त केलेल्या आहेत हे शिक्षकांनी लक्षात घेऊन गरजेनुरूप अध्ययन अध्यापन प्रक्रियेत मूलभूत
सुधारणा करणे व कृती-कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे हा आहे. सदर चाचण्या इयत्ता १० वी व १२ वी बोर्ड परीक्षेप्रमाणे
नाहीत, यामुळे विद्यार्थ्यांना याचा अतिरिक्त ताण देऊ नये.
संकलित मूल्यमापन १ चाचणी उद्देश/उपयोग/फायदे :-
१) अध्ययनाचे मूल्यमापन या तत्वाकडून अध्ययनासाठी मूल्यमापन या तत्वाकडे वळणे.
२) विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पती संपादणूक पडताळणे व त्यामध्ये वाढ करणे.
३) अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ होण्यास मदत करणे.
४) राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (NAS) मधील संपादणूक वाढविण्याच्या दृष्टीकोनातून मदत करणे.
५) अध्ययनात मागे असणा-या विद्यार्थ्यांना पुढे नेण्याच्या दृष्टीकोनातून कृतिकार्यक्रम तयार करणे व अंमलबजावणीस दिशा देणे,
६) इयत्ता व विषयनिहाय अध्ययन निष्पत्तीमधील राज्याची संपादणूक स्थिती समजण्यास मदत होणे.
नियतकालिक मूल्यांकन चाचण्या (PAT) कालावधी
नियतकालिक मूल्यांकन चाचणी प्रकार
१.अंदाजित कालावधी प्रथम सत्र
संकलित मूल्यमापन चाचणी, सत्र - १
माहे नोव्हेंबर २०२६ (शेवटचा आठवडा)
२. अंदाजित कालावधी द्वितीय सत्र
संकलित मूल्यमापन चाचणी, सत्र - २
माहे एप्रिल २०२७
संकलित मूल्यमापन चाचणी १ चे माध्यम व विषय :
सदर चाचणी ही एकूण दहा माध्यमात होईल. प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या तीन विषयांची इयत्ता
२ री ते ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी चाचण्यांचे आयोजन करण्यात येणार आहे.
संकलित चाचणी- १ चा अभ्यासक्रम :
प्रचलित पद्धतीनुसार भाषा, गणित व इंग्रजी करिता प्रथम संत्रात अभ्यासक्रम / अध्ययन निष्पत्ती / मुलभूत क्षमता यावर आधारित असेल
शालेय वेळापत्रकानुसार सकाळ सत्र / दुपार सत्र नुसार उपरोक्तप्रमाणे आपल्या स्तरावरून वेळेचे नियोजन करण्याचे स्वातंत्र्य देण्यात येत आहे. तसेच प्रथम भाषा (सर्व माध्यम), गणित (सर्व माध्यम व तृतीय भाषा इंग्रजी या विषयांची तोंडी परीक्षा ही त्या त्या दिवशी लेखी परीक्षेनंतर वैयक्तिक स्वरुपात घेण्यात यावी. तसेच विद्यार्थी संख्या जास्त असेल तर दुसऱ्या दिवशी आपल्या उपलब्ध वेळेनुसार घ्यावी.
What's Up Grotup Join
➤ What's Up Group Join


आपली प्रतिक्रिया व सूचना