Reading Campaign Eleven Week For Student

0 श्री डि जे राठोड

१०० दिवसांकरिता वाचन अभियान

 राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र ,पुणे

 १०० दिवस वाचन अभियान

  केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यात

 दिनांक १ जानेवारी २०२२ पासून शंभर दिवस वाचन अभियान (Reading campaign) हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. यामध्ये विद्यार्थ्यांच्या वाचन कौशल्य व अभिरुची विकसित होण्यासाठी दर आठवड्याला बालवाटिका ते इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांसाठी वाचन संदर्भाने वेगवेगळे उपक्रम घेणे अपेक्षित आहे

 नियोजनानुसार इयत्ता निहाय विद्यार्थ्यांना खालील उपक्रम करण्यास प्रोत्साहित करावे.

 आठवडा अकरावा सुरू

   दिनांक १२/३/२०२२ ते १८/३/२०२२

गट -१

 बाल वाटिका ते इयत्ता दुसरी

 उपक्रम - गंमती- जमती

शिक्षक मुलांसोबत एखाद्या जादुगारा प्रमाणे वेशभूषा व अभिनय करू शकतात व त्यावेळी याप्रमाणे जादुगारा प्रमाणे उच्चार करतात उदा. आबरा का डाबरा गिली गिली छू

विद्यार्थी काही सर्जनशील संदेश (magic charm)तयार करू शकतात जेणेकरून चांगल्या कामासाठी त्यांची उपयोग करतील तसेच वर्गासमोर त्याचे वाचन करतील

गट -२

 इयत्ता तिसरी ते इयत्ता पाचवी

 उपक्रम -  मुखपृष्टा वरून पुस्तक ओळखणे

पुस्तक सप्ताह किंवा साहित्य दिनाच्या उत्सवाचा एक भाग म्हणून शिक्षक विद्यार्थ्यांना त्याच्या आवडत्या पुस्तकासाठी मुखपृष्ठ तयार करण्यास सांगतील.

 सामग्रीशी संबंधित मुखपुष्ट तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रथम पुस्तक वाचायला सांगतील.

गट -३

 इयत्ता सहावी ते आठवी

 उपक्रम  - व्टिस्ट (रंजक वळण)

शिक्षक तयारीची पायरी म्हणून एक मनोरंजक कथा निवडतील तसेच विद्यार्थ्यांचे लहान गट करतील.

गटा पैकी एकाने ही कथा वर्गाला वाचून दाखवावी पुढे शिक्षक इतर / विद्यार्थ्यांना कथेचा शेवट वेगळ्या पद्धतीने करण्याबाबत सांगतील.

संचालक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

About Us

डिजिटल BRC Smart E - Learning, Test Online, Educational, General Knowledge , Scholarship Tips Include in My Website. Education Contain and Much more in My Website