Senior And Selection Grade Training Online Apply Registration Information

वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण२०२६ 

ऑनलाईन नावनोंदणी सुरू

वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण- २०२६ करिता ऑनलाईन नावनोंदणी करणेबाबत

संदर्भ:-१. मा. संचालक, रा.शै.सं.प्र.प.म.पुणे यांचेकडील जा.क्र. राशैसंप्रपम/सेवापूर्व/व.नि.प्र.२०२६/५०८ दि.०८/०९/२०२६ चे पत्र

२. मा. संचालक, रा.शै.सं.प्र.प.म.पुणे यांचेकडील जा.क्र. राशैसंप्रपम/सेवापूर्व/व.नि.प्र.२०२६/दि.२०/०४/२०२६ चे पत्र

३. या कार्यालाकडील जा.क्र. जिशिप्रसंवे/सेवापूर्व शिक्षण/व.नि. श्रेणी प्रशि./२०२६-२७/२३९ दि. २०/०४/२०२६ चे पत्र

उपरोक्त विषयानुसार दरवर्षी वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाचे आयोजन माहे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केले जाते. मात्र भारताची जनगणना २०२७ चा पहिला टप्पा दि. १६ मे २०२६ से १४ जून २०२६ या कालवधीत होता व या राष्ट्रीय कार्यासाठी (घरगणना) राज्यातील बहुतांश शिक्षकांची नियुक्ती झालेली होती. 


त्यामुळे सदरील प्रशिक्षण जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आयोजित करता आले नाही. 

यास्तव सदरहू प्रशिक्षण माहे नोव्हें. २०२६ मध्ये दीपावलीच्या सुट्टीत आयोजित करावयाचे आहे. प्रशिक्षण दीपावलीच्या सुट्टीत आयोजित करावयाचे असल्याने राज्यातील ज्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षकांची दि ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत अर्हताकारी सेवेची १२/२४ वर्षे पूर्ण झालेली आहे असे शिक्षक तसेच दि. ३० जून २०२७पर्यंत सेवानिवृत्त होणारे असे काही शिक्षक, मुख्याध्यापक हे १२/२४ वर्षे अर्हताकारी सेवा पूर्ण करीत आहेत आणि ते या कालावधीत सेवानिवृत होणार आहेत फक्त असे शिक्षक/ मुख्याध्यापक प्रशिक्षणासाठी पात्र असून या शिक्षकांना वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षण घेता यावे यासाठी दिनांक ०९/०९/२०२६ रोजी सकाळी ११.०० वाजेपासून दिनांक १६/०९/२०२६ रोजी संध्याकाळी ६.०० पर्यंत प्रशिक्षण नोंदणी करता येणार आहे.

संदर्भ क्र. २ अनुसार माहे एप्रिल व मे २०२६ मध्ये वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण-२०२६ साठी ज्या शिक्षकांनी ऑनलाईन नोंदणी केलेली आहे, अशा शिक्षकांनी पुन्हा ऑनलाईन नोंदणी करावयाची आवश्यकता नाही

दि. २० जुलै २०२१ च्या शासन निर्णयानुसार वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतन श्रेणीसाठी पात्र होणेकरिता वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण पूर्ण करणे अनिवार्य आहे.

वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षणाचे नियोजन व सनियंत्रणाची जबाबदारी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडे सोपवण्यात आली आहे. त्यानुसार सदर प्रशिक्षणासाठी ऑनलाईन नाव नोंदणीकरिता परिषदेमार्फत पोर्टल विकसित करण्यात आलेले आहे. या पोर्टलवर प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय तसेच

कला व शारीरिक शिक्षक (मान्यताप्राप्त) या चार गटातील पात्र शिक्षकांना नाव नोंदणी करणेसाठी सोबतच्या संदर्भिय पत्रातील सूचनांनुसार कार्यवाही करावी. (नोदणीबाबतचा सर्व तपशील संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

खालील लिंक वर क्लिक करा 

➤ 1) खालील लिंक वर क्लिक करा 

खालील लिंक वर क्लिक करा 

➤ 1) खालील लिंक वर क्लिक करा 

तरी सदर सूचना आपल्या अधिनस्त कार्यक्षेत्रातील चारही गटातील शिक्षक संवर्गातील संबंधितांना आपल्या स्तरावरुन निदर्शनास आणून द्याव्यात. तसेच सदर प्रशिक्षणासाठी पात्र असलेल्या शिक्षकांना संदभीय पत्रातील सूचनांनुसार नाव नोंदणी करण्यास अवगत करण्यात यावे.

What's Up Grotup Join 

➤ What's Up Group Join 

What's Up ग्रुप जॉईन करा
WhatsApp GroupJoin Now

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.