Ads Area

DIKSHA Portal AI Saathi for Educators Online Course For Teacher Scert Pune

इ. 1 ते 12 वी शिक्षकांना DIKSHA 

Portal वर AI साथी ऑनलाइन कोर्स 

पूर्ण करावे लागणार! वाचा सविस्तर 

DIKSHA Portal वरील "AI Saathi for Educators" (शिक्षकांसाठी AI साथी) हा ऑनलाइन कोर्स सर्व शिक्षकांनी पूर्ण करणे.

राज्यातील इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंत अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांनी DIKSHA Portal वरील "Al Saathi for Educators" (शिक्षकांसाठी AI साथी) हा ऑनलाईन कोर्स पूर्ण करण्याबाबत.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांनी कोटक एज्युकेशन फाउंडेशनच्या सहकार्याने "AI Saathi for Educators" (शिक्षकांसाठी AI साथी) हा ऑनलाईन कोर्स विकसित केला असून तो DIKSHA Portal वर उपलब्ध करून देण्यात आला आहे. सदर ऑनलाईन कोर्सचे उद्घाटन मा. शालेय शिक्षण मंत्री, श्री. दादाजी भुसे यांच्या शुभहस्ते दिनांक १४ जुलै २०२६ रोजी मंत्रालय, मुंबई येथे संपन्न झाले आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence AI) हे तंत्रज्ञान आज शैक्षणिक तसेच प्रशासकीय व्यवस्थेचा अविभाज्य भाग बनत आहे. AI चा योग्य, सुरक्षित व जबाबदार वापर केल्यास अध्यापन-अध्ययन प्रक्रिया अधिक परिणामकारक होण्याबरोबरच दैनंदिन कामकाजाची गती, गुणवत्ता, अचूकता व कार्यक्षमता वाढण्यास मोठी मदत होते. अध्यापन नियोजन, अध्ययन साहित्य निर्मिती, मूल्यमापन, अहवाल लेखन, माहितीचे विश्लेषण, सादरीकरणे तयार करणे तसेच विविध प्रशासकीय कामांमध्ये AI आधारित साधनांचा प्रभावी वापर करता येतो. त्यामुळे शिक्षकांनी AI विषयक मूलभूत ज्ञान व कौशल्ये आत्मसात करणे ही काळाची गरज आहे.

सदर कोर्सद्वारे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व मशीन लर्निंग (Machine Learning) यांच्या मूलभूत संकल्पना, शिक्षण क्षेत्रामधील AI चे विविध उपयोग, AI आधारित उपयुक्त साधनांचा प्रभावी वापर, AI चा जबाबदार, सुरक्षित व नैतिक (Responsible AI) वापर तसेच दैनंदिन शैक्षणिक व प्रशासकीय कामकाजामध्ये AI चा प्रभावी समावेश करण्याच्या पद्धती यांविषयी मार्गदर्शन करण्यात आले आहे.

राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) २०२० नुसार प्रत्येक शिक्षकाने दरवर्षी ५० तासांचे सतत व्यावसायिक विकास (Continuous Professional Development CPD) प्रशिक्षण पूर्ण करणे अपेक्षित आहे. त्या अनुषंगाने सदर "AI Saathi for Educators" या ऑनलाईन कोर्ससाठी ४ तासांचे CPD प्रशिक्षण श्रेय (Weightage) निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंत अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांनी सदर कोर्स पूर्ण करणे आवश्यक आहे.

या कोर्ससाठी दिनांक ३१ ऑगस्ट २०२६ पर्यन्त प्रवेश घेता येणार असून कोर्स पूर्ण करण्याची अंतिम मुदत दिनांक ३० सप्टेंबर २०२६ आहे.

त्यामुळे आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांना आवश्यक सूचना देऊन राज्यातील इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंत अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांनी विहित कालावधीत कोर्समध्ये प्रवेश घेऊन अंतिम मुदतीपूर्वी कोर्स पूर्ण करतील, याबाबत आवश्यक कार्यवाही करावी.

महत्त्वाचे मुद्दे:

  • इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंत अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी हा कोर्स पूर्ण करणे आवश्यक आहे.
  • हा कोर्स DIKSHA Portal वर उपलब्ध आहे.
  • कोर्समध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), मशीन लर्निंग, जबाबदार AI वापर, अध्यापनातील AI चा उपयोग आणि प्रशासकीय कामातील AI याबाबत प्रशिक्षण दिले जाते.
  • हा कोर्स ५ तासांचा CPD (Continuous Professional Development) प्रशिक्षण म्हणून ग्राह्य धरला जाईल.
  • प्रवेशाची अंतिम तारीख: दिनांक ३१ ऑगस्ट २०२६
  • कोर्स पूर्ण करण्याची अंतिम तारीख: दिनांक ३० सप्टेंबर २०२६

DIKSHA Portal वर "AI Saathi for Educators" कोर्स पूर्ण करण्याची प्रक्रिया

  1. DIKSHA App मोबाईलमध्ये डाउनलोड करा किंवा DIKSHA पोर्टलवर लॉगिन करा.

  2. नवीन वापरकर्ता असल्यास नोंदणी (Sign Up) करा.

    • मोबाईल नंबर/ई-मेल वापरा.
    • OTP पडताळणी करा.
    • संपूर्ण प्रोफाइल भरा (राज्य – महाराष्ट्र, शिक्षक पद, शाळा इ.).
  3. लॉगिन केल्यानंतर Courses किंवा DIKSHA Courses विभाग उघडा.

  4. Search मध्ये AI Saathi for Educators असे टाइप करा.

  5. संबंधित कोर्स निवडून Enroll वर क्लिक करा.

  6. कोर्समधील सर्व व्हिडिओ, वाचन साहित्य आणि उपक्रम पूर्ण करा.

  7. शेवटी असलेली Quiz/Assessment पूर्ण करा.

  8. कोर्स 100% पूर्ण झाल्यानंतर Certificate डाउनलोड करून जतन करा.

महत्त्वाच्या तारखा

  • प्रवेशाची अंतिम तारीख: दिनांक 31 ऑगस्ट 2026
  • कोर्स पूर्ण करण्याची अंतिम तारीख: दिनांक 30 सप्टेंबर 2026
कोर्स सुरू करण्यापूर्वीची पूर्वतयारी

१. स्मार्टफोनवरून कोर्स पूर्ण करण्यासाठी

(अ) DIKSHA App डाउनलोड करणे:

Google Play Store चरून DIKSHA App डाउनलोड करून त्यामध्ये नोंदणी करावी व संपूर्ण प्रोफाईल भरावी.

प्रोफाईल भरताना आपल्या पदनामाशी तंतोतंत जुळणारे पदनाम उपलब्ध नसल्यास त्यास सर्वाधिक जवळचे पदनाम निवडावे. तसेच संबंधित पदनाम उपलब्ध नसल्याची माहिती राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या निदर्शनास आणून द्यावी, जेणेकरून पुढील अद्ययावतीकरणामध्ये आवश्यक पदनामांचा समावेश करता येईल.

(आ) DIKSHA Courses App डाउनलोड करणे :

प्रोफाईल पूर्ण झाल्यानंतर Google Play Store वरून DIKSHA Courses हे App डाउनलोड करावे.

त्यानंतर खालील लिंकवर क्लिक करून कोर्समध्ये प्रवेश (Enroll) घ्यावा,

खालील लिंक वर क्लिक करा 

➤ 1) खालील लिंक वर क्लिक करा 

कोर्स लिंक:

खालील लिंक वर क्लिक करा 

➤ 1) खालील लिंक वर क्लिक करा 

२. Laptop/Desktop (Browser) द्वारे कोर्स पूर्ण करण्यासाठी
करावी Browser द्वारे कोर्स पूर्ण करू इच्छिणाऱ्या शिक्षकांनी www.diksha.gov.in या संकेतस्थळावर Login अथवा नोंदणी
DIKSHA App मध्ये यापूर्वीच त्याच ई-मेल आयडीद्वारे नोंदणी केलेली असल्यास त्याच Login द्वारे प्रवेश करता येईल. अशा वेळी पुन्हा प्रोफाईल भरण्याची आवश्यकता नाही. प्रथमच Login करत असल्यास आवश्यक ती प्रोफाईल माहिती पूर्ण भरावी.
Login केल्यानंतर मुख्य पृष्ठावरील "DIKSHA Courses" या Tab वर क्लिक करावे, त्यानंतर Scarch पर्यायामध्ये "AI Saathi for Educators" (शिक्षकांसाठी AI साथी) शोधून अथवा उपरोक्त लिंकवर क्लिक करून कोर्समध्ये प्रवेश (Enroll) घ्यावा,
कोर्स यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर प्राप्त होणारे प्रमाणपत्र डाउनलोड करून जतन करावे.
सदर बाबीस प्राधान्य देऊन आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांमधील शिक्षकांकडून विहित कालावधीत सदर कोर्स पूर्ण करून घेण्याबाबत आवाश्यक कार्यवाही करावी.

मार्गदर्शन व्हिडिओ आवश्यक पहा 


खालील लिंक वर क्लिक करा 

📲 Join WhatsApp Group 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad