Z P Teacher Regarding Inter District Transfers

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या 

आंतरजिल्हा बदल्यांबाबत

शासन परिपत्रक निर्गमित


प्रति,

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व).

 जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांबाबत.

संदर्भ:- : १) या विभागाचा शासन निर्णय क्र. जिपब ४८२०/प्र.क्र.२९०/आस्था. १४,

दिनांक ७.४.२०२१. २) या विभागाचा शासन निर्णय क्र. जिपब २०२२/प्र.क्र.२९/आस्था. १४, दिनांक १४.०३.२०२३

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत तसेच आंतरजिल्हा बदल्यां ऑनलाईन पध्दतीने करण्याबाबत दिनांक ०७.०४.२०२१ रोजीच्या शासन निर्णयान्वये धोरण निश्चित करण्यात आले आहे. 
सदर धोरणानुसार सन २०२२ मध्ये आंतरजिल्हा बदली प्रक्रीया ऑनलाईन पोर्टल द्वारे पारदर्शी पध्दतीने राबविण्यात आलेली आहे. 
सदर प्रक्रीया राबविताना विविध शिक्षक संघटनाकडून प्राप्त झालेली निवेदने व न्यायालयीन प्रकरणे विचारात घेता, सन २०२३ साठी आंतरजिल्हा / जिल्हांतर्गत बदली प्रक्रीयेबाबतच्या शासन निर्णयामध्ये सुधारणा सुचविण्याकरिता दिनांक १४.०३.२०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये अभ्यासगट गठीत करण्यात आलेला आहे. 
सदर अभ्यासगटाकडून प्राप्त होणाऱ्या सूचनानुसार दिनांक ०७.०४.२०२१ रोजीच्या आंतरजिल्हा बदली बाबतच्या शासन निर्णयामध्ये सुधारणा करण्याची कार्यवाही स्वतंत्रपणे सुरु आहे.

३. याकरिता सन २०२३ साठी आंतरजिल्हा बदली प्रक्रिया राबविण्याच्या अनुषंगाने खालील मुद्यांनुसार कार्यवाही करण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व) यांना कळविण्यात यावे.

१. निव्वळ रिक्तपदांची यादी (Clear Vacancy) 
२. शिक्षकांचे रोस्टर ( बिंदुनामावली)

विभागीय आयुक्त, मागासवर्गीय कक्षाकडून तपासून घेणे. 
३. सन २०२३ च्या आंतरजिल्हा बदली प्रक्रीयेमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक असणारे जे शिक्षक पदोन्नत झालेले आहेत अशा शिक्षकांनी स्वखुशीने पदावनत करण्याबाबत दिलेल्या संमती पत्राबाबत निर्णय घेणे

१४. सन २०२३ च्या आंतरजिल्हा बदली प्रक्रीयेमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक असणाऱ्या अनुसुचित जमातीचे शिक्षक स्थानिक अनुसूचित जमातीचे आहेत किंवा कसे याबाबत पडताळणी करुन त्यांना संमतीपत्र देणे.

५. सन २०२३ च्या आंतरजिल्हा बदली प्रक्रीयेमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक असणाऱ्या शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीस अनुसरुन काही न्यायालयीन / लोकायुक्त / अन्य न्यायाधिकरण यांचे स्वयंस्पष्ट आदेश असल्यास अशा आदेशांची प्रत, मुळ याचिकेचे प्रत गटशिक्षण अधिकाऱ्यांकडे उपलब्ध करुन देण्याबाबत सुचना देणे.

उपरोक्त परिच्छेद क्र. २ प्रमाणे कार्यवाही दिनांक १५.०५.२०२३ पर्यंत पुर्ण करण्याची दक्षता आपण घ्यावी, असे परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad