शाळा विकास आराखडा
मार्गदर्शन व नमुना पीडीएफ
डाऊनलोड करा
शाळा विकास आराखडा २०२४ - २०२५
मार्गदर्शक सूचना
शाळा विकास आराखडा २०२४ - २०२५ करिता तयार करायचे आहे त्याकरिता खालील सूचना
• बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम, 2009 अंतर्गत कलम 22 (1) नुसार शाळा व्यवस्थापन समितीने शाळा विकास आराखडा तयार करावयाचा आहे. संबंधित केंद्रप्रमुख / समन्वयक यांनी आराखड्याचे मूल्यमापन करावे. हा आराखडा स्थानिक प्राधिकरणाला करावयाचा आहे.
• शाळा विकास आराखडा पुढील चार क्षेत्रांवर आधारित राहील शाळा सुविधा, समता, गुणवत्ता आणि लोकसहभाग.
शाळा विकास आराखडा हा समूह आराखडा, गट/मनपा आराखडा, जिल्हा / राज्य वार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्रक निर्मितीचा पाया आहे. म्हणून शाळा विकास आराखड्यातील आकडेवारी अचूक असावी.
• प्रास्ताविकाच्या शेवटी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य सचिव यांची स्वाक्षरी असावी.
• गाव/वार्डातील शैक्षणिक बाबींचा नकाशामध्ये बालवाडी / अंगणवाडीपासून माध्यमिक स्तरापर्यंतच्या सर्व शैक्षणिक सुविधांचा समावेश नकाशात असावा. सदर आराखडा सादर करणाऱ्या मूळ शाळेपासून चालत जाण्याचे अंतर, माध्यम आणि व्यवस्थापन प्रकार नमूद करावे..
• बाणाने रेषेशेजारी त्या वस्तीचे शाळेपासूनचे चालत जाण्यायोग्य रस्त्याचे अंतर कि.मी. लिहावे. क्र. 1 वर शाळा ज्या वस्तीमध्ये आहे त्यावस्तीचे नाव आहे.
• स्थानिक प्राधिकरण म्हणजे ग्रामपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिका किंवा कटक मंडळ होय.
शाळा वस्तीबाबत माहिती देताना जणगणना 2011 चा संदर्भ घ्यावा.
शाळा विकास आराखडा खालील लिंक वर क्लिक करून PDF डाऊनलोड करा
शाळा विकास आराखडा PDF
शाळा विकास आराखडा PDF
शाळा विकास आराखडा खालील लिंक वर क्लिक करून Excel Sheet डाऊनलोड करा


सर्व माहिती तयार खूपच मेहनत घेतली आहे. याचा उपयोग सर्वानापर्यंत पोहोचुदे
ReplyDeleteखूप उपयोगी माहिती तयार दिल्याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
ReplyDeleteआपली प्रतिक्रिया व सूचना