Inter District Transfer Teacher Relieve New Update

आंतरजिल्हा शिक्षक बदली 

शिक्षकांना कार्यमुक्त करणेबाबत

शासन परिपत्रक जाहीर

 सन २०१७ ते २०२२ या कालावधीमध्ये संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाईन पध्दतीने आंतरजिल्हा बदली झालेल्या व अद्याप मूळ जिल्हा परिषदेने कार्यमुक्त न केलेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करणेबाबत...

महाराष्ट्र शासन

ग्राम विकास विभाग

वाचा : शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०२२/प्र.क्र.५३८/आस्था-१४, दि.०२.१२.२०२२


शासन शुध्दीपत्रक :-

 “विद्यार्थ्यांचे हित विचारात घेता दिनांक ०१.०४.२०२३ ते दि.३०.०४.२०२३ पर्यंत शिक्षकांच्या कार्यमुक्तीचे प्रशासकीय आदेश निर्गमित करावेत व कोणत्याही परिस्थितीत दिनांक ०१.०५.२०२३ ते दि.३१.०५.२०२३ या कालावधीत अशा शिक्षकांना प्रत्यक्ष कार्यमुक्त करण्याबाबतची कार्यवाही करावी"

याऐवजी

विद्यार्थ्यांचे हित विचारात घेता दिनांक ०१.०४.२०२३ ते दिनांक १५.०४.२०२३ पर्यंत शिक्षकांच्या कार्यमुक्तीचे प्रशासकीय आदेश निर्गमित करावेत व कोणत्याही परिस्थितीत दिनांक १६.०४.२०२३ ते दिनांक ३०.०४.२०२३ या कालावधीत अशा शिक्षकांना प्रत्यक्ष कार्यमुक्त करण्याबाबतची कार्यवाही करावी "

असे वाचावे

सदर शासन शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेताक २०२३०२२७११२६५८९०२० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन निर्गमित करण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad

Ads Area