जिल्हाअंतर्गत शिक्षक बदली
वेळापत्रक तारखांसह संपूर्ण
मार्गदर्शन व विश्लेषण
शिक्षकांचे बदल्यांबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय - पहा सविस्तर*
🧐 राज्य सरकारने एप्रिलमध्ये दिलेल्या आदेशानंतर बदल्यांची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदलीसाठीचे पोर्टल 5 नोव्हेंबरपासून सुरू झाले आहे. बदल्यांची ही प्रक्रिया 5 जानेवारी 2023 पर्यंत पूर्ण होणार आहे
📝 जिल्हा अंतर्गत बदलीसाठी तालुका स्तरावरून दिनांक 7 नोव्हेंबरपर्यंत आपली माहिती सादर केली आहे.
आता दिनांक 24 ते 26 नाव्हेंबरपर्यंत विशेष संवर्ग भाग एकमध्ये येणाऱ्या शिक्षकांनी होकार दर्शविल्यास तीन दिवसांत पोर्टलवर 1 ते 30 किंवा आपल्या आवश्यकतेनुसार पसंतीक्रम नोंदवता येईल.
जाणून घ्या सविस्तर
▪️ शिक्षकांना पसंती क्रमानुसार शाळा न मिळाल्यास, पूर्वीचीच शाळा कायम राहील. विशेष संवर्ग भाग-दोनसाठी प्राधान्यक्रम भरण्याची मुदत 1 ते 12 डिसेंबरपर्यंत आहे.
▪️ त्यामध्ये 30 शाळांचा प्राधान्यक्रम नोंदवता येईल. प्राधान्यक्रमानुसार शाळा न मिळाल्यास, विशेष संवर्ग भाग दोनमधील शिक्षकांची बदली होणार नाही. त्यांची पूर्वीचीच शाळा कायम राहील.
▪️ तसेच ज्या शिक्षकांना बदली अधिकार प्राप्त आहेत, त्यांना 8 ते 12 डिसेंबरपर्यंत प्राधान्यक्रम भरता येणार आहे - सेवाज्येष्ठतेनुसार 30 शाळांचा प्राधान्यक्रम 3 दिवसांत ऑनलाइन पोर्टलवर नोंदवावा लागणार आहे.
▪️ दरम्यान, बदली नको असल्यास, तसेच बदलीपात्र शिक्षक नसल्यास, प्राधान्यक्रम न भरल्यास शिक्षकाची बदली होणार नाही - असे राज्य सरकारने म्हटले आहे
दिनांक ३१/१०/२०२२ रोजी VC Updated
जिल्हाअंतर्गत बदली वेळापत्रक तारखांसह विश्लेषण
जिल्हांतर्गत बदली पोर्टल सुरू झालेले आहे.सध्या केवळ CEO , EO आणि BEO लॉगिन सुरू झाले आहे.त्यांचे काम दिनांक 4 नोव्हेंबर पर्यंत सुरू राहील.
बदली बाबत
दिनांक : ०६-११-२०२२
संवर्ग ०१ व ०२ साठी बदली पोर्टलवर होकार किंवा नकाराची सुविधा अद्याप सुरु झालेली नाही.आणि आज सुरु होणार नाही . ही सुविधा उपलब्ध झाल्यानंतर आपणास कळविण्यात येइल
बदली कक्ष
➡️ आपला मोबाईल नंबर खालील लिंक वर टाकून लॉगिन करून पाहावे*
विशेष संवर्ग भाग 1 व 2 साठी फॉर्म भरणे.
दिनांक 5/11/2022 ते 7/11/2022
➡️ विशेष संवर्ग भाग 1 मध्ये येत असलेल्या शिक्षकांनी पोर्टलवर लॉगिन करून आपल्याला बदली पाहिजे असल्यास वरील 3 दिवसांच्या कालावधीमध्ये होकार नोंदवावा
जेणेकरून बदली यादी मध्ये आपले नाव समाविष्ट केले जाईल
➡️ व विशेष संवर्ग शिक्षक भाग 1 नुसार पात्र असलेल्या शिक्षकाचे नाव बदली पात्र शिक्षक यादीमध्ये येत असल्यास व बदली नको असल्यास वरील 3 दिवसांच्या कालावधीमध्ये ऑनलाईन पोर्टलवर नकार नोंदवावा जेणेकरून आपले नाव यादीतून कमी केले जाईल
विशेष संवर्ग भाग 2
➡️ तसेच विशेष संवर्ग भाग 2 मध्ये दोन्हीही शिक्षक बदली प्रक्रियेमध्ये येत असल्यास ज्यांना आपल्या जोडीदाराजवळ जायचे आहे त्यांनी वरील 3 दिवसांच्या कालावधीमध्ये ऑनलाईन पोर्टलवर होकार नोंदवावा जेणेकरून त्यांचे नाव यादीमध्ये समाविष्ट करण्यात येईल
➡️ व ज्या जोडीदाराजवळ जायचे आहे त्यांचा नकार नोंदवावा त्यांचे नाव यादीतून कमी करण्यात येईल
➡️ दोघांपैकी (म्हणजेच जोडीदारांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व एक इतर कर्मचारी ) एकच जण बदली प्रक्रियेमध्ये येत असल्यास एकानेच ऑनलाइन पोर्टलवर होकार नोंदवावा*
➡️ विशेष संवर्ग भाग 2 चे शिक्षक दोघांची सेवा क्षेत्रनिहाय सलग दहा वर्षापेक्षा कमी असेल व बदलीने सोय होत नसल्यास दोघांनाही नकार देता येतो अर्थातच पसंती क्रमांक न दिल्यास नकार समजला जातो तरीसुद्धा पोर्टलवर नका देण्याचा प्रयत्न करावा*
हा मुद्दा GR प्रमाणे लागू होतो
विशेष संवर्ग भाग 1 साठी प्राधान्यक्रम भरणे-
दिनांक 24/11/2022 ते 26/11/2022 (3 दिवस)
➡️ *विशेष संवर्ग भाग 1 मध्ये येत असणाऱ्या शिक्षकांनी वरील 3 दिवसांमध्ये पोर्टलवर आपला 30 किंवा आपल्या आवश्यकतेनुसार पोर्टलवर प्राधान्यक्रम नोंदवावा*
➡️ *या शिक्षकांना आपल्या प्राधान्य क्रमानुसार शाळा न मिळाल्यास पूर्वीचीच शाळा कायम राहील*
➡️ विशेष संवर्ग भाग 1 च्या शिक्षकांना सेवा कालावधीची अट नाही
विशेष संवर्ग भाग 2 साठी प्राधान्यक्रम भरणे-
दिनांक 01/12/2022 ते 03/12/2022 (3 दिवस)
➡️ विशेष संवर्ग भाग 2 च्या वरील प्रमाणे होकार दिलेल्या शिक्षकांनी 30 शाळांचा प्राधान्यक्रम ऑनलाइन पोर्टलवर नोंदवावा
➡️ परंतु आपल्या प्राधान्यक्रमानुसार शाळा न मिळाल्यास विशेष संवर्ग भाग 2 चे क्वचितच शिक्षक विस्थापित होऊ शकतात
➡️ विशेष संवर्ग भाग 2 च्या शिक्षकांना आपला जोडीदार ज्या तालुक्यात कार्यरत आहे त्या तालुक्यातील कोणतीही शाळा निवडता येते परंतु दुसऱ्या तालुक्यातील निवडताना जोडीदाराच्या 30 किलोमीटर अंतरापर्यंतची शाळा निवडावी
➡️ विशेष संवर्ग भाग 2 चे शिक्षक दोघांची सेवा क्षेत्रनिहाय सलग दहा वर्षापेक्षा कमी असेल व बदलीने सोय होत नसल्यास दोघांनाही नकार देता येतो
बदली अधिकार प्राप्त
बदली अधिकार प्राप्त शिक्षकांनी प्राधान्यक्रम भरणे-
दिनांक 08/12/2022 ते 10/12/2022 (3 दिवस)
➡️ बदली अधिकार पात्र शिक्षकांनी आपल्या सेवाजेष्ठतेनुसार 30 शाळा चा प्राधान्यक्रम वरील 3 दिवसांच्या कालावधीमध्ये ऑनलाइन पोर्टल वर नोंदवावा
➡️ परंतु ज्या शिक्षकांना बदली नको असल्यास त्यांनी प्राधान्यक्रम न भरल्यास त्यांची बदली होणार नाही
➡️ तसेच बदली अधिकार पात्र शिक्षकाला अवघड क्षेत्रामध्ये सलग 10 वर्ष व एका शाळेवर सलग पाच वर्षे सेवा झालेली असल्यास त्यांनी 30 शाळांचा प्राधान्यक्रम भरणे अनिवार्य राहील वेंशीस कंपनीच्या मार्गदर्शनावरून
➡️ अन्यथा या शिक्षकांनी प्राधान्यक्रम न दिल्यास त्यांची रिक्त जाग्यावर बदली करण्यात येईल
➡️ बदली अधिकार पात्र शिक्षक हे पुन्हा अवघड क्षेत्राचा प्राधान्यक्रम देऊ शकतात
➡️ बदली अधिकार पात्र शिक्षकांना पसंती क्रमाने शाळा न मिळाल्यास विस्थापित होऊ शकतात
बदलीपात्र
बदलीपात्र शिक्षकांनी प्राधान्यक्रम भरणे-
दि.15/12/2022 ते 17/12/2022 (3 दिवस)
➡️ ज्या शिक्षकांना सर्वसाधारण क्षेत्रामध्ये सलग दहा वर्ष व शाळेवर सलग पाच वर्ष झाली अशा शिक्षकांना सेवा जेष्ठतेने किमान 30 शाळांचा प्राधान्यक्रम वरील 3 दिवसांच्या कालावधीमध्ये देणे अनिवार्य आहे
➡️ बदली पात्र शिक्षकांना शक्यतोवर अवघड क्षेत्रातीलच शाळा मिळतील
➡️ बदली पात्र शिक्षकांनी बदली करिता अर्ज करताना विवरण पत्र 1 मधील अ व आ पर्यायांपैकी आ पर्याय निवडणे सोयीचे होईल कोणताही पर्याय न निवडल्यास संबंधित शिक्षक हा प्रशासकीय बदलीस पात्र ठरेल
विस्थापित शिक्षक
विस्थापित शिक्षकांच्या राऊंडसाठी पर्याय भरणे.
दि.22/12/2022 ते 24/12/2022 (3 दिवस)
➡️ विशेष संवर्ग भाग 1, विशेष संवर्ग भाग 2, बदली अधिकार पात्र शिक्षक तसेच बदली पात्र शिक्षक त्यांच्या बदली प्रक्रियेमधून विस्थापित झालेल्या शिक्षकांना वरील 3 दिवसांच्या कालावधीमध्ये पुन्हा 30 शाळांचा पसंती क्रम ऑनलाइन पोर्टल वर नोंदवावा लागेल
➡️ विशेष संवर्ग भाग 1 विशेष संवर्ग भाग 2 मधील शिक्षकांनी पहिल्यांदाच प्राधान्यक्रम देताना संवर्गनिहाय यादीचा अभ्यास व आपली सेवा जेष्ठता व असलेल्या रिक्त जागांचा योग्य ताळमेळ लावल्यास विस्थापित होणार नाहीत
अवघड क्षेत्रातील राहिलेल्या रिक्त पदे भरण्यासाठी बदली प्रक्रिया चालवणे.
दि. 30/12/2022 ते 01/01/2023 (3 दिवस)
➡️ अवघड क्षेत्रातील बदली पात्र शिक्षकांच्या बदली प्रक्रियेनंतर रिक्त जागा बदली पात्र शिक्षकांमधून पदस्थापित न झाल्यास ज्या शिक्षकांना सर्वसाधारण क्षेत्रामध्ये 10 वर्षाचे वर सेवा झालेले असल्यास अशा शिक्षकांना शाळेच्या कालावधीची अट राहणार नाही अशा शिक्षकांना वरील 3 दिवसांच्या कालावधीमध्ये शाळांचा प्राधान्यक्रम ऑनलाइन पोर्टलवर नोंदवावा
➡️ या ठिकाणी अवघड क्षेत्रातील जेवढ्या जागा रिक्त असतील तेवढ्याच शिक्षकांना सेवाजेष्ठतेने व प्राधान्यक्रमाने अवघड क्षेत्रातील रिक्त जागांवर पदस्थापित केले जाईल
➡️ ज्या शिक्षकांना आपल्या सेवाजेष्ठतीने व पसंतीक्रमाने शाळा न मिळाल्यास त्यांना उर्वरित रिक्त जागांवर पदस्थापित केले जाईल
बदलीचे आदेश प्रकाशित करणे.
दि. 05/01/2023 ते 05/01/2023 (1 दिवस)
नमुना फार्म
माध्यम | पहा | |
---|---|---|
1. | संवर्ग 1 | डाऊनलोड |
2. | संवर्ग 2 | डाऊनलोड |
3. | बदली अधिकार प्राप्त | डाऊनलोड |
4. | बदली पात्र | डाऊनलोड |
🎯 जिल्हांतर्गत बदली - 2022
*◼️संवर्गनिहाय सुधारित वेळापत्रक -*
*◼️बदली फॉर्म व प्राधान्यक्रम भरणे -*
*🔹 विशेष संवर्ग भाग 1 व 2 साठी -*
👉दि. 05 ते 07/11/2022 (3 दिवस)
*🔹 विशेष संवर्ग भाग 1 साठी -*
👉दि. 24 ते 26/11/2022 (3 दिवस)
*🔹 विशेष संवर्ग भाग 2 साठी -*
👉दि. 01 ते 03/12/2022 (3 दिवस)
*🔹 बदली अधिकार प्राप्त शिक्षक-*
👉दि. 08 ते 10/12/2022 (3 दिवस)
*🔹 बदलीपात्र शिक्षकांसाठी -*
👉दि. 15 ते 17/12/2022 (3 दिवस)
*🔹 विस्थापित शिक्षक राऊंड पर्याय-*
👉दि. 22 ते 24/12/2022 (3 दिवस)
*🔹 अवघडक्षेत्र रिक्त जागा प्रक्रिया -*
👉दि. 30/12/2022 ते 01/01/2023
(3 दिवस)
*🔹 बदलीे आदेश प्रकाशित -*
👉दि. 05/01/2023 (1 दिवस)
ही पोस्ट बदली शासन आदेश
दिनांक 7 एप्रिल 2021 , बदली वेळापत्रक दिनांक 21 ऑक्टोंबर 2022 , Vensys कंपनीने दिलेली उत्तरे
व VC दिनांक 31 ऑक्टोंबर 2022 यांचे आधारे तयार केलेली आहे
टिप सदर पोस्ट माहिती करिता आहे
याची नोंद घ्यावी
सदर माहिती मध्ये बदल होऊ शकते
खुप खुप धन्यवाद राठोड सरजी
ReplyDeleteआपली प्रतिक्रिया व सूचना