UDISE School Information Online Making

शाळेची माहिती यु- डायस प्लस

 ऑनलाईन करणे

UDISE PLUS Online 

देशामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सन २०२० ची अंमलबजावणी सुरू झालेला आहे. त्यानुसार यु-डायस प्लसचे प्रपत्र व ऑनलाईन सॉफ्टवेअर अद्ययावत करण्यात आलेले असून ते सर्वांसाठी ऑनलाईन पोर्टलवरून उपलब्ध करून दिलेले आहे. दरवर्षीप्रमाणे यु-डायस प्लस प्रणालीमध्ये सर्व शाळांची माहिती संकलित करण्यात येईल

सन २०२१-२२ या वर्षाची सर्व शाळांची माहिती यु- डायस प्लस या ऑनलाईन प्रणालीद्वारे संगणकीकृत करणेबाबत मार्गदर्शक सूचना,

UDISE Website

उपरोक्त संदर्भिय पत्रानुसार भारत सरकारच्या माहिती व तंत्रज्ञान विभाग यांनी विकसित केलेल्या यु-डायस प्लस ऑनलाईन प्रणालीमध्ये राज्यातील सर्व शाळांची माहिती राज्य / जिल्हा / महानगरपालिका / तालुका / शाळास्तरावरुन ऑनलाईन पध्दतीने दिनांक ३० सप्टेंबर, २०२१ या संदर्मिय दिनांकानुसार यु-डायस प्लस प्रणालीमध्ये दिनांक ३१ मे, २०२२ पर्यंत राज्यातील शाळांची माहिती ऑनलाईन पध्दतीने संगणकीकृत करण्याकरिता कळविले आहे.

 राज्यातील शाळा ऑनलाईन पध्दतीने सुरु आहे सन २०२१-२२ समग्र शिक्षा या योजनेचे वार्षिक नियोजन व अंदाजपत्रक तयार करण्याकरिता जिल्ह्यातील शाळांची अद्यावत माहितीची आवश्यकता आहे.


यु-डायस प्रणालीमध्ये झालेले बदल व वस्तुनिष्ठ माहिती प्राप्त होण्याच्या अनुषंगाने यु-डायस प्लस प्रणालीचे काम करण्याच्या अधिकारी/कर्मचारी यांचे राज्य/जिल्हा/महानगरपालिका / तालुक / केंद्र प्रमुख / शाळेचे मुख्याध्यापक यांचे प्रशिक्षण घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्यात यावे

शालेय सोयीसुविधांची, शिक्षक, विद्यार्थी, मोफत पाठपुस्तके, गणवेश, दिव्यांग विद्यार्थ्यांना दिलेल्या सोयीसुविधांची माहिती ऑनलाईन पध्दतीने यु-डायस प्लस प्रणालीमध्ये

 माहे दिनांक ३१ मे, २०२२ पर्यंत यु-डायस प्लस प्रणालीमध्ये अद्यावत करुन पुर्ण करण्याकरिता कळविले आहे.

जिल्हा / तालुका/शाळास्तरावरुन पुढीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.

 शाळास्तरावरुन करण्यात येणारी कार्यवाही :

शाळेच्या मुख्याध्यापकांनी मिळालेल्या युजरनेम व पासवर्ड द्वारे शाळेतील बदल झालेल्या सोयीसुविधांची माहिती यु-डायस प्लस प्रणालीमध्ये

 दिनांक १५ मे २०२२ पर्यंत पूर्ण करण्यात यावी. माहिती प्रणालीमध्ये अद्यावत करणे पूर्ण झाल्यानंतर माहिती अचूक असल्याचे Self Declaration प्रमाणपत्र Upload करावे.

यु-डायस प्लस प्रणालीमध्ये सन 2020-2021 या वर्षाची शाळेतील सर्व सोयीसुविधांची माहिती भरुन ऑनलाईन पध्दतीने सादर केलेली आहे. सन २०२०-२१ या वर्षाकरिता शाळेच्या मुख्याध्यापकांनी मिळालेल्या युजरनेम व पासवर्डद्वारे सोयीसुविधांमध्ये बदल झाल्यास, विद्यार्थी संख्येत बदल झाले असल्यास, शिक्षकांच्या माहिती मध्ये बदल असल्यास त्याच माहितीमध्ये बदल करण्यात यावा

 व इतर माहिती पुन्हा यु-डायस प्लस प्रणालीमध्ये नोदविण्याची गरज नाही.

शाळेच्या मुध्यापकांनी शाळेची माहिती पुर्ण भरुन झाल्यानंतर School Report Card व भरलेले यु-डायसचे प्रपत्र माहितीसाठी डाऊनलोड करुन घ्यावे.

माहिती भरण्यासाठी कोरा फॉर्म करिता खालील लिंकवर क्लिक करून डाऊनलोड करा

UDISE कोरा फॉर्म

UDISE कोरा फॉर्म

UDISE कोरा फॉर्म

शाळेची माहिती भरताना मुख्याध्यापकांना अडचणी येत असल्यास त्यांनी केंद्रपमुख, गटशिक्षणाधिकारी, राज्य/जिल्हा / तालुका स्तरावरील संगणक प्रोग्रामर / MIS Co-ordinator / Data Entry Operator यांच्या मदतीने यु-डायस प्लस प्रणालीमध्ये माहिती नोंदविण्याचे काम पूर्ण करुन घेण्यात यावे.

 केंद्र स्तरावरुन करण्यात येणारी कार्यवाही

केंद्र प्रमुखांनी आपल्या केंद्रातील सर्व शाळांची माहिती यु-डायस प्लस प्रणालीमध्ये मुख्याध्यापकामार्फत नोंदविल्याची माहिती खात्री करुन घ्यावी आणि यु-डायस प्लस प्रणालीमधली माहिती अचूक, वस्तुनिष्ठ, त्रुटीविरहीत, प्रपत्रातील सर्व माहिती, PGI मधील सर्व माहिती अचूक भरण्याकरिता त्यांनी शाळेच्या मुख्याध्यापकांना मार्गदर्शन करावे.

मुख्याध्यापकांना ऑनलाईन पध्दतीने माहिती भरण्यास अडचणी येत असल्यास त्यांच्या अडचणी समजून घेवून गटशिक्षणाधिकारी यांच्या मार्फत सोडविण्यात यावे

तालुकास्तरावरुन करण्यात येणारी कार्यवाही :-

• सन २०२१-२२ या वर्षाची तालुक्यातील सर्व शाळांची माहिती यु-डायस प्लस प्रणालीमार्फत सर्व त्रुटींची पूर्तता करुन माहिती अंतिम असल्याची खात्री झाल्यानंतर गटशिक्षणाधिकारी यांच्या स्वाक्षरीने प्रमाणपत्र online पध्दतीने

 दिनांक २० मे २०२२ पर्यंत अद्यावत करावी.

• गटस्तरावर MIS Co-ordinator यांनी जिल्ह्याकडून मिळालेल्या युजरद्वारे गटातील सर्व शाळा प्रणालीमध्ये समाविष्ट करण्यात याव्या / शाळांचा प्रवर्ग उच्चीकरणे करणे, व्यवस्थापन बदल करणे, इत्यादी आवश्यक ते बदल करुन घेण्यात यावेत.

• गटस्तरावर MIS Co-ordinator यांनी प्रणालीमध्ये संगणकीकृत करण्यात येणाऱ्या माहितीचे विश्लेषण करुन माहिती अंतीम करण्यात यावी. शाळेचे मुख्याध्यापक त्यांच्या शाळेची माहिती स्वतःहून भरण्यास तयार उत्सुक असतील आणि त्यांच्याकडे internet सुविधा उपलब्ध असेत तर त्यांना डाटा एन्ट्रीकरिता 

UDISE Website

संकेतस्थळावर माहिती

नोंदविण्याकरिता MIS Co-ordinator यांनी यूजर मॅनेजमेंट या सुविधेमधून शाळेचा स्वतंत्र युजर नेम व पासवर्ड तयार करुन द्यावा. तालुकास्तरावर MIS Co-Ordinator किंवा डाटा एन्ट्री ऑपरेटर कार्यरत नसल्यास त्या तालुक्यातील सर्व शाळांची माहिती संगणकीकृत करण्याची जबाबदारी नजिक असलेल्या तालुक्याच्या MIS Co-ordinator / डाटा एन्ट्री ऑपरेटर यांचेकडे सोपविण्यात यावी. 

• तालुक्यातील सर्व शाळांची माहिती प्रणालीमध्ये संगणकीकृत झाल्यानंतर तालुकास्तरावरील MIS Co-ordinator / डाटा एन्ट्री ऑपरेटर यांनी तालुक्यातील सर्व शाळांची माहिती तालुकास्तरावरील संबंधित अधिकाऱ्यांना योजनेचे नियोजन करण्याकरिता तसेच माहिती पडताळणी करण्याकरिता उपलब्ध करुन देण्यात यावी. जेणेकरुन अचूक माहिती भारत सरकारकडे सादर करता येईल व PGI मध्ये जिल्ह्याच्या शैक्षणिक अंकामध्ये वाढ होईल. 

शासन परिपत्रक

 डाऊनलोड

जिल्हास्तरावरुन करण्यात येणारी कार्यवाही :-

जिल्हास्तरावरील संगणक प्रोग्रामर यांनी यु-डायस प्लस प्रणालीमध्ये संकलित करण्यात येणार्या सर्व शाळा प्रणालीमध्ये समाविष्ट करुन घेण्याची कार्यवाही करावी

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad