Scholarship Exam Application Form Apply

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृती परीक्षा (इ. 5 वी ) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी ) फेब्रुवारी - 2024 साठी विद्यार्थ्यांची निवड करून आवेदनपत्र भरण्याची तयारी करणेबाबत

संदर्भ :- दि. 27/04/2023 रोजी परिषदेच्या राज्य समितीमधील चर्चा व निर्देश.

उपरोक्त संदर्भ व विषयान्वये पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृती परीक्षा (इ. 5 वी ) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) साठी दरवर्षी 9 ते 10 लाख विद्यार्थी प्रविष्ट होतात. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पात्र होणे, शाळांचा शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल वाढविणे आवश्यक आहे.

 विद्यार्थी निश्चित करून त्यांचे आवेदनपत्र भरणे तसेच त्यांच्या अभ्यासक्रम पूर्ण करून घेणे, त्यासाठी शाळांनी नियोजन करणे, तसेच वेळेत विद्यार्थ्यांची निवड व आवेदनपत्र भरण्याची कार्यवाही करणे आवश्यक आहे. 

शिष्यवृत्ती परीक्षेच्या मागील 5 वर्षांची सांख्यिकीय माहिती सोबत जोडली असून त्याचे अवलोकन केले असता त्यात बऱ्याच जिल्ह्यांमध्ये प्रविष्ट विद्यार्थी संख्या विचारात घेता निकालाच्या टक्केवारीत घट झाल्याचे दिसून येते.

परीक्षेला प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पाहता सन 2024 च्या परीक्षेसाठी शाळा सुरू होताच विद्यार्थ्यांची निवड करून आवेदनपत्र भरून घेण्याची कार्यवाही दिनांक 01/07/2023 पासून सुरू करण्याचे परिषदेचे नियोजन आहे.

 यामुळे वर्षाच्या सुरुवातीलाच विद्यार्थी निश्चित करून त्याप्रमाणे सदर परीक्षेची पूर्व तयारी करून घेता येईल.

 काही वेळा अर्हतेसाठी आवश्यक असणारे गुण विद्यार्थ्याने प्राप्त न झाल्यामुळे उपलब्ध संच वितरीत करता येत नाही. असे संच शिल्लक राहणे योग्य नाही.

त्या अनुषंगाने येणाऱ्या शैक्षणिक वर्षात शाळा सुरू होताच सर्व मुख्याध्यापकांची सभा घेऊन विद्यार्थी निवड करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचे नियोजन करावे व आवेदनपत्र भरण्याची कार्यवाही करण्याबाबतच्या आवश्यक सूचना आपले स्तरावरून देण्याची कार्यवाही करावी.

 परिषदेच्या स्तरावरून घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षांची माहिती विभागीय स्तरावर सर्व अधिकाऱ्यांची कार्यशाळा घेऊन यापूर्वीच माहे एप्रिलमध्ये देण्यात आलेल्या आहेत. याबाबत पुढील कार्यवाही व नियोजन आपले स्तरावरून करणे आवश्यक आहे.

 तशी कार्यवाही करून त्याबाबतचा अहवाल प्राथमिक, माध्यमिक शिक्षण संचालनालय व महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांना सादर करावा, असे परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे

शिष्यवृत्ती परीक्षा निकाल

शाळा पूर्व तयारी

माता पालक गट आइडीया

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad