Ads Area

School Portal School Committee Information updated on Mobile

सरल पोर्टल अंतर्गत स्कूल पोर्टलवर 

शालेय समिती माहिती अद्ययावत करणे! 

संपूर्ण माहिती व मार्गदर्शन 

शाळास्तरावरील विविध समित्यांच्या अध्यक्षांची माहिती सरल पोर्टल अंतर्गत स्कूल पोर्टलवर अद्ययावत करण्याच्या सुविधेबाबत.

संदर्भ:- शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय दिनांक १६-४-२०२५

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय दिनांक १६-४-२०२५ नुसार शाळास्तरावरील विविध समित्यांचे एकत्रीकरण करुन शाळास्तरावर पुढीलप्रमाणे समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

१. शाळा व्यवस्थापन समिती

२. सखी सावित्री समिती

३. महिला तक्रार निवारण समिती / अंतर्गत तक्रार समिती

४. विदयार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकासन समिती

शाळास्तरावरील उपरोक्त समिती अध्यक्षांची माहिती या कार्यालयामार्फत मागविण्यात आली होती. त्यानुसार प्राप्त शाळा स्तरावरील समिती अध्यक्षांची नावे NIC मार्फत सरल पोर्टल अंतर्गत स्कूल पोर्टलवर अदययावत करण्यात आलेली असून शाळांना शालेय समिती माहिती या मेनुअंतर्गत जिल्हा, तालुका निवडल्या नंतर शाळांची नावे दिसतील, त्यांनी शाळेच्या नावावर क्लिक केल्यानंतर अपलोड केलेली यादी दिसेल. यादीत नावे योग्य असल्यास बदल करण्याची आवश्यकता नाही.

ज्या शाळांनी वरील माहिती सादर केलेली नाही त्यांना माहिती सरल पोर्टल अंतर्गत स्कूल पोर्टलवर अद्ययावत करण्याची सुविधा मुख्याध्यापक लॉगीन वर उपलब्ध झालेली आहे. याच बरोबर शाळांना वरील माहितीत बदल करण्याची सुविधाही सरल पोर्टल अंतर्गत स्कूल पोर्टलवर मुख्याध्यापक लॉगीन वर उपलब्ध झालेली आहे.

तरी आपल्या स्तरावरून सर्व शाळांना शाळास्तरावरील समित्यांच्या अध्यक्षांची माहिती सरल अचना देण्यात याव्यात व केलेल्या कार्यवाहीचा पोर्टल अंतर्गत स्कूल पोर्टल वर अद्ययावत करण्य अहवाल संचालनालयास सादर करण्यात यावा

मार्गदर्शन व्हिडिओ आवश्यक पहा 

What's Up Group Join 

➤ What's Up Group Join 

What's Up ग्रुप जॉईन करा
WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin No

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad

Ads Area