Childrens Art Competition Maharashtra Registration Link Available All Information

बालचित्रकला स्पर्धा २०२६ चे आयोजन

संपूर्ण माहिती व नोंदणी लिंक 

Organization of Children's Art Competition 2026 Complete details and registration link

शासन निर्णयानुसार महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळामार्फत गतवर्षीप्रमाणेच बालचित्रकला स्पर्धा २०२६ चे आयोजन दिनांक ०८ ऑगस्ट, २०२६ रोजी करण्यात येणार आहे. 

राज्यातील सर्व जिल्हा परिषद/नगरपालिका/ महानगरपालिका यांच्या हद्दीतील सर्व शासनमान्य प्राथमिक व माध्यमिक शाळामध्ये इयत्ता १ ली ते १० वी मधील इयत्तानिहाय ४ गटामध्ये एकाच दिवशी बालचित्रकला स्पर्धा आयोजित करावयाची आहे. महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापकांनी https://www.msbae.ac.in या संकेतस्थळावरील बालचित्रकला या टॅबमध्ये किंवा या https://balchitrakala2026.msbae.in लिंकवर शाळेची ऑनलाईन नोंदणी करावयाची आहे. 

गटनिहाय तपशील व प्रवेश शुल्क खालील प्रमाणे.

महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ, मुंबई
दिनांक: 19 जून 2026

विषय: बालचित्रकला स्पर्धा 2026

मुख्य मुद्दे:
महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळामार्फत 8 ऑगस्ट 2026 रोजी बालचित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.
स्पर्धा इयत्ता 1 ली ते 10 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आहे.

स्पर्धेचे गट:

गट 1: इयत्ता 1 ली व 2 री
गट 2: इयत्ता 3 री व 4 थी
गट 3: इयत्ता 5 वी, 6 वी व 7 वी
गट 4: इयत्ता 8 वी, 9 वी व 10 वी

प्रवेश शुल्क: प्रति विद्यार्थी ₹20 (यामध्ये ड्रॉइंग पेपरचा खर्च ₹5 समाविष्ट आहे. उर्वरित ₹15 मंडळाकडे ऑनलाइन जमा करावयाचे आहे.)

महत्त्वाच्या तारखा:

शाळा/केंद्र ऑनलाइन नोंदणी: 
दिनांक 1 जुलै 2026 ते 2 ऑगस्ट 2026

विद्यार्थी नोंदणी: 
दिनांक 1 जुलै 2026 ते 2 ऑगस्ट 2026

प्रवेश शुल्क ऑनलाइन भरणे:
 दिनांक 2 जुलै 2026 ते 2 ऑगस्ट 2026

मुख्याध्यापक / प्राचार्य, सर्व जिल्हा परिषद/नगरपालिका/ महानगरपालिका यांच्या हद्दीतील सर्व शासनमान्य प्राथमिक व माध्यमिक शाळा यांना कळविण्यात येते की, बालचित्रकला स्पर्धेकरिता विद्यार्थ्यांचे नाव

नोंदणी गटनिहाय व सर्वसाधारण नोंदवहीतील (General Register) नावाप्रमाणे अचूक ऑनलाईन नोंदणी शाळेमार्फत करावी. बालचित्रकला स्पर्धेकरिता शाळेची नोंदणी व विद्यार्थ्यांची नोंदणी खालील लिंक करावी 
 सदर स्पर्धेकरिता जास्तीत जास्त विद्यार्थी नोंद होण्याकरिता सर्व संबंधित विद्यार्थी तसेच पालक व शाळा यांना उपरोक्त संदर्भिय शासन निर्णय निदर्शनास आणावा.

खालील लिंक वर क्लिक करा 

➤ 1) खालील लिंक वर क्लिक करा 


खालील लिंक वर क्लिक करा 

➤ 1) खालील लिंक वर क्लिक करा 

ऑनलाइन नोंदणी संकेतस्थळे:
https://www.msbae.ac.in
https://balchitrakala2026.msbae.in

What's Up Grotup Join 

➤ What's Up Group Join 

What's Up ग्रुप जॉईन करा
WhatsApp GroupJoin Now

1 Comments

आपली प्रतिक्रिया व सूचना

  1. जर प्रवेश शुल्कः प्रति विद्यार्थी ₹20 (यामध्ये ड्रॉइंग पेपरचा खर्च ₹5 समाविष्ट आहे. उर्वरित ₹15 मंडळाकडे ऑनलाइन जमा करावयाचे आहे.)
    हे 15 रुपये कशाचे आहे सांगू शकता का?

    ReplyDelete
Previous Post Next Post