Student Portal New Massage Of EO

0 श्री डि जे राठोड

 सरल वेबसाईटच्या स्टुडंट पोर्टल

 वरील महत्वाचा संदेश वाचा

Student Portal Maharashtra

मा. शिक्षणाधिकारी यांचा सरल वेबसाईटच्या स्टुडंट पोर्टल वरील महत्वाचा संदेश वाचा ते खालील प्रमाणे

आधार क्रमांकासह सरल प्रणालीमध्ये करणे बंधनकारक 

राज्यातील प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांची नोंद त्यांच्या आधार क्रमांकासह सरल प्रणालीमध्ये करणे बंधनकारक आहे. या संदर्भात आपल्याला यापूर्वी सुध्दा वेळोवेळी सूचना देण्यात आली आहे.

 सदर नोंदीच्या आधारावरच संचमान्यता 2021 करण्यात येणार आहे, याची सुध्दा आपल्याला जाणीव आहे.

शिक्षक अतिरिक्त Sanch Manyata

सर्व विद्यार्थ्यांची आधारसह नोंद न झाल्यास आपल्या शाळेतील काही शिक्षक अतिरिक्त होण्याचीही शक्यता आहे.

 तरीसुध्दा अजून आपल्यामार्फत १००% मुलांची अचूक आधार नोंदणी करण्यात आली नाही असे लक्षात आले आहे.

Match Data

सरल प्रणालीमध्ये नोंदणी करण्यात आलेल्या आणि प्रत्यक्ष आधार नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठी तफावत असल्याचे दिलेल्या आकडेवारीवरुन दिसून येते.

 सदर बाबतचा तपशील पुढील तक्त्यात दर्शविला आहे.

Student Portal Login

शाळा लॉगीनमध्ये विद्यार्थीनिहाय माहिती उपलब्ध करून दिली आहे. असेही लक्षात आले आहे की, काही विद्यार्थ्यांच्या कोणतीही नोंद अभिलेखाशी जुळत (Match) नाही, ही फार गंभीर बाब आहे.

 सदर डेटा शासनामार्फत UIDAI (आधार ) डेटा बेसशी मॅच करण्यात येईल व अवैध आधार दिसल्यास, किंवा एकाच विद्यार्थ्यांची २ ठिकाणी नोंदणी केल्याचे आढळल्यास हा गुन्हा समजला जाईल याची नोंद घ्यावी. 

तरी खालीलप्रमाणे त्वरित कार्यवाही करावी -

1. ज्या विद्यार्थ्यांची आधार नोंदणी सरल प्रणालीमध्ये केली आहे, मात्र आधार व सरल प्रणालीतील नोंदींमध्ये (entries ) तफावत आहे, ( उदा: नावात, जन्म तारिख, लिंग ) त्याची त्वरीत तपासणी करुन १००% चुका दुरुस्त करुन घेण्यात याव्यात.

2. तसेच ज्या विद्यार्थ्यांची आधार नोंदणी सरल प्रणालीत अजूनही केलेली नाही त्यांची आधार क्रमांकाची नोंद सरल प्रणालीत त्वरीत अद्ययावत करावी. आपल्याला ही शेवटची संधी म्हणून नोटिस देण्यात येत आहे.

 यापुढे ज्या विद्यार्थ्यांची आधार नोंदणी नाही, किंवा चुकीची नोंद आहे, दुबार नोंद आहे, किंवा अवैध आधार आहे, अशांना पटसंख्येत ग्राहय धरले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

आपल्या स्तरावरुन अचूक नोंदी करुन अवैध विद्यार्थी संख्या पटावरुन कमी करावी.

हे सुध्दा महत्वाचे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

About Us

डिजिटल BRC Smart E - Learning, Test Online, Educational, General Knowledge , Scholarship Tips Include in My Website. Education Contain and Much more in My Website