Good News DA Allowance Increase Salary

0 श्री डि जे राठोड

खुशखबर ! राज्य शासकीय कर्मचारी

यांच्या महागाई भत्त्याच्या दरात 4%

ने  वाढ ! आजचे  शासन परिपत्रक

दिनांक १० जानेवारी २०२३ रोजी चे शासन निर्णय जाहीर

महागाई भत्त्याचा दर ३४ % वरुन ३८% वाढविण्यात आला

१) राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता.

२. शासन असे आदेश देत आहे की, दिनांक १ जुलै, २०२२ पासून ७ व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर ३४ % वरुन ३८% करण्यात यावा. 

थकबाकीसह वेतनासोबत रोखीने 

सदर महागाई भत्ता वाढ दिनांक १ जुलै, २०२२ ते दिनांक ३१ डिसेंबर, २०२२ या कालावधीतील थकबाकीसह माहे जानेवारी, २०२३ च्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावी.



३. महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपध्दती आहे त्याचप्रकारे यापुढे लागू राहील.

४. यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते ज्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात येतात, त्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा. 

अनुदानप्राप्त संस्था व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत, संबंधित प्रमुख लेखाशीर्षाखालील ज्या उप लेखाशीर्षाखाली त्यांच्या सहाय्यक अनुदानाबाबतचा खर्च खर्ची टाकण्यात येतो, त्या उप लेखाशीर्षाखाली हा खर्च खर्ची टाकण्यात यावा.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२३०११०१८४३३३६२०५ असा डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

आपला पगार थकबाकीसह काढा

खालील लिंक वर क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

About Us

डिजिटल BRC Smart E - Learning, Test Online, Educational, General Knowledge , Scholarship Tips Include in My Website. Education Contain and Much more in My Website