Summer Vacation Announce Schools In The State

राज्यातील शाळांना उन्हाळी सुट्टी जाहीर! 

शासन परिपत्रक निर्गमित 

School Holiday 2025 :- राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची सन 2025 ची उन्हाळी सुट्टी व शैक्षणिक वर्ष 2025-26 सुरु करणेबाबत

School Holiday

Maharashtra 2025

उपरोक्त संदभीय परिपत्रकान्वये शासनाने, संपूर्ण राज्यातील राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या उन्हाळी सुट्टीच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी सूचना निर्गमित केलेल्या आहेत. या अनुषंगाने राज्यातील राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची सन 2025 ची उन्हाळी सुट्टी व शैक्षणिक वर्ष 2025-26 सुरु करणेबाबत खालीलप्रमाणे सूचना निर्गमित करण्यात येत आहेत.

1. राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील विद्याव्यर्थ्यांना शुक्रबार, दिनांक 02 में, 2025 पासून सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.

2. राज्यातील इतर मंडळाच्या शाळा वेळापत्रकानुसार सुरु असल्यास अथवा अशा शाळांमध्ये महत्त्वाचे शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत असल्यास, विद्यार्थ्यांना स जाहीर करण्याबाबत शाळा प्रशासनाने त्यांच्या स्तरावर उचित निर्णय घ्यावा.

3. पुढील शैक्षणिक वर्ष सन 2025 - 2026 मध्ये विदर्भ वगळता इतर सर्व विभागातील राज्य मंडळाच्या शाळा सोमवार दिनांक 16 जून, 2025 रोजी सुरु करण्यात याव्यात.

4. जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळ्याच्या सुट्टी नंतर तेथील राज्य मंडळाच्या शाळा सोमवार, दिनांक 23 जून, 2025 ते 28 जून 2025 पर्यंत सकाळ सत्रात 7.00 ते 11.45 यावेळेत सुरु करण्यात याव्यात. सोमवार दिनांक 30.06.2025 पासून नियमित वेळेत सुरु करण्यात याव्यात.

वरील सूचना आपल्या अधिनस्थ सर्व मान्यता प्राप्त राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या निदर्शनास आणून द्याव्यात, असे शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे

वरिष्ठ व निवड श्रेणी 

शिष्यवृत्ती परीक्षा निकाल 

उपयुक्त माहिती PDF

➤ What's Up Group Join 

What's Up ग्रुप जॉईन करा
WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin Now

What's Up Group Join 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad