इयत्ता ४ थी प्राथमिक शिष्यवृत्ती व इयत्ता ७ वी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा अंतरिम निकाल जाहीर
- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी इयत्ता ४ थी प्राथमिक शिष्यवृत्ती व इयत्ता ७ वी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (दिनांक २६ एप्रिल २०२६) चा अंतरिम निकाल जाहीर केला आहे.
- निकाल दिनांक २५ जुलै २०२६ रोजी परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे.

- शाळा त्यांच्या लॉगिनद्वारे विद्यार्थ्यांचा निकाल पाहू शकतात. पालकही संकेतस्थळावर निकाल पाहू शकतात.
- आपला निकाल पहा
- खालील लिंक वर क्लिक कराखालील लिंक वर क्लिक करा
- गुणपडताळणीसाठी ऑनलाइन अर्ज दिनांक २५ जुलै ते २ ऑगस्ट २०२६ या कालावधीत करता येईल.
- गुणपडताळणीसाठी प्रत्येक पेपरमागे ₹५० शुल्क ऑनलाइन भरावे लागेल.
- विद्यार्थ्यांचे नाव, आडनाव, आई-वडिलांचे नाव इत्यादी दुरुस्तीसाठीही दिनांक २ ऑगस्ट २०२६ पर्यंत संबंधित शाळेच्या लॉगिनमधून ऑनलाइन अर्ज करता येईल.
- मुदतीनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- गुणपडताळणीचे निर्णय अर्ज प्राप्त झाल्यानंतर ३० दिवसांच्या आत कळविण्यात येईल
- सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम निकाल व गुणवत्ता यादी प्रसिद्ध
🗓️ गुणपडताळणी व शाळा माहिती प्रपत्र / विद्यार्थी आवेदनपत्रातील माहितीत दुरुस्ती कालावधी : दिनांक २५ जुलै, २०२६ ते दिनांक ०२ ऑगस्ट, २०२६.
खालील बाबींसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल :
• गुणपडताळणी.
• विद्यार्थ्याच्या आवेदनपत्रातील माहितीत दुरुस्ती.
अर्ज फक्त शाळेच्या लॉगिनमधून स्वीकारले जातील. मुदतीनंतर किंवा ऑफलाईन अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
🏫 मुख्याध्यापकांनी विशेष लक्ष द्यावे :
• शाळेचे क्षेत्र (शहरी / ग्रामीण)
• शाळेचा अभ्यासक्रम
यामध्ये चूक असल्यास विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती संचावर परिणाम होऊ शकतो.
विषय :- प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 4 थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 7 वी) दि. 26 एप्रिल, 2026 शाळा माहिती प्रपत्र व विद्यार्थी आवेदनपत्र दुरूस्तीबाबत...
उपरोक्त विषयानुसार आपणास कळविण्यात येते की, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दि. 26 एप्रिल, 2026 रोजी घेण्यात आलेल्या प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 4 थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 7 वी) चा अंतरिम निकाल शनिवार, दिनांक 25/07/2026 रोजी www.mscepune.in व https://2026-2.puppssmsce.in/ या परिषदेच्या संकेतस्थळावर घोषित करण्यात आला आहे.
सदर परीक्षेच्या अंतरिम निकालामध्ये विद्यार्थ्यांचे प्रथम नाव, वडीलांचे नाव, आडनाव, आईचे नाव, जन्मतारीख, इत्यादीमध्ये दुरूस्ती करणेसाठी दिनांक 02/08/2026 रोजीपर्यंत संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. विद्यार्थ्याच्या माहितीत दुरूस्ती असल्यास शाळेच्या लॉगीनव्दारे विहीत मुदतीत ऑनलाईन अर्ज सादर करावा.
तसेच शाळा माहिती प्रपत्रात शाळेचे क्षेत्र (शहरी/ ग्रामीण) व अभ्यासक्रमात दुरूस्ती करावयाची असल्यास शाळा मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीचे विनंतीपत्र पूर्ण माहिती नमूद करून सदरचे पत्र puppsshelpdesk@gmail.com
वर दिनांक 02/08/2026 रोजीपर्यंत पाठविण्यात यावेत, विहीत मुदतीनंतर व आनॅलाईन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पध्दतीने दुरूस्ती पाठविल्यास स्विकारले जाणार नाहीत.
तरी उपरोक्तनुसार शाळा माहिती प्रपत्र व विद्यार्थी आवेदनपत्रात आपणाकडून विहीत वेळेत दुरूस्ती न झाल्यास आपण शाळा नोंदणी करताना विद्यार्थी आवेदनपत्र भरताना नोंदविलेली माहिती योग्य असल्याचे ग्राह्य धरून अंतिम निकाल व गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. तसेच यामुळे गुणवत्ताधारक विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहून त्याबाबत भविष्यात काही प्रकरण उद्भवल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित शाळा मुख्याध्यापकांची राहील याची गांभिर्याने नोंद घ्यावी.
👨👩👧 पालकांसाठी सूचना :
विद्यार्थ्याचे नाव, जन्मतारीख व इतर माहिती शाळेच्या जनरल रजिस्टरप्रमाणे अचूक आहे का ते तपासून घ्यावे. त्रुटी आढळल्यास त्वरित शाळेशी संपर्क साधावा.
📌 अंतिम निकाल व गुणवत्ता याद्या सर्व दुरुस्त्या व गुणपडताळणीनंतर जाहीर करण्यात येईल.
What's Up Grotup Join
➤ What's Up Group Join

आपली प्रतिक्रिया व सूचना