Intra District Zilla Parishad Teachers Transfer

जिल्हा परिषद शिक्षकांच्या

जिल्हांतर्गत बदल्यांबाबत

दिनांक 12 ऑक्टोबर 2022 रोजी चे शासन परिपत्रक

 शिक्षक जिल्हा अंतर्गत बदली संदर्भात नवीन शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे

२. शासनाच्या संदर्भीय क्र. २) येथील दि.०७.०४.२०२१ च्या शासन निर्णयान्वये विहीत करण्यात आलेल्या सुधारित धोरणानुसार जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांची प्रक्रिया राबविण्यात आली आहे. 

आता, शासनाच्या संदर्भीय क्र. १) येथील शासन निर्णयान्वये विहीत करण्यात आलेल्या सुधारित धोरणानुसार जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबतची कार्यवाही सुरु करण्यात येणार आहे.

 सदर शासन निर्णयात नमूद केल्यानुसार बदलीस पात्र असलेल्या शिक्षकांना “

 विवरण पत्र -१ बदलीस पात्र शिक्षक' मध्ये (पृष्ठ क्र. १७ वर) नमूद केल्याप्रमाणे अ) (मला बदली नको असून प्रशासकीय बाबीमुळे माझी बदली होत असल्यास, बदलीने नियुक्तीसाठी माझा खालील प्राधान्यक्रम विचारात घ्यावा) 

किंवा आ) (मला बदली हवी असून विनंतीने बदलीसाठी माझा खालील प्राधान्यक्रम विचारात घ्यावा) या पर्यायापैकी एक पर्याय निवडण्याची मुभा असून अशा शिक्षकांनी कोणताही पर्याय न निवडल्यास संबंधित शिक्षक प्रशासकीय बदलीसाठी पात्र राहतील, अशी तरतूद आहे.

३. जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबत दिनांक ०७/१०/२०२२ रोजी जिल्हा परिषद शिक्षक बदली अभ्यास गटासमवेत व्हीसीद्वारे बैठक आयोजित केली होती. 

सदर बैठकीतील चर्चेच्या अनुषंगाने जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदलीबाबतच्या संदर्भीय क्र.१) येथील

 दिनांक ०७/०४/२०२१ च्या शासन निर्णयाचे विवरण पत्र - १ बदलीस पात्र शिक्षक" बाबत खालीलप्रमाणे अधिकचे स्पष्टीकरण देण्यात येत आहे :

जर एखाद्या शिक्षकांने सदर विवरण पत्र १ मध्ये नमूद केलेला उक्त अ) येथील पर्याय निवडल्यास, अशा शिक्षकांच्या प्रशासकीय बाबीमुळे होत असलेल्या बदलीवेळी उपलब्ध असलेल्या रिक्त जांगी, अशा शिक्षकांची बदली होईल. 

सदर बदली पूर्णतः प्रशासकीय असल्याने अशा शिक्षकांना त्यांच्या प्राधान्यक्रमानुसार व सेवाजेष्ठतेने बदली मिळेलच असे नाही.

 मात्र, जर एखाद्या शिक्षकाने सदर विवरण पत्र - १ मध्ये नमूद केलेला उक्त आ) येथील पर्याय निवडल्यास अशा शिक्षकांना त्यांच्या प्राधान्यक्रमानुसार व सेवाजेष्ठतेने बदली मिळू शकेल.

४. सदर बाब जिल्हांतर्गत बदलीचे ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी संबंधित गट शिक्षण अधिकारी, पंचायत समिती यांच्यामार्फत सर्व शिक्षकांच्या निदर्शनास आणावी व त्याबाबतची पोच संग्रही ठेवावी असे परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे

विवरण पत्र

संवर्ग 4 डाऊनलोड

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad