विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड मधील माहितीची तपासणी होणार
सरल प्रणालीमध्ये नोंदणी करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड मधील माहितीची तपासणी करणे बाबत
संदर्भ दिनांक ४ ऑक्टोबर, २०२१ रोजी मंत्रालयात संपन्न झालेली VC Group दिनांक ४ ऑक्टोबर, २०२१ रोजी अपर मुख्य सचिव, शालेय शिक्षण यांच्या दालन क्र. ४२४, मंत्रालय जोड इमारत, मुंबई येथे विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणी सरल प्रणालीमध्ये अद्यावत करणे बाबत व्हिडीओ कॉन्फरन्स बैठक आयोजित करण्यात आली होती
सदर बैठकीस मंत्रालयामध्ये आयुक्त शिक्षण, श्री. सुन्मेश जोशी, UIDAI प्रतिनिधी, NIC चे प्रतिनिधी व इतर अधिकारी उपस्थित होते तसेच पुणे येथील NIC चे प्रतिनिधी बैठकीस उपस्थित होते.
सदर बैठकीमध्ये असे निदर्शनास आले की, सरल प्रणालीमध्ये नोंदवण्यात आलेल्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड वरील माहिती व शाळेतील पटावरील नोंदी यांच्यामध्ये तफावत असल्याचे दिसून आले आहे. अशा विद्यार्थ्यांचा डेटा सरल प्रणालीवरून प्राप्त करून घ्यावा. याबाबत आपणास विनंती करण्यात येते की आपल्या अधिपत्याखालील गट साधन केंद्र व समुह साधन केंद्र (BRC/CRC) स्तरावरील अधिकारी मार्फत याची तपासणी करण्यात यावी व त्याचा अहवाल शासनास सादर करावा.
अपर मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन

आपली प्रतिक्रिया व सूचना