Ads Area

Smart Student Attendance Maharashtra Online On SwiftChat App Information

Swift chat App मध्ये विद्यार्थी 

उपस्थिती ऑनलाईन नोंद करणे 

सुविधा उपलब्ध... Update

विद्या समीक्षा केंद्र पुणे 

ऑनलाइन उपस्थिती कशी घ्यावी याबाबत मार्गदर्शन.

 विद्यार्थी उपस्थिती होणार ऑनलाइन

शासन निर्णयानुसार आता विद्यार्थ्यांची उपस्थिती ऑनलाइन घेतली जाणार आहे.

विद्यार्थी उपस्थिती ऑनलाइन घेण्यासाठी तुम्ही खालील प्रमाणे रजिस्ट्रेशन करू शकता.

1.प्लेस्टोअर  वरून Swiftchat नावाचे एप्लिकेशन्स डाऊनलोड करा.

खालील लिंकवर जाऊन तुम्ही डाऊनलोड करू शकता

खालील लिंक वर क्लिक करा

            App Download 

         QR Code Download 

2.swiftchat या एप्लिकेशन्स मध्ये तुमची प्रोफाइल पूर्ण करा.

3.यापूर्वी तुम्ही त्यामध्ये "स्वाध्याय" आणि PAT महाराष्ट्र या दोन BOT चा वापर केलेला असल्यामुळे ते तुम्हाला स्क्रीन वर दिसून येतील.

4.Swiftchat ओपन केल्यानंतर search बार मध्ये तुम्हाला "स्मार्ट उपस्थिती" असा शब्द टाकून शोध घ्यायचा आहे.स्मार्ट उपस्थिती टाकल्याबरोबर खालील प्रमाणे Bot तुम्हाला दिसून येईल.

(खालील लिंकवर क्लिक करूनही तुम्ही स्मार्ट उपस्थिती या bot वर जाऊ शकता 

विद्यार्थी उपस्थिती 

खालील लिंक वर क्लिक करा

 स्मार्ट उपस्थिती "या Bot वर क्लिक केल्यानंतर त्यामध्ये hi असा मेसेज टाकल्याबरोबर खालील प्रमाणे स्क्रीन दिसेल.

त्यामध्ये तुम्हाला तुमची भाषा निवडायची आहे.

7.त्यानंतर तुम्हाला पुढील या बटणावर क्लिक करावे लागेल.

8.त्यानंतर तुम्हाला तुमच्या शाळेचा 11 अंकी UDISE नंबर टाकावयाचा आहे.

9.UDISE नंबर टाकल्यानंतर तुम्हाला स्क्रीन वर तुमच्या शाळेची माहिती दिसेल.ती बरोबर असेल तर "होय,ही माझी शाळा आहे." या ऑप्शन वर तुम्हाला क्लिक करायचे आहे.

10.त्यानंतर तुम्हाला तुमचा "शालार्थ कोड" टाकावा लागणार आहे.

जो तुम्हाला माहित पाहिजे.शालार्थ कोड टाकल्यानंतर तुम्हाला तुमचे पूर्ण नाव आणि शाळेचे नाव व तुमचे पद दिसून येईल.बरोबर असेल तर "होय,माहिती बरोबर आहे यावर क्लिक करा.

   अशा प्रकारे शिक्षकांचे रजिस्ट्रेशन पूर्ण झालेले असेल.

• विद्यार्थी हजेरी

1.वरील सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर स्क्रीन वर तुम्हाला "विद्यार्थ्यांची हजेरी घ्या" असा मेसेज स्क्रीन वर दिसेल.

2."विद्यार्थ्यांची हजेरी घ्या" वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्क्रीन वर तुमच्या शाळेतील सर्व वर्ग दिसून येतील.

3.तुम्हाला ज्या वर्गाची हजेरी घ्यायची आहे तो वर्ग निवडा. त्या वर्गाची तुकडी निवडा, उपस्थिती चिन्हांकित करा वर क्लिक करा 

तुम्ही वर्ग आणि तुकडी निवडल्यानंतर तुम्हाला स्क्रीन वर वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची नावे दिसतील.

4.वर्गातील विद्यार्थ्यांच्या नावापुढे उपस्थित आणि अनुपस्थित असे दोन पर्याय असतील.

तुम्ही ज्यावेळी वर्ग निवडता त्यावेळी उपस्थित बटणावर अगोदर हायलाईटेड असणार आहे.जर सर्व विद्यार्थी उपस्थित असतील तर "दाखल करा " या बटणावर तुम्हाला क्लिक करायचे आहे.क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्क्रीन वर "तुम्हाला खात्रीने उपस्थिती दाखल करायची आहे का? असा प्रश्न विचारला जाईल.बरोबर असेल तर पुन्हा एकदा "दाखल करा" यावर क्लिक करायचे आहे.

5.जर वर्गातील विद्यार्थी अनुपस्थित असेल तर तुम्हाला अनुपस्थित या बटनाला हायलाईटेड करायचे आहे.

6.अश्या प्रकारे तुम्ही तुमच्याकडील वर्गांची उपस्थिती अतिशय योग्य प्रकारे भरू शकता

शिक्षकांकरिता मार्गदर्शन व्हिडिओ

मार्गदर्शिका लिंक 

What's Up Group Join 

What's Up Group Join 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad