Intra District Teacher Transfer Time Table Announce

जिल्हांतर्गत शिक्षक बदली झालेल्या 

शिक्षकांना कार्यमुक्त करण्याचे

वेळापत्रक जाहीर

जिल्हा परिषद शिक्षक संवर्गाच्या सन २०२२-२३ जिल्हांतर्गत बदल्यांबाबत

या विभागाच्या दिनांक ०७.०४.२०२१ रोजीच्या शासन निर्णयानुसार जिल्हा परिषद शिक्षक संवर्गाच्या जिल्हांतर्गत बदलीसंदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार जिल्हांतर्गत बदल्या ह्या संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाईन पध्दतीने करण्याची कार्यवाही सद्यस्थितीत सुरु असून बदली प्रणालीमध्ये टप्पा क्र. १, २, ३, ४ व ५ मधील कार्यवाही पुर्ण झालेली आहे.


“शासन निर्णय दिनांक ०७.०४.२०२१ मधील मुददा क्र. ४. ७ येथे बदलीने पदस्थापनेचे आदेश निर्गमित करताना त्यामध्ये कार्यमुक्तीचा दिनांक नमूद करण्यात यावा, असे नमूद आहे. परंतु प्रत्यक्षात कालावधी नमूद करण्यात आलेला नाही. 

यास्तव, असे स्पष्ट करण्यात येते की, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित विचारात घेता, जिल्हांतर्गत बदली झालेल्या शिक्षकांना दिनांक ०९.०५.२०२३ ते दिनांक १५.०५.२०२३ पर्यंत कार्यमुक्तीचे प्रशासकीय आदेश निर्गमित करावेत 

व कोणत्याही परिस्थितीत 

दिनांक १६.०५.२०२३ ते दिनांक ३१.०५.२०२३ या कालावधीत अशा शिक्षकांना प्रत्यक्ष कार्यमुक्त करण्याबाबतची कार्यवाही करावी.

अश्या सूचना उपसचिव यांच्या प्राप्त.

आदेश निर्गमित

जिल्हांतर्गत बदली झालेल्या शिक्षकांना दिनांक ०९.०५.२०२३ ते दिनांक १५.०५.२०२३ पर्यंत कार्यमुक्तीचे प्रशासकीय आदेश निर्गमित करण्यात येणार आहेत. 

शिक्षकांना कोणत्याही परिस्थितीत दिनांक १६.०५.२०२३ ते दिनांक ३१.०५.२०२३ या कालावधीत प्रत्यक्ष कार्यमुक्त करण्याबाबतची कार्यवाही केली जाणार आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad