इ.१० वी इ.१२ वी पुरवणी परीक्षेचा
निकाल जाहीर होणार ! महाराष्ट्र
राज्य परीक्षा मंडळ पुणे
जुलै-ऑगस्ट २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर करणेबाबत...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर. मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत माध्यमिक शालान प्रमाणपत्र (इ.१० वी) पुरवणी परीक्षा दिनांक १६ जुलै, २०२४ ते दिनांक ३० जुलै, २०२४ व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) ची पुरवणी परीक्षा दिनांक १६ जुलै, २०२४ ते ८ ऑगस्ट, २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात आली होती.
तथापि परीक्षा कालावधीत दिनांक २६/७/२०२४ रोजी राज्यातील काही जिल्हयांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला होता. त्यामुळे संपूर्ण राज्यात दिनांक २६/७/२०२४ रोजी असलेल्या इयत्ता १२ वी विषयांची परीक्षा दिनांक ०९/८/२०२४ रोजी व इयत्ता १० वीच्या विषयाची परीक्षा दिनांक ३१/०७/२०२४ रोजी घेण्यात आली.
सदर परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येत असून निकालाची कार्यपध्दती व त्याच्या कार्यवाहीचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
१) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळांमार्फत जुलै-ऑगस्ट २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) पुरवणी परीक्षेचा ऑनलाईन निकाल
खालील दोन संकेतस्थळांवर शुक्रवार, दिनांक २३/०८/२०२४ रोजी दुपारी ०१.०० वाजता जाहीर करण्यात येत आहे.
SSC Exam Result
२) ऑनलाईन निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) पुरवणी परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य
विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने www.mahahsscboard.in
या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना स्वतः अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. गुणपडताळणी व छायाप्रतीसाठी शनिवार, दिनांक २४/०८/२०२४ ते सोमवार, दिनांक ०२/०९/२०२४ पर्यंत अर्ज ऑनलाईन पध्दतीने करता येईल. त्यासोबतच ऑनलाईन पध्दतीने शुल्क (Debit Card/ Credit Card/UPI/ Net Banking) याद्वारे भरता येईल.
३) जुलै-ऑगस्ट २०२४ पुरवणी परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्यासाठी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून त्यापुढील कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपध्द्तीचा अवलंब करुन विहित नमुन्यात विहित शुल्क भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक राहील. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.
जुलै २०२४ मध्ये झालेल्या इ.१०वी, १२वी च्या पुरवणी परीक्षेच्या निकालाबाबत.
www.maharesult.nic.in
व
www.mahahsscboard.in
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे ४११००४
What's Up Group Join
आपली प्रतिक्रिया व सूचना