Scholarship Exam Final Result Announced MSCE Pune

इ.५ वी व इ. ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा

अंतिम निकाल जाहीर ! महाराष्ट्र

राज्य परीक्षा परिषद पुणे

पूर्व उच्च प्राथमिकइ.५ वी व
पूर्व माध्यमिक  (इ. ८ वी) शिष्यवृत्ती परीक्षा २०२२
Scholarship Exam Maharashtra 2022

 पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) 
दिनांक ३१ जुलै, २०१२ चा अंतिम निकाल व गुणवत्ता यादी जाहीर

गुणवत्ता यादी जाहीर 2022

Scholarship Exam Merit List

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत गुरुवार दिनांक ३१ जुलै, २०२२ रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा ( इ. ५ वी), शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) चा अंतिम निकाल, शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची गुणवत्ता याद्या आणि त्या अनुषंगिक माहिती मंगळवार दिनांक ०३/०१/२०२२ रोजी रात्री ०९.०० वाजता परिषदेच्या www.mscepune.in व https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर पाहता येईल.

खालील लिंक वर क्लिक करा

   शाळेचा निकाल पहा

विद्यार्थी निकाल

विद्यार्थ्याचे निकाल पाहण्याकरिता

खालील लिंक वर क्लिक करा

   विद्यार्थी निकाल पहा


गुणवत्ता यादी वर्ग पाचवी

राज्यस्तरीय / Statewise

जिल्हास्तरीय / Districtwise

तालुकास्तरीय / Talukawise


गुणवत्ता यादी वर्ग आठवी

राज्यस्तरीय / Statewise

जिल्हास्तरीय / Districtwise

तालुकास्तरीय / Talukawise

शिष्यवृत्ती परीक्षा निकाल

संकेतस्थळावरील प्रसिध्द करण्यात आलेली शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्याची माहिती, तसेच इतर अनुषंगिक माहितीच्या Links खालीलप्रमाणे

तपशीलवर्गक्लिक करा
शाळा सांख्यिकी माहितीपाचवीDownload
शाळा सांख्यिकी माहितीआठवीDownload
संचनिहाय कट ऑफपाचवीDownload
संचनिहाय कट ऑफआठवीDownload

दिनांक ३१ जुलै, २०२२ रोजी झालेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा ( इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) परीक्षेचा अंतरिम (तात्पुरता) निकाल दिनांक ०७/११/२०२२ रोजी जाहीर करण्यात आला होता. 

दिनांक ०७/११/२०२२ ते १७ / ११ / २०२२ या कालावधीत गुणपडताळणीसाठीचे अर्ज संबंधित शाळेमार्फत ऑनलाईन मागविण्यात आले होते. या कालावधीत प्राप्त अर्ज निकाली काढून या परीक्षांचा अंतिम निकाल तयार करण्यात आला आहे.

 सदर अंतिम निकालावरून शासनमान्य मंजूर संचांच्या अधीन राहून शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी तयार करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतलेल्या पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षांचा अंतिम निकाल जाहीर केला आहे. त्यानुसार इयत्ता पाचवीचे 23.90 टक्के विद्यार्थी, तर आठवीचे 12.53 टक्के विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत.

MSCE Pune

अंतिम निकाल प्राप्त करणे

सदर परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास अंतिम निकाल परिषदेच्या www.mscepune.in व https://www.mscepuppss.in/ या संकेतस्थळावर वैयक्तिकरित्या स्वतःचा बैठक क्रमांक टाकून पाहता येईल तसेच शाळेस त्यांच्या लॉगीनमध्ये शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचा निकाल एकत्रितपणे पाहता येईल.

 तथापि शिष्यवृत्तीधारक झालेल्या विद्यार्थ्याचे गुणपत्रक त्याच्या बँक खात्याची व आधार क्रमांकाची माहिती भरल्याशिवाय पाहता / डाऊनलोड करता येणार नाही. 

परंतु संकेतस्थळावरील गुणवत्ता यादीत त्याला स्वतः चा शिष्यवृत्ती संच प्रकार (अर्हता पाहता येईल.

प्रसिध्द करण्यात आलेली शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्याची माहिती

१. अंतिम निकाल (विद्यार्थी करिता)

२. गुणवत्ता यादी (राज्यस्तरीय / जिल्हास्तरीय / तालुकास्तरीय)

 ३. शाळा सांख्यिकीय माहिती (जिल्हानिहाय तालुकानिहाय)

विद्यार्थी, पालक, शाळा, क्षेत्रिय अधिकान्यांना वरीलपैकी कोणत्याही हव्या असलेल्या लिंकवर क्लिक करून माहिती प्राप्त (DOWNLOAD) करून घेता येईल.

गुणवत्ता यादीत कोणाचा समावेश नाही.

१. शासनमान्य मंजूर शिष्यवृत्ती संचांची संख्या मर्यादित असल्याने कटऑफ शेकडा गुणांइतके एकूण शेकडा

गुण मिळूनही प्रचलित निकषांची पूर्तता न करणारे विद्यार्थी,

२. मान्यताप्राप्त नसलेल्या शाळांमधून (अनधिकृत शाळांमधून) परीक्षेस प्रविष्ट झालेले विद्यार्थी

३. विहीत कमाल वयोमर्यादेपेक्षा अधिक वयाचे विद्यार्थी,

४. परीक्षेतील गैरप्रकारात समाविष्ट विद्यार्थी.

५. आवेदनपत्र न भरता परीक्षेस ऐनवेळी प्रविष्ट झालेल्या विद्याथ्यांपैकी शुल्क न भरलेले विद्यार्थी,

गुणपत्रक / प्रमाणपत्राबाबत

परीक्षा परिषदेने संकेतस्थळावर अंतरिम (तात्पुरते ) गुणपत्रक दिनांक ०७ नोव्हेंबर २०२२ रोजी व अंतिम गुणपत्रक प्रत मंगळवार दि. ०३ जानेवारी, २०२३ रोजी उपलब्ध करून दिलेली आहे. छापील गुणपत्रक व प्रमाणपत्र यथावकाश शाळांना पोहोच करण्यात येतील.

महत्त्वाचे

१. सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षापासून रद्द झालेल्या प्रश्नांचे गुण कमी करून उर्वरित अचूक प्रश्नांच्या एकूण प्राप्त गुणांवरून शेकडा गुण काढण्यात येतात. सदर एकूण शेकडा गुणांवरून गुणवत्ता याद्या निश्चित करण्यात आलेल्या आहेत.

२. ऑनलाईन आवेदनपत्रात चुकीची खोटी माहिती भरून शिष्यवृत्ती अर्हता प्राप्त झाल्याचे निदर्शनास आल्यास अशा शाळा प्रमुखांविरूध्द शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित केली जाईल. 

तसेच अशा विद्यार्थ्यांचे अर्हता रद्द केली जाईल.

३. शिष्यवृत्ती रक्कम प्रदान करण्याबाबत मा. शिक्षण संचालक (योजना), महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडे

गुणवत्ता यादीतील संबंधित विद्यार्थ्यांची शिफारस करण्यात येत आहे. 

शिष्यवृत्ती रकमेबाबतचा यापुढील पत्रव्यवहार त्यांचे कार्यालयाकडेच करण्यात यावा. 

सुलभ संदर्भासाठी पत्ता खालीलप्रमाणे.

मा. शिक्षण संचालक (योजना)

शिक्षण संचालनालय योजना, १७, डॉ. आंबेडकर रोड, पुणे ४११००१. -

हे प्रसिध्दीपत्रक परिषदेच्या www.mscepune.in व https://www.mscepuppss.in/ संकेतस्थळावरही

उपलब्ध करून देण्यात येत आहे.

आयुक्त

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,

पुणे- ०१


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad