Senior And Selection Traning Completed About Certificate

वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण पूर्ण

केलेल्या उमेदवारांच्या प्रशिक्षण

प्रमाणपत्राबाबत...

शासन निर्णयान्वये वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण ऑनलाईन स्वरूपामध्ये राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे या कार्यालयामार्फत सुरु करण्यात आले होते.

 सदर प्रशिक्षणासाठी नावनोंदणी करणेसाठी या कार्यालयामार्फत ऑनलाईन पोर्टल चे विकसन करून यामार्फत प्रशिक्षण नावनोंदणी करून घेण्यात आली होती. 

सदरच्या पोर्टल वर नावनोंदणी करीत असताना संदर्भ क्र. २ बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार-२००९ च्या अनुषंगाने वर्ग जोडणे बाबतच्या शासन निर्णय दिनांक २८ ऑगस्ट २०१५ मध्ये नमूद

 परिच्छेद क्रमांक २.१ २.२ व २.३ मध्ये नमूद केल्याप्रमाणे प्राथमिक शाळा (इ. १ ली ते ५ वी), उच्च प्राथमिक शाळा (इ. ६ वी ते ८ वी) व माध्यमिक शाळा (इ.९ वी ते १० वी ) असे स्तर विचारात घेवून खालीलप्रमाणे गट निवडण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेले होते.

प्राथमिक शिक्षक (इ. १ ली ते ८ वी) गट निवडलेल्या शिक्षकांपैकी काही शिक्षक इयत्ता ६ वी ते ८ वी ला शिकविणारे असून माध्यमिक शिक्षकांची वेतनश्रेणी घेत आहेत.

 अशा शिक्षकांनी वरिष्ठ व निवड श्रेणी चे ऑनलाईन प्रशिक्षण प्राथमिक शिक्षक (इ. १ ली ते ८ वी) गटात पूर्ण केले असून पोर्टल वरील नोंदीनुसार त्यांच्या प्रशिक्षण प्रमाणपत्रावर प्राथमिक शिक्षक व प्रशिक्षण प्रकार नमूद करण्यात आलेला आहे. 

उदा. प्राथमिक शिक्षक वरिष्ठ वेतन श्रेणी/ निवड श्रेणी. 

तरी बालकांचा मोफत शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार उक्त नमूद नुसार जे शिक्षक इयत्ता

 ६ वी ते ८ वी च्या वर्गाला अध्यापन करीत आहेत व ज्यांना माध्यमिक शिक्षकांची वेतनश्रेणी यापूर्वी लागू करण्यात आलेली आहे

अशा शिक्षकांचे सद्यस्थितीमध्ये प्राप्त प्राथमिक शिक्षक वरिष्ठ वेतन श्रेणी/ निवड श्रेणी प्रमाणपत्र वेतनश्रेणी लागू करणेसाठी ग्राह्य धरण्यात यावे.

असे परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे

 (मा. संचालक यांचे मान्यतेने)

 प्रत माहितीस्तव सविनय सादर

 सहसंचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.

 मा. सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई. मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, मध्यवर्ती इमारत, पुणे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad