माध्य व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी कला- उत्सव 2021 आयोजन
राज्यातील सर्व माध्यमाच्या, सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील इयत्ता ९ वी ते १२ वी चे विद्यार्थी
माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांमधील प्रतिभा ओळखून त्यांच्या मधील कलागुणांना वाव देण्यासाठी शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय,नवी दिल्ली यांच्यामार्फत कला उत्सवाचे दरवर्षी आयोजन करण्यात येत आहे. सन 2021-22 मध्ये केंद्र शासनाने कला उत्सवाच्या आयोजनामध्ये शास्त्रीय गायन, पारंपारिक गायन, शास्त्रीय संगीत वादन, पारंपारिक लोकसंगीत वादन, शास्त्रीय नृत्य, पारंपरिक लोकनृत्य, द्वीमितीय चित्र, त्रिमितीय चित्र/शिल्प व खेळणी तयार करणे या ९ कला प्रकारांचा समावेश केलेला आहे. या सर्व प्रकारांमध्ये ऑनलाईन स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे.
विद्यार्थी चे कला गुणांना वाव
कला उत्सवामध्ये राज्यातील सर्व माध्यमाच्या,सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील ९ वी ते १२ वी मध्ये शिकणारे विद्यार्थी सहभागी होऊ शकतील. सर्व कला प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांचा वैयक्तिक (Solo)सहभाग असणार आहे.
कोणत्याही कला प्रकारच्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली निकषात नमूद केल्यानुसार ४ ते ६ मिनिटांचा व्हिडीओ मोबाईल अथवा कॅमेराद्वारे तयार करावा.
तयार केलेला व्हिडिओ व त्यासोबत कला सादर करतानाचे वेगवेगळे ५ फोटो विद्यार्थ्यांने स्वतच्या/पालक/शिक्षकाच्या फेसबुक, इंस्टाग्राम, ट्वीटर किंवा यु-टूब अकाऊंट वरून #kalautsavmah२०२१
या हॅशटॅगचा वापर करून दि. १३ नोव्हेंबर २०२१ संध्याकाळी ५ वाजेपर्यंत पोस्ट करावा. फेसबुक, इंस्टाग्राम,ट्वीटर किंवा यु-टूब अकाऊंट वरून व्हिडीओ पोस्ट करताना प्राप्त झालेली कोणतीही एक लिंक Copy करून ठेवावी.
तदनंतर विद्यार्थ्यांने आपली नोंदणी
नोंदणी करा
या पोर्टल जाऊन करावी. व्हिडीओ पोस्ट करताना प्राप्त झालेली कोणतीही एक लिंक पोर्टलवर माहिती भरताना योग्य ठिकाणी Paste करावी. पोर्टलवर नोंदणी करताना सर्व माहिती विद्यार्थ्यांने बिनचूक व पूर्ण भरावी.
प्रत्येक जिल्ह्यामधून प्रत्येक कला प्रकारात सर्वोत्कृष्ट १ विद्यार्थी व १ विद्यार्थिनी अशा ९ कला प्रकारात १८ विद्यार्थ्यांची निवड ठरवून दिलेल्या निकषानुसार गुणदान करून केली जाईल.
प्रत्येक जिल्ह्यातून निवडण्यात आलेल्या सर्वोत्कृष्ट स्पर्धकांमधून प्राप्त झालेली नामनिर्देशने व व्हिडिओ यांची तपासणी राज्यस्तरीय तज्ञ समितीमार्फत करण्यात येईल.
तदनंतर राज्यस्तरावर समितीमार्फत निवडलेले सर्वोत्कृष्ट स्पर्धक Online /प्रत्यक्ष सादरीकरण करतील. यामधून प्रत्येक कलाप्रकारासाठी १ विद्यार्थी व १ विद्यार्थिनी अशा ९ कलाप्रकारामध्ये १८ विद्यार्थ्यांची अंतिम निवड राज्यस्तरावर करून राष्ट्रीय स्तरावर त्यांची नामनिर्देशाने पाठविण्यात येतील.
राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा ह्या online पद्धतीने होणार आहेत. राष्ट्रीय स्तरासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना याबाबत स्वतंत्रपणे कळविले जाईल
उपरोक्त विषय व संदर्भीय पत्रानुसार, माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांमधील प्रतिभा ओळखून त्यांच्या मधील कलागुणांना वाव देण्यासाठी शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय, नवी दिल्ली यांच्यामार्फत सन २०१५- १६ पासून कला उत्सवाचे दरवर्षी आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये देशातील सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेश आपला सहभाग नोंदवितात. सन २०२१-२२ मध्ये केंद्र शासनाने कला उत्सवाच्या आयोजनामध्ये शास्त्रीय गायन, पारंपारिक गायन, शास्त्रीय संगीत वादन, पारंपारिक लोकसंगीत वादन, शास्त्रीय नृत्य, पारंपारिक लोकनृत्य, द्वीमितीय चित्र, त्रिमितीय चित्र/शिल्प व स्थानिक खेळणी तयार करणे या ९ कला प्रकारांचा समावेश केलेला आहे. त्यामुळे सन २०२१- २२मध्ये राज्याच्या ९ कला प्रकारांचे ९ संघ राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या ऑनलाइन कला उत्सवासाठी दिनांक १० डिसेंबर २०२१ पर्यंत नामनिर्देशित करावयाचे आहेत. राज्याच्या संघ निवडीसाठी वर नमूद कला प्रकारांमध्ये ऑनलाईन स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे.
कला उत्सवामध्ये राज्यातील सर्व माध्यमाच्या, सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील ९ वी ते १२ वी मध्ये शिकणारे विद्यार्थी सहभागी होऊ शकतील. सर्व कला प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांचा वैयक्तिक (Solo) सहभाग असणार आहे. कला उत्सव स्पर्धेचे निकष सोबत जोडण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी या स्पर्धेबाबतच्या मार्गदर्शक सूचना http://www.kalautsav.in या वेबसाईटवर उपलब्ध आहेत.
- 1. शास्त्रीय गायन
- 2. पारंपारिक गायन
- 3. शास्त्रीय संगीत वादन
- 4. पारंपारिक लोकसंगीत वादन
- 5. शास्त्रीय नृत्य
- 6. पारंपरिक लोकनृत्य
- 7. द्वीमितीय चित्र
- 8. त्रिमितीय चित्र
- 9. शिल्प व खेळणी
विद्यार्थ्यांसाठी सूचना:
एक विद्यार्थी केवळ एका कला प्रकारातच सहभाग घेऊ शकतो.
सहभागी स्पर्धकांनी सोबत जोडलेल्या निकषांचे वाचन करावे.
कोणत्याही कला प्रकारच्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तयारी केलेली असावी. व्यावसायिक कलाकारांचा सहभाग अथवा त्यांची मदत घेता येणार नाही, असे निदर्शनास आल्यास सदरील प्रवेशिका रद्द केली जाईल.
निकषात नमूद केल्यानुसार ४ ते ६ मिनिटांचा व्हिडीओ मोबाईल अथवा कॅमेराद्वारे तयार करावा.
व्हिडिओमधील चित्र व आवाजात स्पष्टता असावी. तयार केलेला व्हिडीओ व सोबत कला सादर करतानाचे ५ फोटो विद्यार्थ्यांने स्वतच्या/पालक / शिक्षकाच्या फेसबुक, इंस्टाग्राम, द्वीटर किंवा यु-टूब अकाऊंट वरून #kalautsavmah2021
या हॅशटॅगचा वापर करून दिनांक १३ नोव्हेंबर २०२१ संध्याकाळी ५ वाजेपर्यंत पोस्ट करावा.
व्हिडीओ पोस्ट करताना
- विद्यार्थ्यांने आपले नाव,
- इयत्ता, शाळेचा पत्ता, शाळेचा Udise क्रमांक,
- तालुका, जिल्हा,
- Email आय. डी. संपर्क क्र.
- व भाग घेत असलेला कला प्रकार इ. उल्लेख करावा.
पोस्ट Public असावी, ई-मेल पत्ता स्वतःचा नसेल तर पालक / शिक्षक यांचा ई-मेल वापरावा. फेसबुक, इंस्टाग्राम,द्वीटर किंवा यु टूब अकाऊंट वरून व्हिडीओ पोस्ट करताना प्राप्त झालेली कोणतीही एक लिंक Copy करून ठेवावी.
तदनंतर विद्यार्थ्यांने आपली नोंदणी
नोंदणी करा
या पोर्टल जाऊन करावी. नोंदणी मधील सर्व माहिती विद्यार्थ्यांने बिनचूक व पूर्ण भरावी.
• ही नोंदणी करताना फेसबुक, इंस्टाग्राम, वीटर किंवा यु टूब अकाऊंटवर व्हिडिओ पोस्ट करताना यापैकी प्राप्त झालेली कोणतीही एकच link नमूद केलेल्या ठिकाणी Paste करावी.
एका स्पर्धेसाठी एका विद्यार्थ्यांची एकच पोस्ट असावी. आपल्या सादरीकरणाची पूर्ण जबाबदारी स्पर्धकाची असेल. .
एका वेळी एका पोस्टमध्ये एकाच विद्यार्थ्यांचे / पाल्याचे एकाच स्पर्धेचे साहित्य अपलोड करावे. एकापेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे साहित्य अपलोड केल्यास/पोस्ट केल्यास सदर प्रवेशिका ग्राह्य घरली जाणार नाही.
विद्यार्थ्यांच्या / पाल्याच्या व्हिडीओ सादरीकरणामध्ये कोणताही चुकीचा आशय / आक्षेपार्ह विधान Update केले जाणार नाही याची दक्षता घ्यावी.
#kalautsavmah2021 हा हॅशटॅग लिहिताना अक्षरात कोठेही स्पेस देऊ नये, हॅशटॅगचे स्पेलिंग चुकवू नये.
शाळा मुख्याध्यापकांसाठी संयुक्त सहीचे एक परिपत्रक त्वरीत निर्गमित करुन कला उत्सवाबाबतची माहिती आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांना द्यावी.
. राज्यभरातून प्राप्त झालेली नामनिर्देशने व व्हिडीओ याची यादी राज्यस्तरावरून जिल्हानिहाय, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थाना दिनांक १५ नोव्हेंबर २०२१ रोजी पुरविले जाईल.
• प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांनी जिल्ह्यातील प्राप्त नामनिर्देशनामधून योग्य विद्यार्थ्याच्या निवडीसाठी प्रत्येक कलाप्रकारनिहाय दोन परीक्षकांची एक निवड समिती जिल्हास्तरावर स्थापन करावी. (एकूण ९ कला प्रकार)
दिनांक १७ व १८ नोव्हेंबर २०२१ रोजी (प्रवेशिकांच्या संख्येनुसार नुसार १/२ दिवस) राज्यस्तरावरून पुरविलेल्या व्हिडीओचे परीक्षण करून परीक्षकांनी जिल्हास्तरावर प्रत्येक कला प्रकारात सर्वोत्कृष्ट १ विद्यार्थी व १ विद्यार्थिनी अशा ९ कला प्रकारात १८ विद्यार्थ्यांची निवड ठरवून दिलेल्या निकषानुसार गुणदान करून करावी. (सोबत कला प्रकार निहाय निकष व गुणदान तक्ते जोडले आहेत.)
मुंबई शहर व उपनगरामधील विद्यार्थी निवडीची प्रक्रिया प्राचार्य, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबई
यांनी करावी.
• जिल्हास्तरावरील कलाप्रकार निहाय सर्वोत्कृष्ट म्हणून निवडलेल्या मुलांची नावे या कार्यालयास
दि. २३ नोव्हेंबर २०२१ रोजी संध्या. ५.०० पर्यंत कळवावी.
• जिल्हास्तरावरील परीक्षकांना मानधन रु.५००/ प्रतिदिन प्रस्तावित आहे. जिल्हास्तरावर
दिलवार खर्चासाठी रुपये १०००/- इतकी रक्कम प्रस्तावित आहे.
• जिल्हास्तरावरील खर्चाच्या सर्व पावत्या शिक्के मारून पूर्ण हिशोब तसेच उपयोगिता प्रमाणपत्र
पोस्टाने या कार्यालयास दिनांक २५ नोव्हेंबर २०२१ पर्यंत पाठविण्यात यावेे
• हिशोब प्राप्त झाल्यावर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांच्या खात्यावर सदर रक्कम वर्ग करण्यात येईल.
जिल्हास्तरावरून निवडण्यात आलेल्या सर्वोत्कृष्ट संघामधून राज्याच्या संघ निवडीसाठी प्राप्त नामनिर्देशने व व्हिडिओ यांची तपासणी राज्यस्तरीय तज्ञ समितीमार्फत करण्यात येईल. राज्यस्तरीय सादरीकरणातून प्रत्येक कलाप्रकारासाठी १ विद्यार्थी व १ विद्यार्थिनी अशा ९ कलाप्रकारामध्ये १८ विद्यार्थ्यांची अंतिम निवड करून राष्ट्रीय स्तरावर त्यांची नामनिर्देशाने पाठविण्यात येतील. राज्यस्तरावरून राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या स्पर्धकांना पुन्हा राज्यस्तरावर Online / प्रत्यक्ष सादरीकरण करावे लागेल. याबाबतची माहिती स्वतंत्रपणे कळविली जाईल. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा ह्या ऑनलाइन पद्धतीने होणार असल्याने निवड झालेल्या विद्यार्थ्यांना याबाबतही स्वतंत्रपणे कळविले जाईल
राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा
अधिक माहितीसाठी श्री. सचिन चव्हाण, उपविभाग प्रमुख मो. क्र. ९६२३०२७४५३ व श्रीम. पद्मजा लामरुड, विषय सहायक, मो.क्र. ९८२२०९६१०७ कला व क्रीडा विभाग या क्रमांकावर संपर्क साधावा.
सोबत: कला प्रकार निहाय निकष व गुणदान तक्ते.
•जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांच्यासाठी
• जिल्ह्यातील सर्व पात्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांनी कला उत्सवामध्ये सहभागी व्हावे यासाठी प्राचार्य, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था व शिक्षणाधिकारी (माध्य.) यानी

आपली प्रतिक्रिया व सूचना