SwiftChat App Student Attendance Online VSK Pune In State

राज्यातील शाळेचे विद्यार्थ्यांची

उपस्थित्ती ऑनलाईन  नोंदविण्यात

येणार ! विद्या समीक्षा केंद्र 

विद्या समीक्षा केंद्रांतर्गत Attendance Bot (चॅटबॉट) वर विद्यार्थ्यांची ऑनलाइन उपस्थित्ती नोंदविणेबाबत...

उपरोक्त विषयान्वये, शिक्षण क्षेत्रातील माहिती संकलन व विश्लेषण प्रक्रिया अधिक वेगवान व सुलभ व्हावी. तसेच धोरणकर्ते, शिक्षक आणि सर्व स्तरावरील प्रशासकांसह विविध भागधारकांना डेटा विश्लेषणासाठी एकत्रित व्यासपीठ प्रदान करावे व त्याआधारे राज्य, जिल्हा व तालुका पातळीवर गरजा लक्षात घेऊन उपक्रम / योजना आखण्यास मदत व्हावी, याकरिता महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई अंतर्गत समग्र शिक्षा उपकार्यालय, पुणे येथे विद्या समीक्षा केंद्र (VSK) कार्यान्वित करण्यात आले आहे


सदर विद्या समीक्षा केंद्र, पुणे मार्फत सदर Attendance Bot (चॅटबॉट) च्या वापरासंबंधी विभाग, तालुका व केंद्र स्तरापर्यंत सर्व शिक्षकांना प्रशिक्षण यापूर्वीच देण्यात आलेले आहे.

 त्याप्रमाने स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळेतील वर्ग १ ली ते इ.१० वीच्या इयत्तेतील विद्यार्थी उपस्थिती SwiftChat या Application मधील Attendance Bot द्वारे ऑनलाईन पद्धतीने नोंदविण्याची प्रक्रिया दिनांक ०१ डिसेंबर २०२३ पासून सुरु करण्यात येत आहे.

तरी आपल्या अधिनस्त सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांना या Attendance Bot (चॅटबॉट) वर विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदविण्यासाठी आदेशित करावे. 

तसेच सदर उपस्थिती नियमितपणे नोंदविली जात असल्याबाबत आपल्या स्तरावरून नियमितपणे आढावा घेण्यात यावा,. असे परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे 

खालील लिंक वर क्लिक करा

            App Download 

विद्यार्थी उपस्थिती 

खालील लिंक वर क्लिक करा

स्वाध्याय सोडवा

स्वाध्याय CHATBOT ची लिंक खालील प्रमाणे


शिक्षकाकरिता मार्गदर्शन व्हिडिओ

Post a Comment

3 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. How to change mobile phone number

    ReplyDelete
  2. How to change another mobile number in swift chat while registering another teacher

    ReplyDelete

आपली प्रतिक्रिया व सूचना

Top Post Ad

Below Post Ad