Teachers Interdistrict Transfer Guideline

शिक्षकांच्या आंतरजिल्हा

बदलीत सर्व जिल्ह्यांचा समावेश

Interdistrict of teachers

 All districts included in the transfer

सन २०२२ मध्ये या वर्षात जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांबाबत मार्गदर्शन


ऑनलाईन पध्दती

१.जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत तसेच आंतरजिल्हा बदल्या ह्या ऑनलाईन पध्दतीने करण्याबाबत दिनांक ७.४.२०२१ च्या शासन निर्णयान्वये सुधारित धोरण निश्चित करण्यात आले आहे. त्यास अनुसरुन सन २०२२ मधील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन पध्दतीने करण्याकरिता मे. विन्सीस सॉफ्टवेअर कंपनीची नेमणूक करण्यात आलेली आहे असे परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे

जास्त जागा रिक्त

 २. जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीसंदर्भातील दिनांक ७.४.२०२१ च्या शासन निर्णयातील मुद्दा २.८ मध्ये "सदरच्या बदल्या ह्यापुर्वी निश्चित केलेल्या धोरणानुसार १०% पेक्षा जास्त जागा रिक्त असल्यास त्या जिल्हा परिषदांमधून शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीने बाहेर जाता येणार नाही. 

जिल्ह्यातून बाहेर जाण्याकरिता रिक्त पदांची टक्केवारी १०% पेक्षा कमी असणे गरजेचे आहे." अशी तरतुद आहे.

 परंतु, ज्या जिल्हा परिषदेमध्ये रिक्त पदांची टक्केवारी १०% पेक्षा जास्त असेल त्या जिल्हा परिषदेला बदली प्रक्रियेमध्ये सहभाग घेता येणार नाही, अशी कुठलीही तरतुद दिनांक ७.४.२०२१ च्या शासन निर्णयामध्ये करण्यात आलेली नाही.

सदरची बदली प्रक्रिया ही बिंदुला बिंदु अशापध्दतीने होणे अपेक्षीत आहे जर काही जिल्हा परिषदेमधील रिक्त पदांची टक्केवारी १०% पेक्षा जास्त असल्यास त्या जिल्ह्यामध्ये शिक्षकांची नियुक्ती झाल्यानंतर तेथील बदली झालेल्या शिक्षकांना अन्य जिल्हा परिषदेमध्ये आंतरजिल्हा बदलीने कार्यमुक्त करणे शक्य होईल. 

त्यामुळे जिल्हा परिषदांमध्ये रिक्त पदांची टक्केवारी १०% पेक्षा जास्त असली तरी, अशा सर्व जिल्हा परिषदांना, जिल्हा परिषद शिक्षकांच्या सन २०२२ मध्ये होणाऱ्या ऑनलाईन बदली प्रक्रियेमध्ये सहभागी करुन घेणे आवश्यक आहे, असे परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे

सर्व जिल्ह्यांचा समावेश

३. सबब, असे नमूद करण्यात येते की, मे. विन्सीस सॉफ्टवेअर कंपनीने सन २०२२ मधील प्राथमिक शिक्षकांच्या बदलीबाबतच्या ऑनलाईन संगणक प्रणालीमध्ये सर्व जिल्ह्यांचा समावेश करण्यात यावा.

असे परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad