SET Exam Postponed New Update Information

0 श्री डि जे राठोड

SET महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट)
परीक्षा पुढे ! नवीन तारीख जाहीर 

संकेतस्थळ : https://setexam.unipune.ac.in

सहायक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा 

दिनांक ०७ जुलै, २०२६ रोजी सेट विभागाच्या संकेतस्थळावर जाहीर प्रकटन प्रसिध्द करण्यात आले आहे. सदर प्रकटनात ४१ व्या सेट परीक्षेची संभाव्य तारीख दिनांक ६ सप्टेंबर, २०२६ अशी जाहीर करण्यात आली असून या तारखेबाबत काही शैक्षणिक गैरसोय अथवा अडचणी निदर्शनास आल्यास त्या पडताळून त्यानुसार अंतिम निर्धारित तारीख पुढील १५ दिवसांत सविस्तर वेळापत्रकासह जाहीर करण्यात येईल असे जाहीर करण्यात आले आहे.

परंतू दिनांक ६ सप्टेंबर, २०२६ रोजी CTET ही केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा पूर्वनियोजित असल्याने दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात आल्यास विद्यार्थ्यांना कोणत्याही एका परीक्षेपासून वंचित रहावे लागेल, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून सेट परीक्षेची तारीख बदलण्यात यावी यासाठी विद्यार्थ्यांचे ईमेल व पत्र सेट विभागास प्राप्त झाले आहेत.

विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेता कोणताही विद्यार्थी सेट परीक्षेपासून वंचीत राहू नये यासाठी दिनांक ६ सप्टेंबर, २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेली सेट परीक्षा पुढे ढकलण्यात येत असून सदर परीक्षा दिनांक २७ सप्टेंबर, २०२६ रोजी आयोजित करण्यात येईल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.

What's Up Grotup Join 

➤ What's Up Group Join 

What's Up ग्रुप जॉईन करा
WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

About Us

डिजिटल BRC Smart E - Learning, Test Online, Educational, General Knowledge , Scholarship Tips Include in My Website. Education Contain and Much more in My Website