Success Story

Success Story

लर्निंग फ्रॉम होम या कालावधीत

तंत्रज्ञानाचा अध्यापनात प्रभावी वापर

तंत्रज्ञान काळाची गरज

आजचे युग तंत्रज्ञानाचा आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करण्यात येत आहे
तसेच शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा तंत्रज्ञानाचा यशस्वीपणे वापर करण्यात येत आहे,
लर्निंग फ्रॉम होम या कालावधीत शिक्षण क्षेत्रामध्ये खाजगी शाळांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाचा अध्यापनात वापर करतांना दिसून येत आहे परंतु आपल्या जिल्हा परिषद शाळा सुद्धा मागे नाही कारण आपल्या जिल्हा परिषद शिक्षक खूप मोठ्या प्रमाणे उत्कृष्ट प्रतीचे तंत्रस्नेही शिक्षक आहे, आपले जिल्हा परिषद शिक्षक विद्यार्थ्यांच्या अभ्यासाकरिता नवीन नवीन तंत्रज्ञानाची अध्यापनाशी सांगड घालतात.

Success Story

अभ्यासमाला दीक्षा ॲप

एनसीआरटी ने विद्यार्थ्याकरिता तयार केलेले अभ्यास माला हे खूपच प्रभावी अध्यापनात वापर होताना  दिसून येत आहे, आमच्या धामणगांव रेल्वे तालुक्यात याविषयी तालुकास्तरीय प्रशिक्षण घेण्यात आले त्यामध्ये सर्व केंद्रप्रमुख, सर्व विस्तार अधिकारी ,सर्व शिक्षक , सर्व साधन व्यक्ती यांना प्रशिक्षित करण्यात आले. त्यानंतर प्रत्येक शाळेत अभ्यासमाला विद्यार्थ्याचे अभ्यासाकरिता यशस्वीपणे वापर करण्यात आले.
अभ्यासमाला हे ॲप वापरण्यात खुप सोपे आहे. पाठ्यपुस्तकातील घटकाचे क्यू आर कोड scan केल्याबरोबर जो घटक आपण शिकवित आहे, तो घटक लगेच विद्यार्थ्यांना मोबाईल मार्फत एलसीडी वर दाखविण्यात आले आहे .
शाळा बंद पण शिक्षण सुरू या आधारे विद्यार्थी आता Covid 19 कालावधीमध्ये अभ्यासमाला दीक्षा ॲप मुळे विद्यार्थी घरीच बसून अभ्यास करीत आहे, हे ॲप कसे वापरायचे हे विद्यार्थ्यांना माहीत आहे तरी विद्यार्थ्यांना याविषयी जास्त मार्गदर्शन करण्याची गरज नाही तो फायदा आता विद्यार्थ्यांना होत आहे
अभ्यासमाला दीक्षा ॲप मुळे विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक बदल अभ्यासमाला  दीक्षा ॲप मुळे विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक बदल घडून आला आहे,जो घटक शिक्षकांना सविस्तरपणे सांगता आले नाही तेच घटक दीक्षा ॲप मुळे विद्यार्थ्यांना सहजपणे अवगत झाले. विद्यार्थ्यांमध्ये या विषयी एका प्रकारची आवड निर्माण झाली विद्यार्थीसुद्धा रुचक, मनोरंजक या पद्धतीने अध्ययन करू लागले, जेव्हा जेव्हा आम्ही जो घटक शिकवितो तेव्हा विद्यार्थी स्वतःहून म्हणतात सर दीक्षा ॲप यामार्फत आम्हाला हा घटक समजून सांगा.
दीक्षा ॲप मुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अध्ययन अनुभव आला. कारण दीक्षा ॲप मध्ये PDF , VIDEO स्वरूप हे घटक उपलब्ध आहे, VIDEO मार्फत विद्यार्थी पाठ्यपुस्तकातील घटक योग्य प्रकारे अवगत करत होते
विद्यार्थी आता Covid 19 कालावधीमध्ये अभ्यासमाला दीक्षा ॲप  घरीच बसून कोणाचीही मदत न घेता आपले अभ्यास पूर्ण करीत आहे. हे करताना विद्यार्थ्यांना आनंद आणि समाधान वाटत आहे, एक नवीन प्रकारची तंत्रज्ञान आपण अवगत केले आहे हे जेव्हा विद्यार्थी सांगतात तेव्हा आपल्याला त्याच्या चेहऱ्यावरून हे लक्षात येते, आम्हीसुद्धा विद्यार्थ्याच्या अभ्यासाबद्दल आढावा घेत असतो

विद्यार्थी प्रतिक्रिया

आचल इंगोले  -  " सर शाळा बंद आहे पण माझा अभ्यास सुरू आहे, दीक्षा ॲप मुळे आम्हाला अभ्यास करण्यामध्ये आवड निर्माण झाली आहे यामुळे आम्ही कोणताही पाठ सहजपणे लक्षात येत आहे, पुस्तक वाचनाची जास्त गरज नाही लगेच आम्हाला पाठ समजतो "

पालकांची प्रतिक्रिया

सौ.पपिता वानखडे - सर, आपण जे दीक्षा ॲप  वापरत आहे हे विद्यार्थ्याला अभ्यासामध्ये खूपच मदत होत आहे. माझाच मुलगा अमन खूपच अभ्यासामध्ये मागे होता पण आपण हे नवीन शिकविण्याची  पद्धत यामुळे तो नियमितपणे घरी अभ्यास  करीत आहे, त्यामध्ये अभ्यासाची प्रगती दिसून येत आहे, तो घरी आल्यावर ॲप बद्दल माहिती सांगतो कि, आम्हाला पुस्तकातील पाठाचे व कवितेचे व्हिडिओ दाखविण्यात येते, त्यामुळे आम्हाला सहजपणे कविता म्हणता येते आणि पाठ समजतो, शाळा जरी बंद असले तरी मुलांचा अभ्यास सुरू आहे . राहिलेला अभ्यास पूर्ण करीत आहे

Zoom Meeting

शाळा बंद पण शिक्षण सुरू या आधारित
मा. प्राचार्य डॉ. रवींद्र आंबेकर जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था अमरावती व मोरे मॅडम यांनी धामणगांव रेल्वे मधील मा. गटशिक्षणाधिकारी ,सर्व केंद्रप्रमुख सर्व शिक्षक ,सर्व साधन व्यक्ती यांची ऑनलाइन झूम मीटिंग माहे मार्च एप्रिल या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये आयोजित करून आम्हाला  Covid 19 या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांच्या अभ्यासाकरिता काय करता येईल ?  याविषयी सविस्तरपणे मार्गदर्शन केले. या प्रश्नाचे उत्तर आम्ही लवकरच सर्व तंत्रस्नेही शिक्षक सर्व साधन व्यक्ती यांनी शोधून काढले, ते म्हणजे ऑनलाइन टेस्ट, Los Smart Q वापर.पालकाकरिता What's up ग्रुप तयार करणे यावर आम्ही जास्तीत जास्त भर दिला

Zoom Meeting मुळे शैक्षणिक वातावरणामध्ये आमुलाग्र बदल
आमच्या पंचायत समितीचे  मा.गटशिक्षणाधिकारी सौ.सुषमाताई मेटकर यांनी शाळा बंद पण शिक्षण सुरु या तत्त्वावर आम्हाला प्रेरणादायी मार्गदर्शन केल्यानंतर तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभाग गट साधन केंद्र धामणगांव रेल्वे यांचेकडून दैनिक चाचणी उपक्रम सुरू केला आहे. आणि तोही ऑनलाईन .

गुगल फॉर्म वर ऑनलाइन टेस्ट कसे तयार करायचे   यासंदर्भात मी माझ्या My Big Techno वेबसाईट वर मार्गदर्शन केले त्यामुळे सर्व शाळेतील शिक्षकांनी गुगल फॉर्म ऑनलाइन टेस्ट आपल्या विद्यार्थ्याकरिता तयार केले, यानिमित्त प्रत्येक शाळेतील शिक्षकांना गुगल फार्मवर ऑनलाइन टेस्ट तयार करण्याचे ज्ञान अवगत झाले.


त्यामुळे  दररोज नियमितपणे सर्व विषयाकरिता वीस ते बावीस ऑनलाईन टेस्ट लिंक  पालकांच्या व्हाट्सअप ग्रुप वर Send  करण्यात आले,याचा फायदा म्हणजे आमच्या तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाइन टेस्ट सोडविण्याकरिता मदत झाली, बरेच विद्यार्थ्यांनी हे ऑनलाईन टेस्ट सोडविले त्यानंतर विद्यार्थी आम्हाला प्रतिक्रिया दिली की  , आम्ही घरी बसून आमचा राहिलेला अभ्यासक्रम पूर्ण करीत आहे.
विद्यार्थ्यांनाही ऑनलाइन टेस्ट सोडवितांना आनंद वाटत आहे , तसेच ऑनलाइन टेस्ट मुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले नाही अशी महत्वपूर्ण प्रतिक्रिया पालकांनी दिली.

गल्ली गल्ली सिम सिम कार्यक्रम

Covid 19 कालावधीत दूरदर्शन वाहिनीवरील विद्यार्थ्याकरिता गल्ली गल्ली सिम सिम शैक्षणिक कार्यक्रम  पाहण्याकरिता धामणगांव रेल्वे मधील सर्व शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले, त्यामुळे हा कार्यक्रम कार्टून स्वरूपात असल्यामुळे  सर्व विद्यार्थ्यांना हा कार्यक्रम आवडला आणि मनोरंजन मार्फत शिक्षण हे आंतर क्रिया घडली, घरी बसून विद्यार्थी नियमितपणे हा कार्यक्रम पाहून शैक्षणिक माहिती व अभ्यास पूर्ण करीत आहे. हा कार्यक्रम शैक्षणिक असल्यामुळे विद्यार्थ्यांना असे वाटत आहे कि जणू प्रत्यक्ष शाळा सुरू आहे आणि आपण  घरीच बसून गृहपाठ करीत आहोत.

टिली मिली शैक्षणिक कार्यक्रम

टिली मिली शैक्षणिक कार्यक्रम वेळापत्रक विद्यार्थ्यांना देऊन दररोज हा कार्यक्रम पाहण्याकरिता तालुक्यातील सर्व शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत आहेत

तसेच ज्या विद्यार्थ्यांजवळ टीव्ही रेडिओ सुविधा नसेल त्याकरिता डिजिटल BRC या वेबसाईटवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, यामुळे आमच्या तालुक्यातील विद्यार्थी व शिक्षक दररोज सोमवार ते शनिवार हा शैक्षणिक कार्यक्रम पाहून आपला अभ्यास पूर्ण करीत आहे.

याबाबत बरेच शिक्षकांकडून चांगले प्रतिसाद मिळत आहे

अशा प्रकारे आम्ही नवीन नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आमच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरिता आम्ही परिश्रम घेतले.

Covid 19 कालावधीत शाळा बंद शिक्षण सुरू  हा उपक्रम राबविताना सर्व शिक्षक सर्व साधन व्यक्ती सर्व केंद्रप्रमुख सर्व विद्यार्थी व पालक यांनी आनंद व समाधान व्यक्त केले.
Covid 19 कालावधीत शाळा बंद शिक्षण सुरू  हा आमचा उपक्रम यशस्वीपणे पूर्ण झाला
.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad