इ. 5 वी व इ. 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेत
राज्य गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांचा
गुणगौरव होणार ! आयुक्त
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृती परीक्षा (इ. 5 वी ) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी ) जुलै - 2022 मध्ये राज्य गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्याबाबत.....
उपरोक्त विषयानुसार आपणास कळविण्यात येते की, संदर्भ क्र. 1 व 2 अन्वये पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृती परीक्षा (इ. 5 वी ) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी ) मध्ये स्पृहणीय यश संपादन करुन राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत स्थान मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी त्यांचा सत्कार समारंभ दिनांक 15 ऑगस्ट रोजी ध्वजारोहणानंतर अथवा त्याच दिवशी स्वतंत्रपणे कार्यक्रम आयोजित करुन संबंधित जिल्हयाच्या मा. पालकमंत्री महोदय यांच्या हस्ते करावा तसेच सदर सत्कार समारंभाची सर्व व्यवस्थासंबंधित जिल्हयाचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी करावी असे शासन निर्णयात नमूद 'आहे.
तथापि सदर परीक्षेचे आयोजन उशिरा झाल्याने सदर गुणगौरव कार्यक्रम
दिनांक 15 ऑगस्ट रोजी करता आलेला नाही.
परंतु विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमापासून वंचित राहू नये याकरीता सदर गुणगौरव कार्यक्रम दिनांक 26 जानेवारी, 2023 रोजी ध्वजारोहणानंतर अथवा त्याच दिवशी स्वतंत्रपणे आयोजित करता यावा याकरीता शिष्यवृती परीक्षा इ. 5 वी व इ. 8 वी जुलै 2022 मध्ये राज्य गुणवत्ता यादीतील (ग्रामीण / शहरी/ सी.बी.एस.ई./ आय.सी.एस.ई.) विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रे दिनांक 20/01/2023 रोजीपर्यंत आपणास प्राप्त होतील असे नियोजन केलेले आहे.
तरी आपल्या जिल्हयातील राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यासाठी दिनांक 26 जानेवारी, 2023 रोजी सत्कार समारंभाचे आयोजन करण्याच्या दृष्टीने आपले स्तरावरुन उचित कार्यवाही करण्यात यावी असे परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे


आपली प्रतिक्रिया व सूचना