Nav Bharat Sakshrta Abhiyan Training On Survey Mobile App SCERT Pune

नवभारत साक्षरता अभियान अंतर्गत सर्वेक्षण मोबाईल ॲप चे प्रशिक्षणाला उपस्थित राहावे ! SCERT Maharashtra 

Nav Bharat Sakshrta Abhiyan (NILP Survey Traning ) :-

प्रति,

1) शिक्षण उपसंचालक ( सर्व ),

2 ) प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व ), 3) शिक्षण अधिकारी प्राथमिक, माध्यमिक, योजना (सर्व) 4 ) शिक्षण निरीक्षक / प्रशासन अधिकारी मनपा / न पा (सर्व ) 

5) सर्व गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, 

6) सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, यांना सूचित करण्यात येते की आज दिनांक 7 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 1.00 वाजता नवभारत साक्षरता अभियान अंतर्गत उल्लास ॲप बाबतचे ऑनलाइन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. 

सदर प्रशिक्षण महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेच्या युट्युब चॅनेलवर ऑनलाइन पद्धतीने होणार असून सर्वांनी या प्रशिक्षणास वेळेवर जॉईन व्हावे तसेच आपल्या अधिनस्त नवभारत साक्षरता कार्यक्रम बाबत जबाबदारी असणारे अधिकारी तसेच आपल्या जिल्ह्यातील वरिष्ठ अधिव्याख्याता अधिव्याख्याता सर्व तालुक्यांचे गटशिक्षणाधिकारी, विस्ताराधिकारी, केंद्रप्रमुख तसेच आपल्या अधिनस्त सर्व शासकिय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचे मुख्याध्यापक यांना देखील प्रशिक्षणास उपस्थित राहून प्रशिक्षण घेणेबाबत आपल्या स्तरावर तात्काळ  आदेशित करावे

• राज्य साक्षरता केंद्र , राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे या केंद्राच्यावतीने आयोजित

नवभारत साक्षरता अभियान अंतर्गत सर्वेक्षण मोबाईल ॲप चे प्रशिक्षण.

•दिनांक 7 सप्टेंबर 23

•वेळ दु. 1.00 वा

• प्रास्ताविक

• नव साक्षरता अभियानाची माहिती

• सर्वेक्षण मोबाईल ॲप ची माहिती

• शंका समाधान

• आभार प्रदर्शन 

- अमोल येडगे ( भा प्र से)

संचालक

रा शै सं व प्र प महाराष्ट्र, पुणे 

खालील लिंक वर क्लिक करा

Live 

प्रशिक्षणाची युट्युब लिंक खालील प्रमाणे

Post a Comment

2 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. Syed Affan
    Asghar Husain Urdu high school and jr.college kholapur TQ bhatkuli dist. Amravati

    ReplyDelete

आपली प्रतिक्रिया व सूचना

Top Post Ad

Below Post Ad