Mukhymantri Yuva Kary Prashikshan Yojana

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना २०२४ ! अंतर्गत स्थानिक D.El.Ed. किंवा B.Ed. झालेल्या विद्यार्थ्यांकरीता सुवर्णसंधी

राज्यामध्ये युवक वर्ग आपले शिक्षण पुर्ण करून दरवर्षी मोठ्या संख्येने नोकरी, व्यवसाय यांच्या शोधात बाहेर पडत आहे. अशा बहुतांश युवकांना व्यवसाय व नोकरी संबंधित अनुभवाचा अभाव असल्याने व्यवसाय सुरु करणे अथवा नोकरी प्राप्त करण्यामध्ये अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे दिसून येत आहे. या समस्येमुळे युवक वर्गामध्ये बेरोजगारीचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी अडचणी येत आहेत. विशेषतः यामध्ये १२ वी पास, विविध ट्रेड मधील आय.टी.आय., पदविकाधारक, पदवी आणि पदव्युत्तर युवकांचा समावेश आहे. सद्यस्थितीत राज्यातील अनेक उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी उपलब्ध असली तरी असे उद्योग व बेरोजगार युवक यांना साधणारा दुव्यांचा अभाव असल्याकारणाने युवकांना शिक्षणानंतर अनुभवा अभावी पूर्णवेळ रोजगार मिळणे कठीण होत असल्याचे निदर्शनास येत आहे.

१. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे स्वरूपः

महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जन-कल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवली जाणार आहे. या उपक्रमांर्तगत तयार केलेल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून रोजगार इच्छुक उमेदवार आणि रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योजक जोडले जातील. रोजगार इच्छुक उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव प्रशिक्षणातून मिळून त्यांची क्षमतावाढ होईल तसेच उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल. रोजगार इच्छुक उमेदवार आणि प्रशिक्षण देऊ इच्छिणारे उद्योजक विभागाचे संकेतस्थळावर सुलभतेने नोंदणी करतील.

१.१ या उपक्रमाअंतर्गत या योजनेकरिता विभागाच्या संकेतस्थळावर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. योजनेचे कामकाज उदा. उमेदवारांची नोंदणी, आस्थापनांची नोंदणी, कार्यप्रशिक्षण व्यवसाय नोंदणी, उपस्थिती नोंदविणे, विद्यावेतन अदा करणे, प्रशिक्षण रुजू व समाप्ती अहवाल, अनुभव प्रमाणपत्र इ. बाबी ऑनलाईन पद्धतीने करण्यात येतील. यासाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्याची जबाबदारी आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता यांची राहील.

१.२ बारावी, आय.टी.आय., पदविका, पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेले रोजगार इच्छुक उमेदवार ऑनलाईन नोंदणी करतील.

१.३ लघु आणि मध्यम (SMEs) व मोठे उद्योग, स्टार्टअप्स, सहकारी संस्था, शासकीय, निमशासकीय आस्थापना /महामंडळ, सामाजिक संस्था (कंपनी कायदा, २०१३ मधील सेक्शन ८) आणि विविध आस्थापना इ. यांना आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची मागणी विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने नोंदवतील. किमान २० रोजगार देणाऱ्या आस्थापना या कार्यप्रशिक्षणासाठी सहभागी होण्यासाठी पात्र असतील. या आस्थापना /उद्योगामध्ये सध्याच्या मनुष्यबळावर आधारित सुमारे १० लाख कार्य प्रशिक्षणच्या संधी प्रत्येक आर्थिक

२. सदर योजनेकरीता उमेदवाराची पात्रता खालिलप्रमाणे असेल :

२.१ उमेदवाराचे किमान वय १८ व कमाल ३५ वर्ष असावे.

२.२ उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता १२वी पास / आयटीआय / पदविका/ पदवी/ पदव्युत्तर असावी. मात्र शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेत सहभागास पात्र असणार नाहीत.

२.३ उमेदवार हा महाराष्ट्राचा अधिवासी असावा.

२.४ उमेदवाराची आधार नोंदणी असावी.

२.५ उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे.

२.६ उमेदवाराने कौशल्य, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करुन रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा.

सदर नियुक्ती ही फक्त सहा महिन्यासाठीच राहील. त्यानंतर आपोआप ही नियुक्ती समाप्त होईल.

या पदाकरिता खालीलअटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या उमेदवारानेच अर्ज सादर करावा अन्यथा फॉर्म रद्द करण्यात येईल.

१) सदर उमेदवाराने आपली नोंदणी कौशल विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालय येथे नोंदणी केलेली असावी.

२) सदर प्रशिक्षणार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.आधार कार्ड झेराक्स सोबत जोडावी.

३) सर्वप्रथम डी. एड.अथवा बी.एड. उमेदवार यांनी अर्ज करावा. बी.ए. उमेदवारही अर्ज करू शकतात.

परंतू डी.एड. अथवा बी.एड. उमेदवार नसेल तर बी.ए.  उमेदवाराची शाळा व्यवस्थापन समिती निवड करेल.

 ४) वयोमर्यादा ही १८ ते ३४ वर्ष सहा महीने राहील. 

 ५)अर्जासोबत प्रशिक्षणार्थी यांनी आधारकार्ड, मार्कलिस्ट, रहिवासी प्रमाणपत्र,टी.सी. झेरॉक्स जोडणे आवश्यक आहे.

६)प्रशिक्षणार्थी हा कुठेही नौकरीवर किंवा महाविद्यालयात शिक्षण घेत नसावा.

७) सदर प्रशिक्षणार्थी यांची नियुक्ती ही ६ महिन्याची असेल.तसेच शासनानुसार देय मानधन देण्यात येईल यासाठी बँकेसोबत आधार कार्ड लिंक असलेले खात्याची झेरॉक्स निवड झाल्यानंतर दयावी लागेलं

सदर ऑनलाईन उपस्थितीच्या आधारे प्रशिक्षणार्थीचे विद्यावेतन प्रशिक्षणार्थीच्या थेट बँक खात्यात (DBT) ऑनलाईन पद्धतीने दरमहा अदा करण्यात येईल.

• वर्ग 12 वि पास बेरोजगार विद्यार्थ्यांना  भेटणार 6000 रुपये

• डिप्लोमा झालेल्या विद्यार्थ्यांना मिळणार 8000 रुपये

• पदवीधर विद्यार्थ्यांना मिळणार 10000 रुपये

➤ खालील लिंक वर क्लिक करा


➤ खालील लिंक वर क्लिक करा


मार्गदर्शन व्हिडिओ पहा 


मार्गदर्शन व्हिडिओ पहा 
 

शासन परिपत्रक डाऊनलोड करा 


Post a Comment

2 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. खूप वाईट आम्ही काय करायचं मग ४० च्या वयात आम्हाला कोण देणार नोकरी आमचे शिक्षण वाया गेले.

    ReplyDelete
  2. Registration Kel pn back gelyamule Adar ci diltls nahi bhrta Ali atta kshi bhrayci

    ReplyDelete

आपली प्रतिक्रिया व सूचना

Top Post Ad

Below Post Ad