संकलित मूल्यमापन चाचणी क्र. 02
PAT 3 वार्षिक परीक्षा वेळापत्रक जाहीर !
उपरोक्त संदर्भ क्र. १ अन्वये सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी - १ व संकलित मूल्यमापन चाचणी-२ अशा तीन नियतकालिक मूल्यांकन चाचण्यांचे नियोजन करण्यात आलेले असून त्यापैकी नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत पायाभूत व संकलित चाचणी-१ यापूर्वी जुलै व ऑक्टोबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या आहेत.
तसेच उर्वरित संकलित चाचणी २ (PAT-३) दिनांक ११,१५ व २२ एप्रिल २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे.
तसेच संदर्भ क्र.३ अन्वये दि. १४/०७/२०२५ च्या शासन निर्णयात असे नमूद करण्यात आले आहे, की "द्वितीय सत्र अखेरचे संकलित मूल्यमापन / वार्षिक परीक्षा या सत्र अखेरच घेण्यात याव्यात व त्यांचे वेळापत्रक आवश्यकतेनुसार संचालक प्राथमिक/माध्यमिक यांनी संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या सल्ल्याने निर्गमित करावे." असे नमूद करण्यात आलेले आहे.
तरी या पार्श्वभूमीवर तसेच संदर्भ क्र. २ ते ५ अन्वये संकलित मूल्यमापन चाचणी २ (PAT-३) चाचणीचे वेळापत्रक यासोबत देण्यात येत असून इतर विषय व इयत्तांच्या वेळापत्रकाबाबातच्या सूचना संचालक प्राथमिक व माध्यमिक, शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या स्तरावरून स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील. सदर पत्रानुसार नियतकालिक मुल्यांकन चाचणीचे वेळापत्रक संलग्न करण्यात येत आहे. संकलित चाचणी -२ ( PAT -३) अंतर्गत प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या विषयांच्या इयत्ता दुसरी ते आठवीतील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व शाळा तसेच खाजगी अनुदानित शाळातील विद्यार्थ्यांसाठी चाचणी होणार आहे.
प्रत्येक विद्यार्थ्याने इयत्तानिहाय अपेक्षित अध्ययन संपादणूक प्राप्त केली आहे किंवा नाही याची पडताळणी होऊन अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ होण्यास या चाचणीमुळे शिक्षकांना मदत होईल. सदर चाचण्या इयत्ता १० वी व १२ वी बोर्ड परीक्षेप्रमाणे नाहीत, यामुळे विद्यार्थ्यांना याचा अतिरिक्त ताण देऊ नये. चाचण्यांचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांनी अध्ययन निष्पत्ती किती प्रमाणात प्राप्त केलेल्या आहेत हे शिक्षकांनी लक्षात घेऊन गरजेनुरूप अध्ययन अध्यापन प्रक्रियेत मुलभूत सुधारणा करणे व कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे हा आहे.
संकलित चाचणी २ (PAT-३) उद्देश / उपयोग / फायदे :-
१) विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पती संपादणूक पडताळणे व त्यामध्ये वाढ करणे.
२) अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ होण्यास मदत करणारी चाचणी असेल.
३) राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (NAS) मधील संपादणूक वाढविण्याच्या दृष्टीकोनातून मदत होईल.
४) अध्ययनात मागे असणा-या विद्यार्थ्यांना पुढे नेण्याच्या दृष्टीकोनातून कृतिकार्यक्रम तयार करणे व अंमलबजावणीस दिशा प्राप्त होईल.
५) इयत्ता व विषयनिहाय अध्ययन निष्पत्तीमधील राज्याची संपादणूक स्थिती समजण्यास मदत होईल.
कालावधी
संकलित चाचणी २ (PAT-३)
दिनांक. ११,१५ व २२ एप्रिल २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे.
दिनांक वर्ग विषय
11/04/2026 2 ते 8 वी प्रथम भाषा
15/04/2026 2 ते 8 वी गणित
22/04/2026 2 ते 8 वी तृतीय भाषा
उपरोक्त वेळापत्रकानुसार राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत संकलित चाचणी २ (PAT-३) घेण्यात यावी.
इयत्ता २ री ते ८ वी करिता संकलित चाचणी-२ (PAT-३) बाबत सर्वसाधारण सूचनाः
१) उपरोक्त वेळापत्रकानुसार इयत्ता २ री ते ८ वी करिता सन २०२५ २६ या शैक्षणिक वर्षातील संकलित मूल्यमापन चाचणी -२ (PAT-३) चे आयोजन करावे.
२) इयत्ता २ री ते ८ वी साठी भाषा, गणित व तृतीय भाषा यासाठी प्रस्तुत कार्यालयाकडून पुरविण्यात आलेल्या चाचणीपत्रिकांचा वापर करूनच संकलित चाचणी २ घेण्यात यावी. याव्यतिरिक्त इतर विषयांसाठी शाळास्तरावर इयत्तानिहाय व विषयनिहाय चाचणीपत्रिका तयार करून संकलित चाचणी - २ घेण्यात यावी.
३) शालेय वेळापत्रकानुसार सकाळ सत्र / दुपार सत्र नुसार उपरोक्तप्रमाणे आपल्या स्तरावरून वेळेचे नियोजन करण्याचे स्वातंत्र्य देण्यात येत आहे. तथापि दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणेच चाचणी घेण्यात यावी, यात कोणताही बदल करण्यात येवू नये.
४) तसेच प्रथम भाषा (सर्व माध्यम), गणित (सर्व माध्यम) व तृतीय भाषा इंग्रजी या विषयांची तोंडी परीक्षा/प्रात्यक्षिक/स्वाध्याय ही त्या त्या दिवशी लेखी परीक्षेनंतर वैयक्तिक स्वरुपात घेण्यात यावी. विद्यार्थी संख्या जास्त असेल तर दुसऱ्या दिवशी आपल्या उपलब्ध वेळेनुसार घ्यावी.
५) शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व शाळा तसेच खाजगी अनुदानित शाळातील सर्व विद्यार्थ्यांची इयत्ता २ री, ३ री, ४ थी, ६ वी, ७ वी करिता भाषा, गणित व इंग्रजी (तृतीय भाषा) या विषयांची दुबार संकलित चाचणी-२ होणार नाही याची काटेकोरपणे दक्षता घ्यावी.
६) उपरोक्त चाचणीच्या वेळापत्रकानुसार नियतकालिक मूल्यांकन चाचणी PAT ३ चे आयोजन करावे.
७) राज्यातील मराठी माध्यमातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित शाळांमधील इयत्ता १ ली च्या विद्यार्थ्यांसाठी समग्र प्रगती पत्रक (HPC) पथदर्शी प्रकल्प स्वरुपात देण्यात आलेले आहे. तथापि,
सद्यस्थितीत प्रचलित पद्धतीनुसार इयत्ता १ ली ते ८ वीच्या विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन करण्यात यावे.
८) संदर्भ क्र. २ ते ५ नुसार इयत्ता ५ वी व ८ वी वार्षिक परीक्षेबाबतची कार्यवाही संचालक, प्राथमिक / माध्यमिक, शिक्षण संचलनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या स्तरावरून करण्यात येईल.
What's Up Group Join
➤ What's Up Group Join


आपली प्रतिक्रिया व सूचना