Kendra Pramukh Promotion Exam TET And CTET EXAM Information And Response Sheet Link Available

केंद्रप्रमुख परीक्षा TET व CTET 

परीक्षा उत्तीर्ण झाल्याची माहिती व 

गुणपडताळणी लिंक उपलब्ध ! MSCE

महाराष्ट्र शासनाच्या शासनपत्र क्र. संकीर्ण२०२२/प्र.क्र.८१/टिएनटि-१, दिनांक १५.०९.२०२२ व शासननिर्णय दि. २९.०८.२०२५ अन्वये महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हापरिषद मधील कार्यरत शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी "समुह साधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२५" या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने दि. ०३.०२.२०२६ व दि. ०४.०२.२०२६ या कालावधीत तीन सत्रात आयोजन करण्यात आले होते.

सदर परीक्षेचा निकाल दिनांक १३.०३.२०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे. 

सदर परीक्षेत पात्र उमेदवारांच्या नियुक्तीबाबत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) /CTET या परीक्षेत उत्तीर्ण झाला असाल तर सर्वात पहिली परीक्षा उत्तीर्ण झाल्याची माहिती खालील लिंक वर भरा 

➤ खालील लिंक वर क्लिक करा 

या लिंकवर दिनांक १६.०३.२०२६ ते दिनांक २१.०३.२०२६ पर्यंत भरण्यात यावी. 

सदरची माहिती दिलेल्या लिकंमध्येच भरण्यात यावी. 

ई-मेल, पत्राद्वारे किंवा इतर माध्यमाद्वारे सादर केलेली माहिती ग्राह्य धरण्यात येणार नाही. 

सदर मुदतीनंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.

➤ गुणपडताळणी

तसेच, सदर परीक्षेची गुणपडताळणी/Response Sheet उपलब्ध करुन घेण्यासाठी खालील लिंक वर भरा

➤ खालील लिंक वर क्लिक करा 

या लिंकवर दिनांक १६.०३.२०२६ ते दिनांक ३१.०३.२०२६ पर्यंत मुदत देण्यात येत आहे. गुणपडताळणीसाठीचे शुल्क प्रती पेपर रुपये ५००/- सदर लिंकद्वारे भरण्यात यावेत.

 शुल्क भरल्यानंतर १५ दिवसात उमेदवारांच्या ई-मेल वर Response Sheet उपलब्ध करुन देण्यात येईल. 

ई-मेल, पत्राद्वारे किंवा इतर माध्यमाद्वारे सादर केलेली माहिती ग्राह्य धरण्यात येणार नाही. 

सदर मुदतीनंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.

What's Up Group Join 

➤ What's Up Group Join 

What's Up ग्रुप जॉईन करा
WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad

Ads Area