Education Week Technology In Education Day Webinar Session

शिक्षण सप्ताह अंतर्गत “शिक्षणात तंत्रज्ञान 
दिवस” वेबिनार सत्र

  शुक्रवार दिनांक २६ जुलै २०२४ रोजी शिक्षा सप्ताह अंतर्गत “शिक्षणात तंत्रज्ञान 

दिवस” साजरा करणेबाबत...

 संदर्भ- १. मा. संजय कुमार (भा.प्र.से.), सचिव, शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, भारत

सरकार यांचे पत्र दिनांक ०९/०७/२०२४.

२. मा. डॉ. अमरेंद्र बेहेरा, सहसंचालक, केंद्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान संस्था (CIET), 

नवी दिल्ली यांचे पत्र दिनांक २०/०७/२०२४.

३. प्रस्तुत कार्यालयाचे पत्र दिनांक 


 संदर्भ क्र. १ अन्वये देशातील सर्व राज्यात दिनांक २२/०७/२०२४ ते २८/०७/२०२४ दरम्यान “शिक्षा सप्ताह” साजरा करण्याबाबत आदेशित करण्यात आलेले आहे. यांतर्गत संदर्भ क्र. ३ अन्वये आपणास सविस्तर सूचना देण्यात आलेल्या होत्या. याबाबत शुक्रवार दिनांक २६ जुलै २०२४ रोजी शिक्षा सप्ताह अंतर्गत “शिक्षणात तंत्रज्ञान दिवस” साजरा करणेबाबत आपणास ऑनलाईन लिंक पुरविण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. संदर्भ क्र. ३ नुसार केंद्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान संस्था (CIET), नवी दिल्ली यांचे आदेश या कार्यालयास प्राप्त झाले आहेत. त्यानुसार खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी,

१. शुक्रवार दिनांक २६ जुलै २०२४ रोजी “शिक्षणात तंत्रज्ञान दिवस” कार्यक्रम पाहण्यासाठी सकाळी १०.०० ते दुपारी ५.३० वाजेपर्यंत राज्यातील सर्व शाळातील शिक्षक, विद्यार्थी, मुख्याध्यापक व सर्व अधिकारी यांनी NCERT YouTube Channel चे पुढील link

YouTube Webinar लिंक


२. सर्व शाळातील शिक्षक, विद्यार्थी, मुख्याध्यापक व सर्व अधिकारी यांनी आपल्या मोबाईल, संगणक, लॅपटॉप वा उपलब्ध असलेल्या ऑनलाईन साधनावर दीक्षा अॅप/ दीक्षा प्रणाली उपलब्ध करून घ्यावी. 

३. शिक्षक, विद्यार्थी, मुख्याध्यापक व सर्व अधिकारी यांचेसाठी

YouTube Webinar लिंक

  https://www.youtube.com/@ncertevents.157 

या लिंकवर दुपारी ५.०० वाजता आयोजित होणाऱ्या दीक्षा प्रणाली संदर्भात प्रश्न मंजुषा कार्यक्रमात सहभागी व्हावे. 

४. ज्या उमेदवारांना प्रश्न मंजुषेत ७०% गुण असतील, त्यांना याबाबत प्रमाणपत्र त्यांचे दीक्षा दीक्षा अॅप वरील प्रोफाईल टॅबमध्ये उपलब्ध करून देण्यात येईल.

राज्यातील सर्व विदयार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक / प्राचार्य व अधिकारी यांनी सदर कार्यक्रमाला वेळेत उपस्थित रहावे.

संचालक

राहुल रेखावार, भा. प्र. से.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद  

महाराष्ट्र, पुणे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad