STARS Project PAT Maharashtra SwiftChat App Online Teacher Traning

पायाभूत चाचणीचे गुण PAT

(महाराष्ट्र) या चाटबॉटवर 

नोंदविणेबाबत ऑनलाईन शिक्षक 

प्रशिक्षण ! VSK Pune

विद्यार्थ्यांचा अध्ययन संपादणूकीचा नियमित आढावा घेऊन आवश्यक कृती-योजना राबविण्यासाठी सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात STARS प्रकल्प अंतर्गत वर्षभरात तीन नियतकालिक चाचण्यांचे आयोजन इयत्ता तिसरी ते आठवीसाठी करण्यात येत आहे. यातील पहिली पायाभूत चाचणी दि. १७ ते १९ ऑगस्ट २०२३ या कालावधीत शाळास्तरावर घेण्यात आलेली आहे. दुसरी संकलित मूल्यमापन १ ही चाचणी दिनांक ३१, ३१ ऑक्टोंबर व ०१ नोव्हेंबर २०२३ रोजी घेण्यात आली आहे.

तरी आपणास कळविण्यात येते की, विद्या समीक्षा केंद्र (VSK), पुणे यांचेमार्फत PAT (महाराष्ट्र) या चॅटबॉटवर संकलित मूल्यमापन १ या चाचणीचे गुण भरण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सदर चॅटबॉटवर शिक्षकांनी गुण कसे नोंदवावेत याबाबतचे ऑनलाईन स्वरुपात यु-ट्युबद्वारे प्रशिक्षण शिक्षकांना दिनांक 28 नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी ठीक १२ ते १ या कालावधीत देण्यात येणार आहे. 

 तरी आपल्या अधिनस्त शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व खाजगी अनुदानित शाळा मधील शिक्षकांना ऑनलाईन प्रशिक्षण घेणेबाबत सूचित करण्यात यावे. याबाबतची लिंक खाली दिलेली आहे. प्रशिक्षण झालेनंतर सदर शाळांमधील शिक्षकांनी विद्यार्थ्याच्या संकलित मूल्यमापन १ चे गुण PAT (महाराष्ट्र) या चॅटबॉटवर नोंदविणेबाबत आपल्या स्तरावरून सूचना द्याव्यात.

           PAT (महाराष्ट्र) या चॅटबॉटवर गुण नोंदविण्याचा कालावधी दि. २८ नोव्हेंबर ते १० डिसेंबर २०२३ असणार आहे. 

प्रशिक्षण कालावधी

दिनांक 28 नोव्हेंबर 2023 रोजी

       यु ट्यूब लिंक Live 

PAT (महाराष्ट्र) चॅटबॉट मार्गदर्शिका https://bit.ly/PATManual या लिंकवर पाहता येईल.

अमोल येडगे,(भा.प्र.से)

संचालक,

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

What's Up Group Join 

What's Up Group Join 

Post a Comment

5 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
 1. जिल्हा परिषद शाळा धनगरवाडा श्री प्रदीप दौलत खैरनार

  ReplyDelete
 2. जिल्हा परिषद शाळा धनगरवाडा

  ReplyDelete
 3. खुप छान माहिती दिली सर... धन्यवाद

  ReplyDelete
 4. खूप छान माहिती दिली सर

  ReplyDelete

आपली प्रतिक्रिया व सूचना

Top Post Ad

Below Post Ad