Ads Area

World Womens Day Celebrate Various Programs

जागतिक महिला दिन साजरा

 करणेबाबत

दिनांक ८ मार्च २०२१

दिनांक ८ मार्च १९०८ रोजी अमेरिकेतील महिलांनी स्वत:च्या हक्कासाठी दिलेल्या लढयाच्या सन्मानार्थ संपूर्ण जगभरात दरवर्षी ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. देशात क्रांतीज्योती सावित्रीबाई, महात्मा ज्योतिबा फुले, महर्षी कर्वे, शाहू महाराज यांच्या अथक प्रयत्नाने स्त्रियांच्या शिक्षणाला दिशा प्राप्त झाली. आज महिला शिक्षण, वैदयकीय, कला, क्रीडा, राजकारण, समाजकारण, संशोधन अशा सर्वच क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाची मोहोर उमटवित आहेत. अशा प्रतिकूल परिस्थितीतील महिला कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून


महिला दिन सप्ताह

World Womens Day 

 दिनांक ८ मार्च २०२१ ते दिनांक १२ मार्च २०२१ या कालावधीत महिला दिन सप्ताह साजरा करण्यात यावा.

या अनुषंगाने राज्यस्तरावरून खालीलप्रमाणे विविध कार्यक्रम साजरे करण्यात येणार आहेत. तसेच खाली नमूद केलेले कार्यक्रम जिल्हास्तरावरून देखील साजरे करण्यात यावेत.

राज्यस्तरावर Online आयोजित करण्यात येणारे कार्यक्रम

शासनाच्‍या यूट्यूब चैनल वर ऑनलाइन मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित होणार आहे

त्याकरिता खालील यूट्यूब लिंक वर क्लिक करा

पहले सत्र


दुसरे सत्र



दिनांक ८ मार्च २०२१ ते दिनांक १२ मार्च २०२१ या कालावधीत 
ऑनलाइन सत्र हे उत्कृष्ट तज्ञ  महिलांकडून मार्गदर्शन होणार आहे

शाळा व जिल्हा स्तर उपक्रम

सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये ८ मार्च जागतिक महिला दिन साजरा करण्यात यावा
 आपल्या स्तरावरुन शाळा व जिल्हास्तरावरील उपक्रमात सहभागी झालेल्या विदयार्थ्यांना शिक्षकांना महिला दिन सप्ताहात सहभाग घेतलेल्या उपक्रमाशी संबधित व्हिडिओ / फोटो 

#womensdaymh2021

या HASHTAG (#) चा उपयोग करुन विविध Social Media वर (फेसबुक, इंस्ट्राग्राम, व्टिटर) वर अपलोड करावे.

वरील सर्व कार्यक्रमांचे आयोजन करताना कोविड -१९ चा विचार करुन ऑनलाईन माध्यमातून उपक्रम घेण्यात घ्यावेत व आवश्यक सर्व नियमावलीचे पालन करण्यात यावे.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad