Good News State Employees Increase DA Allowance

खुशखबर ! राज्य कर्मचाऱ्यांच्या 

महागाई भत्त्याच्या दरात वाढ !

दिनांक १७ ऑगस्ट रोजी शासन

निर्णय निर्गमित

 आजचा अधिकृत शासन परिपत्रक

राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात DA Increase दिनांक १ जानेवारी, २०२२ पासून सुधारणा करण्याबाबत

ऑगस्ट महिन्याच्या पगारात होणार वाढ ! सविस्तरपणे जाणून घ्या

आता राज्य सरकारने राज्य कर्मचारी करिता महागाई भत्ता संदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे

राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता.

१. महागाई भत्त्याचा दरात ३% ने वाढ

 महागाई भत्ता थकबाकी सह देणार

दिनांक १७ ऑगस्ट २०२२ रोजी महाराष्ट्र शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांसाठी ३४% महागाई भत्ता जाहीर केला आहे तसेच जानेवारी २२ ते जुलै २२ पर्यंतचा ३% फरक ही ऑगस्ट च्या पगारासोबत रोखीने देण्याचे जाहीर केले आहे

२. शासन असे आदेश देत आहे की, दिनांक १ जानेवारी, २०२२ पासून ७ व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर ३१ % वरुन ३४ % करण्यात यावा. 

सदर महागाई भत्ता वाढ दिनांक १ जानेवारी, २०२२ ते दिनांक ३१ जुलै,२०२२ या कालावधीतील थकबाकीसह माहे ऑगस्ट, २०२२ च्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावी, असे वित्त विभागाने शासन परिपत्रक निर्गमित केले आहे

३. महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपध्दती आहे त्याचप्रकारे यापुढे लागू राहील.

४. यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते ज्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात येतात, त्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा. 

अनुदानप्राप्त संस्था व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत, संबंधित प्रमुख लेखाशीर्षाखालील ज्या उप लेखाशीर्षाखाली त्यांच्या सहाय्यक अनुदानाबाबतचा खर्च खर्ची टाकण्यात येतो, त्या उप लेखाशीर्षाखाली हा खर्च खर्ची टाकण्यात यावा

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२२०८१७१४४४३००४०५ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित  करुन शासन परिपत्रक काढण्यात येत आहे

आपला पगार काढा मोबाईलवर

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad