Class Four And Seven Scholarship Exam Admit Card Available MSCE Pune

इ. 4 थी व इ. 7 वी शिष्यवृत्ती परीक्षा एप्रिल 2026 - प्रवेशपत्र उपलब्ध ! MSCE Pune 

शिष्यवृत्ती परीक्षा 2026 :- प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 4 थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 7. वी) ही दि. 26/04/2026 रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे.

सदर परीक्षेचे प्रवेशपत्र दिनांक  27/03/2026 रोजी सायं 05.00 वाजता संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक 26 एप्रिल, 2026 रोजी आयोजित प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 4 थी)' व 'उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 7 वी)'* ची प्रवेशपत्रे (Admit Cards) परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहेत. 

मुख्याध्यापकांनी प्रवेशपत्राची प्रिंट काढून तात्काळ सर्व परीक्षार्थ्यांना वितरीत करावे. 
सर्व परीक्षार्थी व पालक यांनी शाळा मुख्याध्यापकांकडून प्रवेशपत्र प्राप्त करून घ्यावे असे आवाहन करण्यात येत

 ➤ प्रवेशपत्र मिळवण्यासाठी प्रक्रिया :

१. खालील लिंक वर क्लिक करा .

२.  शाळेचा युजर आयडी (User ID) आणि पासवर्ड (Password) वापरून लॉगिन करा.

३.  विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र डाऊनलोड करून त्याची प्रिंट काढा.

४.  विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रावर मुख्याध्यापकांचा शिक्का व स्वाक्षरी घ्यावी.

➤ खालील लिंक वर क्लिक करा 

    ➤ महत्त्वाच्या सूचना :

१.  प्रवेशपत्रावरील परीक्षा केंद्र, वेळ, सूचना आणि परीक्षार्थ्याची सर्व माहिती काळजीपूर्वक तपासून योग्य असल्याची खात्री करावी.

२.  परीक्षेच्या दिवशी प्रवेशपत्राशिवाय प्रवेश दिला जाणार नाही, याची कृपया गांभीर्याने नोंद घ्यावी.

३.  तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी प्रवेशपत्रे वेळेत डाऊनलोड करून घ्यावीत.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे.

What's Up Grotup Join 

➤ What's Up Group Join 

What's Up ग्रुप जॉईन करा
WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin No

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.