विदर्भातील शाळा आता ३० जून ला
उघडणार ! परिपत्रक निर्गमित
विदर्भातील शाळा : विदर्भातील शाळा दिनांक ३० जून २०२६ पासून सुरू होणार
विद्यार्थी, पालकांसाठी मोठी बातमी ; कडक उन्हाळ्यामुळे शाळांच्या वेळापत्रकात बदल, आता ३० जूनपासून भरणार शाळा
संचालनालयाचे पत्र क्र. शिसंमा-२६/उन्हाळी सुट्टी/एस-१/१७७६३११. दि.२८/०३/२०२६
३) Shri. S.V. Kolhe, Assistant Government Pleader, High Court, Nagpur (ई-मेलद्वारे प्राप्त)
४) मा. आयुक्त (शिक्षण) यांचेशी झालेली चर्चा.
५) संचालनालयाचे पत्र क्र. शिसंमा-२६/उन्हाळी सुट्टी/एस-१/१९४९९१२, दि.०९/०६/२०२६
६) मा. उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ नागपूर यांचे दिनांक १०/०६/२०२६ रोजीचे आदेश
उपरोक्त संदर्भीय परिपत्रकान्वये शासनाने संपूर्ण राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या उन्हाळी सुट्टीच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी सूचना निर्गमित केलेल्या आहेत. या अनुषंगाने राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची सन २०२६ ची उन्हाळी सुट्टी व शैक्षणिक वर्ष २०२६-२७ सुरू करणेबाबत संदर्भ क्र. २ अन्वये राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा सोमवार दिनांक १५ जून, २०२६ पासून व संदर्भ क्र.५ अन्वये दिनांक २२ जून, २०२६ पासून सुरू करण्याबाबत कळविण्यात आले होते.
विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळ्याच्या सुट्टी व नियमित शाळा सुरू करण्याबाबत Writ Petition No.-४०६७/२०२६ filed by Maharashtra Rajya Prathamik Shikshan Samiti, Pune and Others VS. The Sate of Maharashtra and Others दाखल झालेली होती. सदर याचिकेच्या संदर्भात मा. उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ, नागपूर यांनी दिनांक १०/०६/२०२६ अन्वये दिलेल्या निर्णयानुसार शासन परिपत्रक दि.२०/०४/२०२३ मधील सुचनेनुसार कार्यवाही करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यानुसार खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत.
मा. उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ, नागपूर यांनी दिनांक १०/०६/२०२६ अन्वये दिलेल्या निर्णयानुसार शासन परिपत्रक दिनांक २०/०४/२०२३ मधील तरतूदीनुसार फक्त विदर्भातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा सोमवार दिनांक ३० जून, २०२६ पासून नियमित वेळेत सुरू होतील. तसेच उर्वरित राज्यात मात्र शाळा सोमवार दि. १५ जून, २०२६ पासून नियमित वेळेत सुरू होतील,
राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची सन २०२६ ची उन्हाळी सुट्टी व शैक्षणिक वर्ष २०२६-२७ सुरू करणेबाबत
संदर्भ: शासन परिपत्रक क्र. संकिर्ण-२०२३/प्र.क्र.१०५/एस.डी.-४, दि. २०/०४/२०२३
२) संचालनालयाचे पत्र क. शिसंमा-२६ उन्हाळी सुट्टी/एस-१/१७७६३११, दि.२८/०३/२०२६
3) Shri. S.V. Kolhe, Assistant Government Pleader, High Court, Nagpur (ई-मेलद्वारे प्राप्त
४) मा. आयुक्त (शिक्षण) यांचेशी झालेली चर्चा,
उपरोक्त संदर्भीय परिपत्रकान्वये शासनाने संपूर्ण राज्यातील राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या उन्हाळी सुट्टीच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी सूचना निर्गमित केलेल्या आहेत. या अनुषंगाने राज्यातील राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची सन २०२६ भी उन्हाळी सुट्टी व शैक्षणिक वर्ष २०२६-२७ सुरू करणेबाबत संदर्भक्र. २ अन्वये राज्यातील सर्व राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा सोनवार दिनांक १५ जून, २०२६ पासून सुरू करण्याबाबत कळविण्यात आले होते.
विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळयाच्या सुट्टी व नियमित शाळा सुरू करण्यावावत Wit Petition No.-४०६७/२०२६ filed by Maharashtra Rajya Prathamik Shikshan Samiti, Pune and Others VS. The Sate of Maharashtra and Others दाखल झालेली आहे.
विदर्भातील शाळा नवीन शैक्षणिक वर्ष
त्यानुषंगाने कळविण्यात येते की, अद्यापही विदर्भातील तापमान हे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य नसल्याचे निदर्शनास येत आहे.
त्यामुळे फक्त विदर्भातील राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा सोमवार दिनांक ३० जून, २०२६ पासून सुरू होतील, .
उर्वरित राज्यात मात्र शाळा सोमवार दिनांक १५ जून, २०२६ पासून नियमित वेळेत सुरू होतील याची सर्व संबंधितांनी नोद घ्यावी
शिक्षण संचालक
(माध्यमिक व उच्च माध्यमिक)
शिक्षण संचालक
(प्राथमिक शिक्षण संचालनालया
महाराष्ट्र राज्य, पुणे
प्रत: १) मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई यांना माहितीस्तव सविनय सादर.
२) मा. आयुक्त (शिक्षण), मध्यवर्ती इमारत, महाराष्ट्र राज्य, पुणे-०१ यांना माहितीस्तय सविनय सादर
३) कक्ष अधिकारी (एस. डी.-४), शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई यांना माहितीस्तव सादर


आपली प्रतिक्रिया व सूचना